Friday, July 13, 2018

एलन मस्कच्या काही महत्त्वाच्या टीप्स...


     नवनव्या अभिनव कल्पनांबरोबरच आपल्या मेहनतीच्या जोरावर आज एलन मस्क 18.9 दशलक्ष डॉलरपेक्षाही अधिक संपत्तीचे मालक आहेत. आता तर त्यांनी लोकांना अवकाश सफर घडवून आणण्याची तयारी चालवली आहे. त्यांची इच्छा आहे की, फक्त अंतराळवीरांनीच अवकाशात झेप घ्यावी, असे नव्हे तर सामान्य माणूसदेखील अंतराळातल्या खोलीत डोकावून पाहायला हवे. ते त्यांचे स्वप्न आहे. त्यांचे पर्यावरण वाचवण्याच्या दिशेनेदेखील सातत्याने काम चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा ऑटोमोबाईल उद्योगसुद्धा इको फ्रेंडली बनवण्याच्या दिशेने त्यांचे रात्रंदिवस काम चालू आहे. दानधर्मातही ते आघाडीवर आहेत. एकूण काय तर ते यशाच्या अशा शिखरावर पोहचले आहेत, जिथे प्रत्येक बिझनेसमन पोहचण्याची स्वप्नं पाहात असतो. तुम्ही बिझनेस सुरू केला आहे आणि तुम्हालादेखील एलन मस्कप्रमाणे यशस्वी व्हायचं असेल तर त्यांनी नवीन नवीन बनलेल्या उद्योजकांना ज्या टीप्स दिल्या आहेत, त्या जाणून घ्या आणि आयुष्यात यशस्वी व्हा. त्यांनी सांगितलेल्या टीप्स नक्कीच तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यात उपयोगी पडणार आहेत. जर तुम्ही त्या टीप्स अगदी मनापासून फालो केला तर तुम्हाला यश तुमच्या पायाशी लोळण घेतल्याचे पाहायला मिळेल. तर जाणून घेऊ या एलन मस्क काय म्हणतात ते!

स्वत: मैदानात उतरा
मस्क यांनी टेस्ला कंपनी कार्यालयाच्या कुठल्याशा एका कोपर्यात बसून एम्प्लॉइज लोकांनी काम करावं, अशी काही त्यांनी स्वप्नं पाहिली नव्हती. मस्क म्हणतात की, कंपनी प्रमुख म्हणून आपल्याला अशी सगळी कामं करावी लागणार असली तरी  तुमच्यापुढे कोणतेही काम येवो, कुठल्याही वेळी येवो, तुम्हाला ते करण्यासाठी सदैव तयार राहायला हवे. अर्थात हे फोनचे उत्तर देण्याचे असो किंवा कार्यालय, कीचन स्वच्छ करण्याचे काम असो. त्यामुळे हाताच्या बाह्या मागे सारून कार्यालय, कीचन स्वच्छ करण्यापर्यंतची सर्व कामे करायला तत्पर राहायला हवे.
फीडबॅक घ्या
बिझनेस सुरू करताना ट्रायल आणि एरर मोठ्या प्रमाणात येतं.त्यामुळे मास्क फीडबॅक घेण्यावर अधिक जोर देतात. त्यांच्या मतानुसार कोणत्याही एन्टरप्रेन्योरला जितकं घेता येईल,तितकं फीडबॅक घ्यायला हवं.आपली आयडिया काहीही असो,पण लोकांची मते जाणून घ्यायला हवीत. लोकांना विचारायला हवं, काय चुकीचे होत आहे आणि काय बरोबर चालले आहे.
 टीका स्वीकारा
एलन मास्क यांनी 2013 मध्ये एका कार्यक्रमात सांगितले होते की, दुसऱ्यांकडून मिळणारी रचनात्मक टीका अमूल्य असते. कित्येकदा टीका सहन करणे अवघड जाते,पण हा तर शिकण्याच्या प्रक्रियेतील भाग आहे. कुठलीही टीका वैयक्तिक पातळीवर घेऊ नये. कारण कोणत्याही प्रोजेक्टमध्ये कधी ना कधी चुका होत असतात. आणि टीकेमुळेच तुम्ही त्यांना ओळखू शकता.
 ब्रॅंडला वेगळी ओळख द्या 
कन्ज्युमर स्पेस आज अगोदरच खुपशा बिझनेसने भरून गेले आहे. त्यांच्याजवळ अगोदरच भरपूर अशी ब्रॅंड आहेत. ते त्यांच्या सर्व्हिसवर  विश्वास ठेवतात.त्यामुळे मस्क यांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला त्यांच्या स्पेसमध्ये आपली जागा बनवण्यासाठी आपल्या ब्रांडला वेगळी ओळख द्यावी लागेल. तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्विस त्यांच्यापेक्षा उत्तम असली पाहिजे.तरच ते तुमच्यावर विश्वास ठेवतील.
 पैशांवर फोकस नको 
एलन मस्क यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी टेस्लाचा पाया कधी पैसे कमावण्यासाठी घातला नाही.उलट त्यांनी पर्यावरणाची गरज त्यांनी ओळखली आणि त्यानुसार वाहनांमध्ये बदल करण्याचा विचार केला. आणि त्यामुळे त्यांनी इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल कंपनीची सुरुवात केली.
 व्हिजन असायला हवे
एकादा एन्टरप्रेन्योर तेव्हाच यशस्वी होतो,जेव्हा त्याच्याजवळ एक क्लिअर व्हिजन असेल.यामुळे तुम्ही योग्य प्रकारे ओळखू शकता, की काय चांगले आहे आणि कोणत्या गोष्टींपासून तुम्हाला सावध राहायला हवे.योग्य व्हिजन एका दुर्बीणसारखे असते.
 पैशनेट रहा 
तुम्हाला एकादी कंपनी सुरू करायची आहे किंवा मग एकादा जॉब एक्सेप्ट करायचा आहे,तेव्हा तुम्ही त्याबाबतीत पैशनेट नसाल तर कधीच यशस्वी होणार नाही.ते म्हणतात की, आज मला पैशांची गरज नाही. कारण जे काही आहे,ते सर्व खरेदी केलेले आहे. पण तरीही प्रत्येक वेळेला पुढे जाण्याबाबतचाच विचार करत असतो. कारण मी माझ्या कामाच्याबाबतीत पैशनेट आहे.
 सर्व काही सहन करायचे आहे
एकदा टेस्लाची फॅक्टरी विझिट करायला आलेल्या ड्रपर यूनिवर्सिटीच्या विद्यार्थ्यांना मस्क म्हणाले होते की , एक कंपनी सुरू करणे खूप अवघड आहे.ही फारच क्लेशकारक गोष्ट आहे. हे म्हणजे काच खाताना हसण्यासारखे आहे. जर तुम्ही असेच काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याचा चांगला लाभ होईल.

No comments:

Post a Comment