अकरा वर्षांचे आदित्य आणि आराध्या सहावीच्या
वर्गात शिकत होते. दोघेही जुळी भाऊ-बहीण आहेत.त्यामुळे त्यांच्यात बरेच साम्यही आहे.
दोघेही अभ्यासात कुशाग्र बुद्धीचे आहेत. शाळेतील
शिक्षक त्यांच्या प्रतिभेची प्रशंसा करताना थकत नाहीत.
आराध्या आणि आदित्यला पोहण्याचा मोठा
छंद होता. ते पोहायला काही दिवसांतच शिकले आणि पट्टीचे पोहणारे
झाले. त्यांच्या कॉलनीतच असलेल्या एका छोट्या स्विमिंग पूलमध्ये
दोघेही दर रविवारी सकाळी नऊ वाजता पोहायला जात.
अशाच एका रविवारी दोघेही स्विमिंग पूलमध्ये
पोहायला गेले. त्यावेळी तिथे कोणीही नव्हते.
एवढेच नव्हे तर लाइफ गार्डदेखील तिथे नव्हता. दोघा
भावंडांनी पोहण्याची तयारी चालवली होती. तेवढ्यात वंदना,
जी त्यांच्याच शाळेत सातवीत शिकत होती,ती मोठमोठ्या
ओरडू लागली.ङ्घ वाचवा, वाचवा, माझा भाऊ पाण्यात पडला, वाचवा. ङ्घ ती तिच्या भावाला स्विमिंग पुलाकडे फिरायला घेऊन आली होती आणि तो तिच्या
हातून सुटून पाण्यात पडला होता.
छोटे असूनही त्यांना परिस्थितीचे गांभिर्य
लक्षात आले. ते धावतच वंदनाजवळ गेले आणि वंदना
म्हणाले,घाबरू नको, ताई! आम्ही आहोत, आम्हाला पोहायला येते. आम्ही त्याला बाहेर काढू.ङ्घ असे म्हणून दोघांनीही आहे
कपड्यांत पाण्यात उडी घेतली आणि त्या लहान मुलाला हळूच बाहेर काढले. तेवढ्यात तिथे लाइफ-गार्डदेखील आला. त्याने परिस्थितीचा अंदाज घेतला आणि मुलाला सरळ उताणे झोपवून त्याचे पोट दाबायला
सुरुवात केली. पोटात गेलेले पाणी तोंडावाटे बाहेर आले.
थोड्या वेळाने मुलाला आराम पडला.
लाइफ-गार्ड आदित्य आणि आराध्यासह मुलाला घेऊन त्याच्या घरी गेले. घडला प्रकार सांगितला. आता मुलगा बरा असल्याचे सांगितले.
आपल्या मुलाला सुखरुप पाहून त्याच्या आई-वडिलांना
मोठा आनंद झाला. त्यांनी दोघा भावंडांचे तोंडभरून कौतुक केले
आणि शाबासकी दिली.ही गोष्ट काही वेळातच संपूर्ण कॉलनीत पसरली.
आदित्य आणि आराध्याच्या घरी कौतुकासाठी लोकांच्या रांगा लागल्या.
दुसर्या दिवशी शाळेच्या पटांगणात मुख्याध्यापिका बाईंनी आदित्य
आणि आराध्याला पुढे बोलावले आणि त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी त्या म्हणाल्या,ङ्घ माझ्या
प्रिय मुलांनो, तुम्ही दोघांनी खूप मोठे साहसाचे काम केले आहे.
तुम्ही एका मुलाचे प्राण वाचवले आहे. या शौर्याबद्दल
तुम्हा दोघांचा 26 जानेवारी रोजी पुरस्कार देऊन सन्मान केला जाईल.
दोघांनीही मुख्याध्यापिकेचा चरण स्पर्श केला आणि आशीर्वाद घेतले.
शाळेतल्या सर्वांनीच आदित्य आणि आराध्याचे कौतुक केले आणि शाबासकी दिली.
No comments:
Post a Comment