Monday, November 6, 2017

ऐकोऐकी 1


 माणसाच्या चेंगटपणाच्या कहाण्या आपल्याला माहित आहेत. पैसा त्यांच्या हातून सुटत नाही. नवरा तो नवरा,पण त्याची बायकोदेखील त्याच्यावरची असते. अशीच एक कहाणी ऐकलेली, कदाचित वाचलेली!
दानधर्म
एकदा चंपकलाल मरण पावला. पण त्याने मरण्यापूर्वी आपल्या बायकोला काही सांगून गेला. म्हणाला, मी माझ्या आयुष्यात बक्कळ पैसा कमावला,पण दानधर्म काही केला नाही. त्यामुळे दानधर्म करायची माझी शेवटची इच्छा आहे.ती इच्छा तू मी मेल्यावर पूर्ण कर.
त्याची बायको म्हणाली, कोणती?
चंपकलाल: आपल्या तबेल्यातला एक घोडा विकून जे पैसे येतील, ते आपल्या गावातल्या गरिबांच्या मुलांना वाटून टाक.
नवर्याचे वचन पूर्ण करण्यासाठी ती तबेल्यातला एक घोडा घेऊन घोडेबाजारात गेली. मात्र जाताना तिने एक मांजरही घेतले. बाजारात ती एका ठिकाणी जाऊन उभी राहिली आणि मोठमोठ्याने ओरडू लागली. घोडा घ्या,मांजर घ्या.
एक मनुष्य आला. घोडा कसा दिलात आणि मांजर?
ती म्हणाली. घोडा दहा रुपये आणि मांजर पाच हजार रुपये.
त्याने पाच हजार दहा रुपये देऊन घोडा आणि मांजर खरेदी केले. वाटेत मांजराला सोडून तो घोडा घेऊन आपल्या घरी गेला. इकडे चंपकलालची बायको आपल्या गावात आली. तिथल्या गरीब वस्तीतल्या दहा मुलांना गोळा केली. प्रत्येकाच्या हातात एक एक रुपया ठेवला आणि आभाळाकडे बघत हात जोडून म्हणाली, तुमची इच्छा पूर्ण केली.

बसून बघा
एका घराचं रंगकाम चाललं होतं. एक माणूस घरासमोरून चालला होता. त्याने घराला दिलेला रंग पाहून थांबला आणि म्हणाला, अहो, तुमच्या या घराचा रंग उठून दिसत नाही.
बाजूलाच घरमालकाचं इरसाल पोरगं होतं. ते चटकन म्हणाला, अहो काका, तसे असेल तर बसून बघा!

पेरू कसे?
बाजारात बसलेल्या पेरूवालीबाईला एका माणसाने विचारले, पेरू कसे दिलेत?
पेरूवालीबाई: आठला दहा.
माणूस: काही कमी नाही का?
पेरूवालीबाई: अहो घ्या ना मग! आठ रुपयेला चार

सरकारी सुट्टी
मास्तरांनी वर्गातल्या मुलांना विचारलं, भगवान राम,भगवान श्रीकृष्ण, मोहम्मद पैगंबर, गौतम बुद्ध, गुरुनानक या स्गळ्यांमध्ये साम्य काय आहे सांगा?
वर्गातल्या वात्रट मुलाने सांगितले, मास्तर, ही सगळीजण सरकारी सुट्टीच्यादिवशी जन्माला आली.

चिंचा
पहिला कोल्हाअरे! उड्या मारून मारून दमलास की.लेकाचिंचांचा नाद सोड. मालक आला तर तुला बदडून काढील.
दुसरा कोल्हा: मार परवडला.पण आंबट चिंचा घरी नेल्या नाहीत तर डोहाळे लागलेली माझी बायको मला घरात घेणार नाही.

No comments:

Post a Comment