Sunday, November 12, 2017

नेहमी उत्साही राहायचे असेल तर...

     आपल्या आयुष्यात आपल्याला हजारो माणसे भेटत असतात. काहींच्या चेहर्यावर नेहमी प्रसन्नता भरून वाहत असते. तर काहींच्या चेहर्याला थकव्याने घेरलेले असते. काहींना थोडे जरी काम केले तरी थकवा येतो. खरे तर आपल्या शरीरात येणारा हा थकवा आपल्या जीवनशैलीमधल्या काही चुकीच्या सवयींचा परिपाक आहे, असे म्हणायला हरकत नाही.जर तुम्ही स्वत:ला प्रत्येक क्षणी उत्साही ठेऊ इच्छित असाल तर तुम्हाला तुमच्या जीवनचर्येशी जोडल्या गेलेल्या काही गोष्टींकडे आणि सवयींकडे लक्ष द्यायला हवे.यामुळे तुम्ही नेहमी ऊर्जावान राहाल आणि दुसर्यालाही प्रेरणा देत राहाल.

सकाळशी मैत्री करा
रात्री उशिराने झोपल्याने सकाळी लवकर उठवत नाही. मग थकवा जाणवतो. आळस चढलेला असतो. त्यामुळे साहजिकच दिवसभर थकवा, कंटाळा जाणवत राहतो. दिवस आपल्याला उत्साही,प्रसन्न  जायचा असेल तर आपल्याला रात्री लवकर झोपण्याची सवय लावून घ्यायला लागेल. सकाळी लवकर उठल्याने तुम्हाला फारच एनर्जेटिक वाटेल. जर तुम्ही सतत काम करून थहून गेला असाल तर तुम्हाला 20 मिनिटांची डुलकी घ्यायला हरकत नाही.यामुळे सगळा थकवा निघून जातो आणि तुम्ही एकदम फ्रेश होता. सकाळी सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय ठेवा. आरोग्याला चांगले असते.
व्यायाम मधेच सोडू नका
व्यायाम सगळ्यांनाच महत्त्वाचा आहे. आरोग्यपूर्ण आयुस्य जगायचं असेल तर रोज सकाळी व्यायामाला वेळ द्यायला हवा.पण हा व्यायाम मधेच अर्धवट सोडू नका. यामुळे आपल्या शरीरावर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियाच्या एका अभ्यासानुसार जे लोक आठवड्यातून तीन दिवस जवळपास 20 मिनिटे व्यायाम करतात, त्यांना थकवा कमी जाणवतो. नियमित व्यायामामुळे तुमचा कार्डियोवॅसकुलर सिस्टम प्रभावी पद्धतीने काम करतो.यामुळे तुमच्या टिश्युजला ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंटस चांगल्याप्रकारे पोहचतात.पुढच्यावेलेला तुम्हाला थकवा जाणवायला लागला तर अंथरुणावर जाऊन झोपण्यापेक्षा एक्सरसाइज करायला सुरुवात करा.
दिवसभर थोडे थोडे पाणी पित राहा
अमेरिकेतल्या एका संशोधनानुसार शरीरात दोन टक्के पाणी कमी झाले तरीदेखील एनर्जी लेवल कमी होते. डिहायड्रेशनमुळे ब्लड वॉल्युममध्ये घट होते.ज्यामुळे रक्त घट्ट होते. यामुळे आपले हृदय कमी प्रभावाने पंप करते. ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंटस तुमच्या मसल्स आणि ऑर्गन्सपर्यंत कमी वेगाने पोहचतात. तुम्हाला पूर्ण दिवसभर थांबून थांबून थोडे थोडे पाणी पित राहावे लागेल.  
जंकफूड नको, आयर्नफूड घ्या
