1) विवेकभ्रष्ट तरुण निश्चितपणे दुर्गतीकडे जातो-भर्तृहरी
2) मनुष्याजवळची नम्रता संपली म्हणजे
त्याच्याजवळची माणुसकी संपली असे समजावे-सानेगुरुजी
3) कोणत्याही विषयावरील उत्तमोत्तम विचार
याचे नाव संस्कृती-न.चिं. केळकर
4) सत्यप्राप्तीची पहिली अट धाडस हीच
आहे-ओशो
5) कलेशी प्रामाणिक राहिलं, तर परमात्मा काही कमी पडू देत नाही.-पं.भीमसेन जोशी
6) दूरदृष्टीचा मनुष्य प्रत्येक प्रसंगास
सज्ज असतो.-तिरुवल्लूवरन
7) नीती म्हणजे शहाणपणाने जगण्याची रीती-प्र.के. अत्रे
8) गर्विष्ठ माणूस आपली स्तुती स्वत:च गातो, तर विनयशील माणसाची स्तुती दुसर्याला करावी लागते.- आप्पासाहेब पटवर्धन
9) केलेल्या अपराधांचे प्रायश्चित घेण्यास धैर्य लागते.-प्रा. वसंत कानेटकर
10) चुकांकडे डोळेझाक केली तर सत्य तुमच्याकडे
पाठ फिरवेल.-गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर
11) क्रोध म्हणजे दुसर्यांनी केलेल्या चुकीबद्दल स्वत:ला शिक्षा देणे.-सरश्री
12) उघड शत्रूंपेक्षा विविध प्रलोभनांच्या
रुपाने वावरणारे छुपे शत्रू जास्त घातक असतात.-भानू काळे
13) अन्यायाने मिळवलेल्या ऐश्वर्यापेक्षा दारिद्य बरे.-कृष्णशास्त्री
चिपळूणकर
14) भक्कम देहापेक्षा भक्कम मनाशीच शौर्याचा
संबंध अधिक असतो.-पु.ल.देशपांडे
15) एक अडचण दहा उपदेशांपेक्षा अधिक शिकवण
देऊ शकते.-चिं.वि. जोशी
16) सोन्याच्या हारापेक्षा घामाच्या धारा
अधिक शोभतात.-लोकमान्य टिळक
17) अज्ञान व भोळसरपणामुळे सर्वत्र जुलूमच
चालतो असा नेम आहे.- लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
18) सत्कृत्ये या जगात अमरत्व देणारी अपूर्व
रसायने आहेत.-स्वा. सावरकर
19) सरळ झाडे कापली जातात, वेड्यावाकड्या झाडांच्या वाटेला कुणी जात नाही.-आर्य
चाणक्य
20) दु:खी माणसाला
मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन
हातांपेक्षा उपयुक्त आहे.-स्वामी विवेकानंद
21) ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्या
लोकांचा उद्धार करणे हे आपले कर्तव्य आहे.-डॉ.बाबासाहेब आंबेडकर
22) कोणाकडूनही कृपेची याचना करणे म्हणजे
स्वत:चे स्वातंत्र्य गमावणे आहे.- महात्मा
गांधी
23) मोठ्या गोष्टींचे फक्त बेत करण्यापेक्षा
एखाद्या छोट्या गोष्टीचा आरंभ करणे अधिक श्रेयस्कर.-स्वामी विवेकानंद
24) तुम्हाला पुढे जाणे जमत नसेल तर जाऊ
नका,परंतु पुढे जाणार्याला मागे खेचू नका.-लोकमान्य टिळक
25) सुप्त चैतन्य आणि निद्रिस्त शक्ती जागृत
करण्याचे एक साधन म्हणजे शिक्षण होय.-विनोबा भावे
26) चारित्र्यात सूर्याची तेजस्विता आणि
अंत:करणात चंद्राची शीतलता हवी.-सदगुरू
काका महाराज
27) शिखरापर्यंत पोहचण्यासाठी पायापासून
सुरुवात करा.-श्री महावीरस्वामी
28) शौर्य हे मनात असावे लागते,
ते नसले तर चिलखत व हत्यारे हे ओझेच ठरतील.-संत
तुकाराम
(मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या
संग्रहातून)
No comments:
Post a Comment