Saturday, July 14, 2018

स्टार स्पीक...अनुपम खेर



अनुपम खेर एके ठिकाणी म्हणतात, लोक मला म्हणतात की, तुम्ही तुमच्या जीवनावर आधारित कुछ भी हो सकता है? या नाटकात तुमच्या आयुष्यातले अपयशच का दाखवले. पण माझं उत्तर असं आहे- यश कंटाळवाणं आहे... अपयश मात्र रोमांचक असतं. याचा अर्थ असा की, आपल्या अपयशांना आपल्या जीवनाच्या जबरदस्त यशाच्या रुपात पाहतो. जर ते सगळे नसते तर एक माणूस म्हणून मी खूपच कमकुवत ठरलो असतो. पॉजिटिव थिकिंग हाच माझा मूलमंत्र आहे आणि स्वत:च्या कमतरतेवर मी कधी पडदा टाकत नाही.
     आणखी एका ठिकाणी अनुपमजी म्हणतात, मला ठाऊक नव्हतं की, ॅक्टर कसा बनेन. मुंबईमध्ये कोणाला ओळखत नव्हतो. सिमल्यात अठरा वर्षे लहानाचा मोठा झालो, मला वाटत होतं की, ॅक्टर जसा पडद्यावर दिसतो, तसा प्रत्यक्षात असतो. लार्जर दॅन लाइफ चा भ्रम त्यावेळेला फुटला, ज्यावेळेला सिमल्यात शुटिंग पाहिले होते. तिथे मला कळलं की, ॅक्टरसुद्धा आपल्यासारखेच हाताने भोजन करतात. जर कुणी दुसरा यशस्वी होत असेल तर मग आपणदेखील यशस्वी होऊ शकतो, हे लक्षात ठेवा.
     तो 3 जून 1981 चा दिवस होता. मी मुंबईच्या व्हीटी स्टेशनवर उतरलो. खिशात फक्त 37 रुपये होते. कित्येक रात्री मी रस्त्यावरच,उपाशी पोटीच घालवल्या. लोकांशी खोटे बोललो पण स्वत:शी मात्र खरेच बोललो. शेवटी आजोबांना पत्र लिहिले. त्यात म्हटले, लोक मला धक्के मारून बाहेर काढतात. एनएसडीचा गोल्ड मेडलिस्ट होतो, त्यामुळे अधिक अपमान वाटत होता. आजोबांचे उत्तर आले, लक्षात ठेव, भिजलेला माणूस पावसाला घाबरत नाही. आई-वडिलांनी तुला शिकवण्यासाठी घरातली भांडीकुंदी विकली, घड्याळ विकले, यासाठी केले नाही की, तू परत यावं.
     परिश्रम आणि प्रामाणिकपणाला कोणताच पर्याय नाही. कधी खोटे बोलू नका आणि अपयश पदरी पडले म्हणून घाबरून जाऊ नका. अपयशाच्या कथा या अधिक मनोरंजक असतात आणि यांच्यातूनच त्याचा मार्ग निघतो, ज्याला आपण यश म्हणतो.- अनुपम खेर


No comments:

Post a Comment