चार महिन्याच्या
रेवाचा रडण्याचा आवाज ऐकून तिला उचलून घ्यायला आजी सरस्वती धावत आली.
'थांब गं, आई!' शीतलने
आपल्या आईला अडवलं. सरस्वती आश्चर्याने
थबकल्या. त्या प्रश्नार्थक नजरेने आपल्या
मुलीकडे शीतलकडे पाहिले.

सरस्वती कौतुक
आणि ममत्वेच्या नजरेने आपल्या मुलीकडे पाहू लागली. आणि म्हणाली, 'तिथे तुला एकटीलाच घर आणि रेवा
दोघांनाही सांभाळावे लागणार आहे,पण इथे आहेस तोपर्यंत तरी तुला
माझी तेवढीच मदत होईल की नाही?'
'तुला कळत नाही, आई! सांगलीला
मला रेवाला सांभाळायला जमलं नाही तर ते तिला सांभाळायला गावाकडून सासूबाईंना बोलावून
घेतील आणि त्यांना सांभाळायला मला आणखी अवघड होऊन बसेल.' शीतल
पटकन बोलून गेली.
घर सांभाळण्याबरोबरच
रेवा सांभाळण्याचा सराव करण्यासाठी शीतलने जे कारण दिले ते ऐकून सरस्वती यांच्या नजरेत
आपल्या मुलीविषयी जो भाव होता, तो झटक्यात उतरला.
No comments:
Post a Comment