Thursday, November 2, 2017

हसत जगावे


वॉट्स अ
एकदा शिक्षकांनी बंड्याला विचारले, जर 1947 ला वॉट्स अॅप होता,तर काय झाले असते?
बंड्या लगेच म्हणाला, बरं झालं त्यावेळेला वॉट्स अॅप नव्हता, नाही तर स्वातंत्र्य लध्यात कोणीच उतरलं नसतं. ॠगळेच घरात बसूनच मेसेज करत राहिले असते, इस मेसेज को इतना फैलाओ, अंग्रेज खुद ही भारत छोडकर भाग जाए।

मेडल
बंड्या गुंड्याच्या घरी आला होता. तिथे त्याला टीव्हीच्या शोकेसवर दोन मेडल दिसले. यावर तो गुंड्याला म्हणाला, अरे, हे मेडल तुला कशासाठी मिळाला?
गुंड्या: दोन्ही मेडल गाण्यासाठी मिळाले.
बंड्या: पण,एक मेडल लहान आणि एक मोठा का?
गुंड्या: लहान मेडल गाणे गाण्यासाठी आणि मोठा मेडल गाणे बंद करण्यासाठी!

बदाम
गीता: रोज रोज बदाम खाल्ल्याने काय होईल?
नीता: आणखी काय होईल? बदाम संपतील.

चायनीज
एक वेडा: तू अमेरिकन आहेस ना?
चिनी: नाही हो, मी चायनीज आहे.
वेडा: नाही,तू अमेरिकनच आहेस.
चिनी: (वैतागाने) हो हो, मी अमेरिकनच आहे.
वेडा: अरे व्वा! पण दिसतो पक्का चायनीज!

री-सायकलिंग
शिक्षक: अंत्या, सांग बरं री-सायकलिंग कशाला म्हणतात?
अंत्या:सायकल चालवल्याने पाय दुखले, म्हणून बाइक घेतली. बाइक चालवल्याने पाठदुखी वाढली. मग फोर व्हीलर घेतली.पण फोर व्हीलर चालवल्याने पोट सुटले. मग जीमला जावं लागलं. जीमला गेल्यावर मग काय! पुन्हा परत सायकल मिळाली. यालाच म्हणतात री-सायकलिंग!

No comments:

Post a Comment