आपलं जीवन वेगवान
झालं आहे. आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग
येतात की, निर्णयदेखील पटकन घ्यावे लागतात. हे निर्णय चुकीचे आहेत की, बरोबर आहेत यापेक्षा निर्णय
घेणं महत्त्वाचं असतं. कारण योग्य वेळेला निर्णय घेतला नाहीत
तर फार मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. आलेली संधी गमावणं
भारी पडू शकतं. आता निर्णय घेतल्याच्या दोन शक्यता असतात.
एक तर हा घेतलेला निर्णय तुमच्या फायद्याचा ठरू शकतो किंवा तोट्याचा!
योग्य असेल तर तुमचा फायदा हा होणारच असतो. मात्र,निर्णय चुकला असेल तर त्यातून तुमचं नुकसान होणार असलं तरी त्यातून आपला एक
फायदाही होत असतो, ते म्हणजे यातून तुम्हाला शिकायला मिळते.
आपलं आयुष्य योग्य प्रकारे जगायचं असेल तर निर्णय घेण्याच्या कलेत प्राविण्य
मिळवायला हवं. यासाठी काही खास प्रयत्न करावे लागणार आहेत.त्या कोणत्या गोष्टी आहेत,त्या पाहू.
चुकीचे असले तरी
बरोबरच!
ज्यांना नेहमी
योग्य निर्णय असावा, असे वाटतं, असे लोक नेहमी निर्णय घेण्यास असमर्थ ठरतात.
असे लोक मागेच राहतात. खरे तर या गोष्टी आपण लक्षात
ठेवल्या पाहिजेत की, आपण माणूस आहे. चुकणे
हा आपला स्वभागधर्म आहे. आणि पुढे पाऊल टाकल्याशिवाय ते पाऊल
चुकीच्या ठिकाणी पडले आहे, हे कसे कळणार? यातूनच आपल्याला शिकायला मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक
निर्णयाला अत्यांधिक सावधानता बाळगणं योग्य नाही. काही लोक तुम्हाला
सणकी म्हणतील.मात्र सुरुवातीला तुमचे निर्णय चुकीचे ठरतील,
सारखे नाही. कारण त्यातून तुम्हाला शिकायला मिळणार
आहे. आणि चुकीच्या निर्णयाची शक्यता गृहीत धरल्यानंतर निर्माण
होणार्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी आपण करू शकतो.
गोंधळात पडू नका
बरेच लोक निर्णय
घेण्याच्या अगोदरच पार गोंधळून जातात. होणार्या परिणामांच्या शक्यतेने इतका विचार
करतात की, त्यात ते पार गुंतून जातात. चक्रव्युहात
अडकून पडतात. एखाद्या छोट्याशा गोष्टीचे विश्लेषण करण्यात अडकून पडल्याने ते साधा निर्णय घेण्यास असमर्थ ठरतात.
यामुळे त्यांचे दोन प्रकारे नुकसान होते.एक म्हणजे
त्यांच्या डोक्यात द्वंद्व सुरू राहतं. उसरे म्हणजे ते स्वत:च निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अडकून पडल्याने याचा फायदा प्रतिद्वंद्वी घेतो.
अनेक विकल्पांवर विचार करून करून आपण आपली ऊर्जा गमावतो. ही माणसे विरोधकांचा छोटासा डावदेखील हाणून पाडू शकत नाहीत.
आपल्या मनाचा आवाज
ऐका
कित्येकदा माणसे
स्वत:चा वाजवीपेक्षा जास्त विचार करतात
आणि गोंधळात अडकून पडतात. तुम्हाला तुमच्या स्वत:च्या समजुतीनुसार
निर्णय घेता आला पाहिजे. दिखावेपणा दाखवण्याच्या नादात आपल्या
आतल्या आवाजाला दाबून ठेवू नका. आपल्या आतून आलेल्या आवाजात खरेपणा
असतो. मनाचा आवाज तोच खरा आवाज असतो. याच्या
आधारावर तुम्ही जो निर्णय घ्याल, तो कधीही चुकीचा असू शकत नाही.
डेडलाइन निश्चित करा
महत्त्वपूर्ण निर्णय
घेताना फायद्या-तोट्याचा विचार
तर करायलाच हवा,मात्र त्याच्या विश्लेषणात
अडकून पडून निर्णय घेण्याची योग्य वेळ गमावून बसणे, हे योग्य
नव्हे. यापासून बचाव करताना स्वत:साठी एक
डेडलाइन निश्चित करा. निश्चित डेडलाइनपर्यंत निर्णय आवश्य घ्यायला हवा. यानंतर
तुम्हाला आपल्या निर्णयावर विचार करण्याची आवश्यकता नाही.
No comments:
Post a Comment