Monday, July 9, 2018

(प्रेरक कथा) पराभवाला पर्याय

   
 एकदा एका राजाला आपल्या शत्रू राजाशी युद्ध करायचं होतंसमस्या अशी होती कीहा शत्रू राजा त्याच्यापेक्षा तब्बल दहापट अधिक ताकदवान होता.त्याच्याजवळ मोठ्या प्रमाणात सैन्य आणि शस्त्रे होती.राजाचं सैन्य घाबरलं होतं,पण शेवटी युद्ध तर करावंच लागणार होतं.युद्धभूमीपर्यंत पोहचण्यासाठी राजाला विशाल समुद्रदेखील पार करावा लागणार होताअशा परिस्थितीत राजा आपल्या सैन्यासह जहाजावर सवार झालाजहाज युद्धभूमीच्या दिशेने निघालेयुद्धभूमीवर पोहचल्यावर राजाने जहाज जाळून टाकण्याचा आदेश दिला.हे ऐकल्यावर सगळे सैन्य अंचबित झाले.पण राजाला कुणी प्रश्न करण्याचे धाडस करू शकला नाहीशेवटी त्यांनी राजाच्या सांगण्यावरून जहाजाला आग लावली.जहाज जळून खाक झाले.यानंतर राजा आपल्या सैन्याला म्हणालाआता आपले जहाज तर जळून खाक झाले आहेआता आपण जोपर्यंत जिंकू शकणार नाही,तोपर्यंत  माघारी परतू शकत नाही.आपल्याजवळ आता जिंकण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीएक तर आपण युद्ध जिंकायचं किंवा मरायचं.यानंतर सगळे सैन्य शत्रू सैन्याशी भिडले आणि ईव तोडून लढले.  आणि शेवटी ताकदवान शत्रू सैन्याला मात दिलीआपल्या आयुष्यातदेखील असेच घडत असते.ज्यावेळेला तुम्ही आपले लक्ष्य प्राप्त करताना मागे परतण्याचे सगळे मार्ग जाळून टाकलेले असतात,सगळे रस्ते बंद केलेले असतातत्यावेळेला तुम्ही तुमच्या दृढनिश्चयाने आणि मेहनतीने लढता आणि  आपले लक्ष्य गाठूनच स्वस्थ बसता.
सक्सेस मंत्राअडचणीच्यावेळी मार्ग बदलण्याचा विचार करा,मात्र आपले लक्ष्य टाळू नका.

No comments:

Post a Comment