Tuesday, November 7, 2017

मुंबई आणि सिनेमा


      मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे तशी ती कलेच्या क्षेत्रातलीही राजधानी आहे असं म्हणायला हरकत नाहीपुणं हे कलेचं माहेरघर असलं तरी खऱ्या अर्थाने सिनेमासिरियल्सनाटक यांची निर्मिती प्रक्रिया मुंबईत होते.सतीश राजवाडेच्या 'मुंबई-पुणे-मुंबई'ने मिळवलेल्या यशानंतर आता त्याचा हिंदी रिमेक येऊ घातलाय. 'मुंबई-दिल्ली-मुंबईअसं त्याचं नाव असून हिंदीत गेलेल्या अनेक मराठी दिग्दर्शकांप्रमाणे सतीश बॉलिवुडमध्ये आपला ठसा उमटवायला सिद्ध झाला आहे

     डॅनी बोएल निर्मित "बॉम्बे वेलवेट", राम गोपाल वर्मांचा ''बिझिनेस मॅनआणि "डीपार्टमेंट", अंकुश भट्ट यांचा "भिंडी बझार आयएनसी", संजय सिंह मस्तान यांचा "मुंबई चकाचकआणि एकता क "मुंबई सालसा" (२००७), "स्लमडॉग मिलीनेयर" (२००८), जाने तू ... या जाने ना(२००८), "मुंबई मेरी जान" (२००८), आणि "तुम मिले" (२००९इत्यादी चित्रपटात दाखवला गेला आहे.
     
