Monday, November 13, 2017

सकाळी उठल्यावर शिंक येत असेल तर...

     थंडीच्या दिवसांना प्रारंभ झाला की, आरोग्याच्या अनेक समस्या डोके वर काढतात. यात सकाळी लवकर उठल्याबरोबर शिंका यायला लागतात, ही समस्याही काहीजणांच्याबाबतीत घडते. तसे माझ्याबाबतीतही घडू लागले. मी पहाटे चारला किंवा पाचला उठत असतो. पण अलिकडे काही दिवसात सकाळी उठल्यावर शिंका यायला लागल्या. बाहेर थंडी पडू लागली होती. तापमान कमी झाल्याने होत असेल असे वाटले पण, या शिंका काही कमी होईनात. मग म्हटले यावर इंटरनेटवर उपाय शोधून काढू. यातले काही उपाय केल्याने माझ्या पहाटेच्या शिंका कमी झाल्या. मला वाटते, अशी समस्या आणखीही काही जणांना असेल अथवा असू शकते, म्हणून त्यांच्यासाठी हे घरगुती उपाय इथे देत आहे.

      खरे तर शिंका येणे ही प्रक्रिया अॅलर्जीपासून बचाव करणारी स्वाभाविक क्रिया आहे. पण रोज सकाळी चार-पाच पेक्षा अधिक शिंका येणं, ही सामान्य गोष्ट नाही. कित्येकदा शिंकेबरोबरच नाक वाहणे, नाक बंद होणे, डोळ्यांमध्ये जळजळ अशासारख्या समस्यादेखील उदभवतात. यापासून आराम मिळण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकतो.
हळद
आयुर्वेदात हळदीचा धूर हुंगण्याच्या प्रक्रियेला हर्बल स्मोकिंग म्हटले जाते. यात एक-दोन चमचा हळद पूड घेऊन गरम तव्यावर ठेवून त्यातून निघणारा धूर हुंगला जातो. तव्यावर एक चमचा तूप सोडून त्यात हळदपूड टाकूनदेखील धूर हुंगला जाऊ शकतो.
काळी मिरी
पाच-सात काळी मिरी आणि एक चिमूट हळदपूड पेपर लिफ म्हणजे काळी मिरीच्या पानामध्ये ठेवून चांगल्या प्रकारे त्याची गुंडाळी करावी. मग त्याला थोडे गरम करावे. ब्रश केल्यानंतर लगेच ते चावावे. मुलांना मात्र हे देऊ नका कारण यामुळे तोंडात आणि छातीत जळजळ होऊ शकते.
शेवग्याची पाने
डर्मस्टिक म्हणजेचे शेवग्याची पाने आणि लसूण यांची चांगल्याप्रकारे पेस्ट करून घ्यावी. ते कपड्याला किंवा रुमालाला लावावे आणि हुंगावे. शेवग्याची पाने उपलब्ध झाली नाहीत तर तुळशीच्या पानांचादेखील उपयोग करू शकता.
बडीशोप
एंटीऑक्सिडेंट्सच्या कारणामुळे बडीशोपचा उपयोग हर्बल टीसारखा केला जातो. यामुळे अॅलर्जीविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती इकसित होते. अशा प्रकारे काळी मिरीचादेखील उपयोग केला जाऊ शकतो बडीशोप तुमची पाचनशक्तीसुद्धा सुधारण्यास मदत करते.
मेथीच्या बिया
एक कप पाण्यात मेथीच्या दोन-तीन चमच्या बिया घेऊन उकळवा. ज्यावेळेला पाणी उकळून निम्मे होईल, तेव्हा ते थोडे थंड झाल्यावर घोट घोट प्या. दिवसभरात दोन-तीन वेळा घेतल्यास फरक पडतो.
खाऊची पाने
दोन-तीन खाऊची पाने पिळून त्याचा रस काढा. त्यात अर्धा चमचा मध मिसळून सेवन करा. कफ, ॅलर्जी आणि सर्दीसाठीदेखील फायद्याचे आहे.
सिट्स फ्रूट्स
प्लेवनॉइड्सासलेल्या संत्री,लिंबू,डाळिंब यासारख्या फळांमध्ये अँटीऑक्सिडेंट्स असते, जे म्यूनिटी वाढवण्यास मदत करतात. हे कोल्ड आणि अॅलर्जीकारक बॅक्टेरियाशी लढतात. अशा वेळेला यापैकी कोणतेही एक फळ रोज खायला हरकत नाही.

No comments:

Post a Comment