Wednesday, November 1, 2017

सकाळी उठल्यावर काय खाता?

     अलिकडे आरोग्याबाबत काळजी घेतली जाऊ लागली आहे.कारण आरोग्याचे महत्त्व त्यांना पटलेले आहे. अगदी लहान वयातच विविध आजार होऊ लागल्याने फार लवकर लोक याबाबत जागृत झाले आहेत.चाळीस वय झाल्यानंतर हळूहळू एक-एक आजार गाठू लागल्याने माणसे घाबरून गेली आहेत. आपले शरीर तंदुरुस्त राहावे,यासाठी व्यायाम,योग असे प्रकार होऊ लागले आहेत. तरुण-तरुणी सिक्स पॅकच्या प्रेमात पडून डायट करू लागले आहेत.मात्र तरीही खाण्या-पिण्याबाबत अजूनही मोठ्या संख्येने लोक सतर्क असल्याचे दिसून येत  नाही. उपाशी राहिले म्हणजे झाले वजन कमी, असे होत नाही. याबाबत आपल्या शरीराची व्यवस्था कशी आहे, आपल्या शरीराला कशाकशाची आवश्यकता आहे, आपल्या अन्नात कोणकोणते घटक असायला हवेत, सकाळी उठल्यावर पहिल्यांदा काय घ्यायला हवं, अशाच बर्याच गोष्टी आहेत,त्या अगदी बारीकपणे समजून घ्यायला हव्यात. यासाठी आपल्याच शरीराचा आपणच अभ्यास करायला हवा आहे,मात्र या स्पर्धेच्या युगात आपल्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळ नाही. आजारी पडायचे नसेल,तर याबाबत काळजी घ्यायलाच हवी.


रिकाम्यापोटी मोसमी फळ खा
सकाळी अंथरुणातून उठल्यावर आपल्या दिवसाची सुरुवात होते. या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. पण रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेणे आपल्या शरीराला अपायकारक आहे, हे कितीजणांना माहित आहे. रिकाम्यापोटी चहा घेतल्याने पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिडची निर्मिती होते. त्याम्उले अॅसिडिटीचा त्रास होतो. यामुळे आतड्यातील लाईनिंगची चीज होऊ शकतेकाहीजण शरीराला आरोग्यवर्धक आहे,म्हणून ग्रीन टी किंवा ग्रीन कॉफी घेतली जाते.यात असलेल्या पॉलीफेनॉल्स फॅट मेटाबॉलिज्म वाढवतात. ग्रीन टी किंवा कॉफी रिकाम्यापोटी पिल्याने अॅसिडीटी होऊ शकते. मात्र दीर्घकाळ आरोग्य चांगले राहावे,यासाठी काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवेच.
काही तज्ज्ञ सांगतात की, सकाळी उठल्यावर चहा पिण्यापेक्षा एकादे कोणतेही मोसमी फळ खाल्यास शरीराला चांगले असते. फळांमुळे मेटाबॉलिज्म सुधारते. ज्यावेळेला तुम्ही रिकाम्या पोटी फळ खाता, त्यावेळेला पचनक्रिया फळांमध्ये असलेल्या साखरेचा सहजपणे स्वीकार करते. फळांमध्ये असलेल्या फायबर,न्यूट्रिेंटससारखे व्हिटॅमिन सी आणि एंटीऑक्सिडेंटस शरीरात होणार्या इंफ्लेमेशनला कमी करतात. फायबरयुक्त फळ डायजेस्टिव ट्रॅकने जुन्या टाकाऊ पदार्थांना बाहेर काढण्यास मदत करते. पण आणखी एक लक्षात घ्या की, सकाळी रिकाम्यापोटी एकादे फळ खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने खर्या अर्थाने नाश्ता करायला हरकत नाही.

भिजवलेले बदाम खा
दिवसाची सुरुवात बदामने केल्यास तर फारच चांगले. संशोधनानुसार कोरडे बदाम खाण्याऐवजी रात्री भिजत घातलेले बदाम सकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्याने त्याचा आरोग्याला चांगला लाभ होतो. भिजवलेले बदाम सहज पचतात.मुलांना किंवा घरातल्या वडील धारी मंडळींना पाण्यात भिजू घातलेले बदाम सकाळी रिकाम्या पोटी खायला दिल्याने चावायला आणि पचायला सोपे जाते.सालीसकट बदामाचे सेवन करायला हवे. बदाममध्ये एंटीऑक्सिडेंटस, मिनरल्स,व्हिटॅमिन्स आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड  मोठ्या प्रमाणात असते. सकाळी सर्वात अगोदर बदाम खाल्ल्याने बुद्धीला तेज येते,कारण यात दोन प्रमुख ब्रेन न्यूट्रिेंटस रिबोफ्लोविन आणि एल-कॅरनिटाइन असतात, जे मेंदूची क्रियाशिलता वाढवतात.

दालचिनी खा
दालचिनीमध्ये एंटीऑक्सिडेंट भरपूर असते. याला वंडर स्पाइसदेखील म्हणतात.दालचिनी पावडर कोमट पाण्यात मिसळून पिल्याने ब्लड शुगर लेवल नियंत्रित राहते. हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि फ्री रॅडिकल्सने शरीराचे होणारे नुकसान कमी होते.दालचिनीचा एक तुकडा पाण्यात रात्रभर भिजू घालून ठेवा. हेच पाणी सकाळी रिकाम्यापोटी प्या. यात असलेल्या एंटीऑक्सिडेंट्स शरीरातील झीज भरून काढण्यास मदत करते.

लिंबू-पाणी प्या
एका ग्लासात कोमट पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस पिळून ते रिकाम्या पोटी प्या. इम्युनिटी बूस्ट होईल. युरिनरी ट्रॅकद्वारा टाकाऊ पदार्थ सहज बाहेर निघून जातात. लिंबूमध्ये असलेला व्हिटॅमिन सी इम्युनिटी दुरुस्त करतो. फ्री रॅडिकल्सने त्वचेच्या होणार्या नुकसानीशी लढण्यास मदत होते. गरम पाणी डायजेस्टिव सिस्टिम दुरुस्त करून पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.तुम्हाला वाटल्यास यात मध घालू शकता. यामुळे लिव्हरची स्वच्छता होते.
अमर उजाला या दैनिकात न्यूट्रिशनिस्ट डॉ. अंशुल जयभरत यांची मुलाखत वाचली होती. त्या म्हणतात, दिवसाची सुरुवात कधीही रिकाम्यापोटी चहा किंवा कॉफी पिऊन करू नका. एक कोणतेही मोसमी फळ खा. पपई, सफरचंद, केळी, चिकूसारखी फळे खा. या सगळ्या फळांमुळे पोट साफ होते. सिट्रस फळ जसे संत्रे खा. टलबू-पाणी प्या. आपले आरोग्य लक्षात ठेवून फळांची निवड करा. चहा-कॉफीच्या सेवनाने अॅसिडीटीचा त्रास होतो. रात्रीचे जेवण केल्यानंतर तुम्ही सकाळी सात- आठ तासांच्या फास्टिंगमध्ये राहता. अशा वेळी रिकाम्यापोटी कोणतेही काम करू नये. यामुळे ब्लड शुगर लो होणार नाही. शरीर चार्ज राहील.  

No comments:

Post a Comment