मुंबई हा विषय समाजाला आणि सर्व धर्मांना बांधून ठेवतोमुंबई हे भारतातील एकमेव शहर आहे जे तुम्हाला संधी प्रदान करते आणि तुम्हाला जे काही करायचे आहे त्याची मुभा देतेसंपूर्ण देशभरातून माणसे या शहरात महत्त्वाकांक्षा घेऊन येतात आणि बहुतांश लोकांच्या त्या साकार होतातमुंबई हे यशाचे रूपक आहेया शहराचे सर्वांनाच प्रचंड आकर्षण आहेमुंबईकर मुंबईला अत्यंत पूज्य मानतात तसेच मुंबईकरांना मुंबई बद्दल अतोनात आपुलकी वाटते आणि त्यावर नित्सिम प्रेम करतातमुंबईच्या विश्वव्यापी आकर्षणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे ह्या शहराची सर्वदेशीय तत्त्वे आहेतमुंबई हे शहर असे आहे जे कधीच झोपत नाहीजो कोणी इथे येतोतो इथलाच होऊन जातो. "ए दिल है मुश्किल.. " ह्या गाण्या मध्ये मध्ये गीता दत्त गाते तेच खरे "ये हैं मुंबई मेरी जान".  जुलै १८९६ मध्ये अरायव्हल ऑफ दी ट्रेन’, ‘बेबीज डिनर’ यासारख्या ल्यूमिए बंधूच्या चित्रपटापासून स्फूर्ती घेऊन सावेदादा (हरिश्चंद्र भाटवडेकरयांनी नोव्हेंबर १८९९ मध्ये द रेस्लर्स’ आणि मॅन अँड मंकी’ हे दोन लघुपट बनविलेकलकत्त्यामध्ये रॉयल बायोस्कोपच्या हिरालाल सेन आणि त्यांच्या बंधूंनी सात बंगाली नाटकांची दृश्ये व नृत्ये चित्रीत करून फेब्रुवारी १९०१मध्ये पडद्यावर दाखविलीआता हा इतिहास वाचताना स्वदादासाहेब फाळक्यांना आपण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक का म्हणतोअसा प्रश्न तुम्हाला पडणे अत्यंत स्वाभाविक आहेत्यासाठी थोडं पुढे जायला हवं.
     मोठ्या महानगरांचे आकर्षण सगळ्यांनाच आहेमुंबईरंगूनलंडनलाहोरबगदादन्यूयॉर्कदिल्ली अशा अनेक  जगभरातल्या मोठ्या शहरांचा उल्लेखतिथे घडलेले किस्सेघटनाकथाकादंबर्‍यांमध्ये सतत येत राहतातआपला बॉलीवूड सिनेमाही मग  याला अपवाद कसा असणार?  बॉलीवूडच्या अनेक  सिनेमामध्ये अशी पुष्कळ महानगरे दिसली आहेतत्यांच्या नावावर चित्रपट आले आहेतमुंबई तर सगळ्यांची आवडती आहे.  विशेष म्हणजे भारतीय सिनेमाचा इतिहास आणि निर्मिती सुरूवात मुंबईतूनच  झालीअशा या मुंबईच्या नावानेही चित्रपट निघालेमुंबईच्या नावावरून तब्बल १०१ चित्रपट निघाले आहेतयात डॉक्युमेंट्रीचित्रपटटेलीफिल्म यांचा समावेश आहे.
     मुंबई या मायानगरीला पूर्वी बॉम्बेबंबई या नावानेही संबोधले जात होतेत्यामुळे त्या नावावरूनही अनेक चित्रपट निघाले७ जुलै १८९६ रोजी लुमिअर बंधूंनी पहिल्यांदा मुंबईत आपल्या चित्रपटाचा शो केला होतायानंतर ठिक दोन वर्षांनी १८९८ मध्ये हिरालाल सेन यांनी 'द फ्लॉवर ऑफ पर्सियाची निर्मिती व प्रदर्शन करून भारतातले पहिले चित्रपट निर्माता बनण्याचा बहुमान मिळवला.  काहीजणांचं म्हणणं आहे कीहरिश्चंद्र एसभातवडेकर पहिले भारतीय निर्माता आहेतज्याम्नी १८९९ मध्ये 'द रेसलर्सबनवला होतामात्र भारतीय चित्रपटसृस्टीत ज्या शहराच्या नावे पहिला चित्रपट निघाला तो होता 'मुंबई'. १९०० मध्ये एफबी थानावाला यांनी दोन डॉक्युमेंट्री फिल्मे बनवलीएक होतीस्पलेंडिड न्यू व्यू ऑफ बाँबे आणि दुसरी होतीताबूत प्रोसेशन एट कलाबादेवी बाँबेस्वातंत्र्यापर्यंत २६ चित्रपट बनण्याचा विक्रमी इतिहाससुद्धा मुंबईच्याच नावावर आहे.
     मुंबई या नावावर  चित्रपट बनविण्याचे खरे श्रेय निर्मातादिग्दर्शक नानूभाई वकील यांच्याकडे जाते.  त्यांनी १९३१ मध्ये 'अलबेली बंबईनावाचा चित्रपट बनवला होताअर्थात त्याबबतची विशेष माहिती आज उपलब्ध नाही.  भारताला स्वातंत्र्य मिळण्याअगोअदर जे काही चित्रपट निघाले त्यात बलवंत भट्ट दिग्दर्शित आणि लल्लू भाई आणि पन्ना राणी अभिनित बंबई की मोहिनी १९३४), रसिक भट्ट दिग्दर्शित लल्लू भाईगुलाब आणि पन्ना राणी अभिनित बंबई की सेठानी १९३५), नंदलाल जसवंत लाल दिग्दर्शित रुबी मेयर्स आणि डी बिलिमोरिया अभिनित बंबई की बिल्ली १९३६) , नानूभाई वकील दिगदर्शित चंदाबाईहदीजाल आणि नूरजहां अभिनित मिस्टर अँड मिसेज बाँबे १९३६), सर्वोत्तम बदामी दिग्दर्शित शोभना समर्थसविता देवी व ई बिलिमोरिया अभिनित बंबई की सैर १९४१), आणि होमी वाडिया दिग्दर्शित आणि नादियाचा स्टंट चित्रपट बंबईवाली १९४१चित्रपट प्रदर्शित झालेदोन विदेशी कंपन्यांनीही इंग्रजी भाषेत बंबई नावावर चित्रपट बनवले.