जंक फूड खाल्ल्याने आपल्याला काही ऊर्जा मिळत नाही. उलट जंकफूडमुळे ब्लड शुगरमध्ये वाढ होते. थकवा जाणवायला लागतो.तुमच्या जेवणात प्रोटीनयुक्त पदार्थ असायला हवेत.जंकफूडला तर कायमचेच आपल्या आहारातून बाय बाय करा.तुमच्या आहारात आयर्नची कमतरता असेल तर तुम्हाला थकवा जाणवायला लागतो.तुम्हाला अॅनिमियाची तक्रार असेल तर तुमच्या जेवणात हिरव्या पानांच्या भाज्या, डाळ,केळी,मोड आलेली कडधान्ये, पालक इत्यादींचा जास्तीत जास्त वापर असायला हवा.
न्याहरीची सवय ठेवा
कित्येकांची जीवनशैलीच अशी होऊन बसली आहे की, त्यांनी आपल्या आहारात सकाळच्या नाश्त्याला स्थानच दिलेले नाही. सकाळच्या वेळेला हलका आहार घ्यायला हवा. न्याहरी केल्याने तुमचा मेटाबोलिज्म योग्य प्रकारे राहण्यास मदत होते. जर तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये पौष्टिक आहार असेल तर तुम्ही दिवसभर उत्साही राहता.सकाळी रिकाम्यापोटी बाहेर पडलात तर दिवसभर तुमचे डोके गरगरायला लागते.यामुळे तुम्हाला खूप थकवा जाणवायला लागतो. यामुळे सकाळच्या न्याहरीचा समावेश तुमच्या दिनचर्येत असायला हवा. त्याची सवय करून घ्यायला हवी.
महत्त्वाच्या कामाला प्राधान्य द्या
काही लोक जे काम महत्त्वाचे नाही, ते काम करत बसतात. जे काम महत्त्वाचे आहे आणि वेळेत पूर्ण करायचे आहे त्याकडे आधी लक्ष द्या.ज्या कामाची आवश्यकता नाही, ती करू नका. यासाठी कुणाचा दबाव येत असेल तर तो दबाव घेऊ नका. अशा कामासाठी आपली ऊर्जा वापरू नका.त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवेल. आपल्या मनाचे ऐका. आपल्याला कशात आनंद वाटतो, त्या कामाकडे फोकस करा.
सकारात्मकता ठेवा
नेहमी नापास होण्याच्या, अपयशी होण्याच्याबाबतीत विचार करू नका. तुम्हाला जे काम करायचे आहे, ते काम पूर्ण सकारात्मक विचार ठेवून करा. सकारात्मक विचार तुम्हाला फक्त दीर्घायुष्यीच बनवणार नाही तर कामाच्यावेळी येणारा तणावदेखील दूर करण्यास मदत होते. कामाच्याबाबतीत तणाव बाळगल्यास तुमचा उत्साह कमी होतो. त्यामुळे तुमचे सर्वोत्कृष्ट तुम्ही देऊ शकत नाही. तणाव शरीराला नुकसान पोहचवतो. तुमचा उत्साह चुरगाळून टाकतो.सकारात्मक चिंतन तुम्हाला किती तरी आजारांपासून दूर ठेऊ शकते.
धुम्रपानाला करा बाय बाय
जर तुम्ही दिवसभरात तीन कप कॉफी पित असाल तर काही अडचण नाही.पण तुम्ही आवश्यकतेपेक्षा अधिक कॉफी पित असाल तर मात्र अडचण,समस्या निर्माण होऊ शकते. ही सवय तुमच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या पद्धतीवर बर्याच अंशी परिणाम करू शकते. यामुळे शारीरिक थकवा वाढण्यास मदत होते.तुम्हाला आवश्यकतेपेक्षा जास्तीचे सेवन कंट्रोलमध्ये आणायला हवे.यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहाल. दारू प्यायल्याने थकवा वाढण्याची तक्रार सुरू होते.ती तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करते. यामुळे झोप येत नाही आणि शरीर आजारी पडते. अशाप्रकारे तुम्हाला धुम्रपानदेखील बंद करायला हवे. यामुळेदेखील तुमच्या एनर्जीला मोठे नुकसान पोहचते.

No comments:

Post a Comment