थंडीचे
दिवस सुरू झाले की, बाजारात आपल्याला पेरू दिसायला लागतात.
सध्या पेरूचाच हंगाम आहे. स्थानिक पेरूंबरोबर बर्याच जाती आपल्याला दिसतात,पण यात आणखी एका पेरूची जात
लोकांना आकर्षित करत आहे, ती म्हणजे रायपूर जातीचा पेरू!
दिसायला मोठा किलो-दीड किलोचा पेरू पाहून लोक अचंबित
होत आहे. कमीत कमी एक किलो वजन... बिया
कमी आणि जास्त गर... असा ‘रायपूर पेरू’
सध्या लक्ष वेधून घेत आहे. शहरात विविध फळ विक्रेत्यांकडे
हा पेरू सध्या विक्रीला दिसत आहे. एक पेरू एकट्याला सरणारा नाही.
असा हा पेरू केवळ आकर्षणाचा भाग राहिला नाही तर त्याची विक्रीही धुमधडाक्यात
होत असल्याचे विविध बाजारातल्या अंदाजावरून दिसून येत आहे.मुंबई,पुण्याचा बाजार असो किंवा जळगावचा बाजार असो! अगदी सातारा-कोल्हापूर बाजारातही हा पेरू दाखल झाला आहे. महाराष्ट्रातल्या
शेतकर्यांनी या पेरूची लागवड अगदी मनावर घेतल्याने महाराष्ट्रात
या रायपूर पेरू जातीचे क्षेत्र वाढत आहे.
राज्यातल्या
विविध भागात या पेरूची लागवड होऊ लागली आहे. पुणे,
बारामती,कोल्हापूर,सातारा,जळगाव आदी भागात या पेरूच्या बागा दिसत आहेत.कोरेगाव-
भीमा जवळच्या सणसवाडी औद्योगिक परिसरात काही तरुण शेतकर्यांनी एकत्र येऊन 18 एकरात या पेरूची लागवड केली आहे.
नवनाथ भुजबळ, अनिल दरेकर, मच्छिंद्र हरगुडे यांनी आपल्या 18 एकर क्षेत्रात
‘रायपूर’ पेरूची आधुनिकरीत्या सेंद्रिय पद्धतीने
लागवड करून बाग उभी केली आहे. 18 महिन्यांतच तब्बल 1 किलोचा एक पेरू पिकविल्याने परिसरात या पेरूंना मोठी मागणी आहे. या 18 एकर क्षेत्रात तब्बल 8 हजार
रोपांची लागवड त्यांनी एप्रिल 2015मध्ये केली आहे. लागवडीनंतर या झाडाला 18 महिन्यांनंतर फळे येतात.
बागेतील पेरूला सुमारे एक किलोपेक्षा मोठी फळे आलेली आहेत.
जळगाव तालुक्यातील पिलखेडा येथील किशोर
चौधरी या शेतकर्याच्या शेतातील एकएक पेरू हा एक ते दीड किलो
आकाराचा भरत आहे. चवीला चांगला असल्याने निर्यातीस योग्य असलेल्या
या पेरूने मुंबई-पुण्यात’भाव’खाण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यात आज, 650 हेक्टरमध्ये पेरूची लागवड झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील
बहाळ तसेच पाचोरा, भडगाव तालुक्यातील शेतकरी पेरुच्या नवीन जातींचा
शोध घेत आहेत. पिलखेडा येथील किशोर चौधरी यांनी आपल्या शेतात
तीन एकरमध्ये छत्तीसगड येथील व्हीएनआर या जातीच्या पेरू रोपांची लागवड केली.
कोणत्याही दलालाचे सहकार्य न घेता माल पाठवतात.
या
पेरूची लागवड केलेल्या हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील संगतपुर गावातील नीरज धांडा या
एका इंजिनिअरची यशकथा सध्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजते आहे.तो गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून फक्त या पेरूची लागवड करून चांगले उत्पन्न
मिळवत आहे. शिवाय तो स्वत:च त्याचे मार्केटिंग
करत आहे. नीरज यांनी
आपल्या 7 एकर शेतामध्ये जवळपास 1900 रोपं
लावली. सुरुवातीला त्याला एका झाडापासून जवळपास 50 किलो फळ मिळाले आहेत, जे की खूप चांगलं उत्पन्न म्हणता
येईल. लिंबाच्या आकाराचे पेरू होते तेव्हा त्यांनी त्याची काळजी
घेण्यास सुरुवात केली. पावसापासून, वादळ
आणि गारपिटीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी त्यावर फोम लावले होते. जेव्हा फळ मोठे होत होते तेव्हा त्यांनी तापमान नियंत्रित करण्यासाठी पॉलिथिन
आणि पेपर बांधले. नीरज हे आपल्या बागेत रासायनिक खताऐवजी सेंद्रिय
खते वापरतात. यामुळे हे पेरू खूप फलदायी असतात. यामुळे काही नुकसान होत नाही. त्यांनी या झाडांना निंबोळीची
पेंड, शेणखत आणि गांडूळखत टाकून शक्तिशाली बनवले आहे.
जितकी
आगळीवेगळी कहाणी नीरज यांच्या पेरू लावण्याची आहे तितकेच हटके मार्केटिंग त्यांनी या
पेरुचं केलं. ते आपले पेरू एखाद्या भाजीमंडी मध्ये विकत नाहीत.
ते या पेरूची थेट ऑनलाइन विक्री करतात. जिथून त्यांना
ठोक ऑर्डर मिळतात तिथे ते पेरू विकतात. यासाठी त्यांनी डोअर नेक्स्ट
फार्म नावाची कंपनी सुद्धा चालू केली आहे. त्यांच्या वेबसाईटवर
पेरू ऑर्डर केल्यानंतर 48 तासात डिलिव्हरी मिळते.
जास्त
काळ टिकणारा गुणकारी पेरू
रायपूर
जातीचा हा पेरू इतर फळांपेक्षा अधिक टिकाऊ असून, शीत
वातावरणात सुमारे एक महिना, तर उघड्या वातावरणात तीन महिने टिकतो.
या फळामध्ये बियांचे प्रमाणीही खूपच कमी असून, खाण्यासही खूपच चवदार आहे.गर जास्त असलेल्या या पेरूपासून
जेलीही करता येते. पेरूमध्ये अ, क,
के, ब ही जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.
नियमितपणे खाल्ल्यास त्वचा, डोळे चांगले राहतात.
वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.तसेच, साखररहित असल्याने तो डायबेटीस रुग्णांसाठी उपयुक्त
आहे. हा पेरू देशात कोणत्याही बाजारपेठेत विकला जातो.
परदेशातही त्याला मोठी मागणी आहे. या फळाला किलोला
70 ते 80 रुपये बाजाराभाव असून, एकरी उत्पादन सुमारे अडीच लाखांपर्यंत आहे.सामान्यपणे
पेरूला चार वर्षानंतर फळ लागते,मात्र या पेरूला 18 महिन्यातच फळ लागण्यास सुरूवात होते.
No comments:
Post a Comment