     ६ जानेवारी १९३४ रोजी अमेरिकेत प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक एडविन एल मरीन यांचा बाँबे मेल (१९३४व अमेरिकेच्याच क्लॉरेंस ब्राऊन यांचा २७ जून १९४१ ला दे मेट इन बाँबे नावाचा रोमांटिक चित्रपट आलास्वातंत्र्यानंतर मुंबई फिल्मोद्योगाची स्थापना झालीमुंबई स्वप्नांची नगरी बनलीत्यामुळे चित्रपटांची नावे ठेवताना मुंबई शहरावर आपोआप जोर धरला जाऊ लागलास्वातंत्र्यानंतर मुंबई नावावर पहिला चित्रपट निघाला तो,  बाँबे१९४९ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सी आरबजाज यांनी दिग्दर्शित केला होता१९६० पर्यंत भारत आणि अमेरिकेमध्ये मुंबई नावावरून एकूण चार चित्रपटांची निर्मिती झालीदिग्दर्शक केदार कपूर यांनी १९५७ मध्ये मिस बाँबे नावाचा चित्रपट बनवलाराज खोसला यांनी देव आनंद आणि सुचित्राला घेऊन १९६० मध्ये बंबई का बाबू बनवलाया दशकात इंग्रजी भाषेतसुद्धा दोन चित्रपट निघालेफ्रेड एफ सीयर्स यांनी लास्ट ट्रेन फ्रॉम बाँबे १९५२), आणि टेरेंस फिशर यांनी १८३० च्या कालखंडावर आधारित क्राइम थ्रीलर द स्ट्रँग्लर्स ऑफ बाँबे १९५९ची निर्मिती केलीयानम्तर मुंबई शीर्षक असलेल्या चित्रपतांची चलतीच सुरू झालीएस.डीनारंग दिग्दर्शित बंबई का चोर (१९६२), पी एलसंतोशी यांचा हॉली डे इन बॉंबे (१९६३), शांतीलाल सोनींचा मिएक्स इन बाँबे १९६४आणि जौहर इन बॉम्बे१९६७), ख्वाजा अहमद अब्बास यांचा बंबई की रात की बाहो में १९६८व एस रामनाथन यांचा बॉम्बे टू गोवा१९७०)
     १९८० मध्ये शिबू मित्रा यांनी बंबई का महाराजा १९८०दिग्दर्शित केलातर दिग्दर्शक बृज याम्नी बॉम्बे ४०५      १९८०)   आणला.  या  दशकातसुद्धा  दोन विदेशी निर्मात्यांनी  मुंबईच्या नावावर दोन चित्रपट काढलेबाँबे टॉकी    (१९७०आणि डाकपिन सी ज्युनिअर बाँबे १९७९).जेम्स आयवरी दिग्दर्शित बॉम्बी टॉकी पोर्तुगिज कंपनीद्वारा निर्मिती एक रोमांटिक इंग्रजी चित्रपट होताज्यात शशी कपूर आणि त्याची पत्नी जेनेफर केंडेल यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्याडाकपिन सी ज्युनिअर बाँबे फिलीफिन्स भाषेत बनवला गेला होता.
     नव्वद दशकाच्या शेवटाला ज्या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवून दिली तो सलाम बाँबे (१९८८प्रदर्शित झालामीरा नायर यांच्या या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावलेऑस्करलाही धडक दिलीमनिरत्नम यांचा बॉम्बे १९९५मुंबई दंगलीवर आधारित चित्रपटात अरविंद स्वामी आणि मनिषा कोईराला यांनी भूमिका केल्यायाच दशकात आणखी तीन चित्रपट प्रदर्शित झालेसतीश रणदिवे दिग्दर्शित मुंबई टू मॉरिशस १९९१), विक्रम भट्ट दिग्दर्शित बंबई का बाऊ १९९६आणि कैजाद गुस्ताद यांचा इंग्रजीबरोबरच हिंदीत डब करण्यात आलेला बॉम्बे बॉईज (१९९८)
     २०११ मध्ये  हिंदीमल्याळम आणि इंग्रजी या तीन भाषेत तीन चित्रपट आले२१ जानेवारी रोजी रिलीज झालेला अमिर प्रॉडक्शनचा मुंबई डायरीज धोबीघाट हिंदीत आलात्याचे दिग्दर्शन किरण रावने केले होतेचित्रपट चालला नाही परंतुसादरीकरन आणि नवा अंदाज यामुळे चर्चेत राहिलाजर्नादन यांनी ममूटी व रोमा यांना घेऊन मल्याळी भाषेत बॉम्बे मार्च (१९९३बनवला होतातर अमेरिकी दिग्दर्शक केविन ग्रँडी यांनी नाईट इन बाँबे आणला२००७ मध्यी बनवला गेलेला जर्नी बॉम्बे टू गोवा२००७या काँएडी चित्रपटाचाही उल्लेख करावा लागेलयाचे दिग्दर्शन राजू पेंडुरकरने केले होतेयात राजू श्रीवास्तवसुनील पाल आदी काँएडी कलाकारांनी काम केले होतेया दशकातील अन्य चित्रपटाम्मध्ये लीना कोपेल यांनी बॉम्बे ड्रीम्स (२००४), रिता रानी दिग्दर्शित बॉम्बे स्काइज (२००६हा इंग्रजी चित्रपट आणि नागेश कुकनूरच्या बॉम्बे टू बँकॉक २००८यांचा समावेश आहे.  

No comments:

Post a Comment