Saturday, July 14, 2018

खेळाडू बनताहेत रोल मॉडेल


     सध्या तरी बॉलीवूडमध्ये बायोपिकचा पूरच आला आहे, असं दिसतं. विशेष म्हणजे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: सोनं पिकवत आहेत. अलिकडेच प्रदर्शित झालेला सुरमा असाच एक बायोपिक आहे, जो हॉकीपटू संदीप सिंहच्या कथेवर आधारलेला आहे. यापूर्वी मेरीकॉम, एमएस धोनी, भाग मिल्खा भाग, दंगल आणि सत्य घटनेवर आधारित चक दे इंडिया या चित्रपटांना रेकॉर्डतोड यश मिळाले होते. शिवाय पानसिंह तोमरला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे.

      असे चित्रपट निश्चितच देशातील खेळ संस्कृतीचा विकास करण्याला हातभार लावत आहेत. हा दंगल चित्रपटाचा सामान्यजनांवर पडलेला प्रभावच म्हटला पाहिजे. कारण कुस्ती क्षेत्रात महिलांचे वाढते आगमन आश्चर्यकारक म्हटले पाहिजे. देशातला तरुण वर्ग आज खेळाला करिअर बनवू पाहतो आहे. खरे तर भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशासाठी ही सुवार्ताच म्हटली पाहिजे. देशातल्या तरुण-तरुणी खेळाडूंना आपला रोल मॉडेल म्हणून पाहात आहेत. याचे श्रेय नक्कीच आजच्या बॉलीवूड चित्रपटांनाही द्यावे लागेल.
2002 मध्ये मँचेस्टरकॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड जिंकल्याची कथा ज्यावेळेला चक दे इंडिया मध्ये दाखवण्यात आली, त्यावेळेला त्याचा महिला हॉकीवर सकारात्मक प्रभाव पडला. चित्रपट प्रदर्शित होऊन आज आठ वर्षे होत आहेत, एवढ्या कालावधीत भारतीय महिलांचा संघ या खेळात गेल्या 36 वर्षांमध्ये  ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाइ करण्यात यशस्वी झाला आहे. अशा प्रकारे मेरीकॉमवर प्रभावित होऊन मोठ्या संख्येने मुली बॉक्सिंग क्षेत्राकडे वळल्या. भाग मिल्खा भाग पूर्वी आजच्या पिढीला मिल्खासिंहचे खेळातील योगदान ठाऊकही नव्हते. पण या चित्रपटांमुळे आज मिल्खासिंह, पान सिंह तोमर, गीता फोगट आणि मेरीकॉम आजच्या युवा पिढीचे रोल मॉडेल बनले आहेत.
     आज सिनेप्रेक्षकांना सत्य घटनांवरची आवड वाढताना दिसत आहे, शिवाय त्यांच्याकडून प्रेरणा घेताना दिसत आहेत. त्यामुळे सचिन ए बिलियन ड्रिम्स सारख्या डॉक्यूमेंट्री चित्रपटांना मोठी पसंदी मिळत आहे.अर्थात या चित्रपटांमध्ये मनोरंजनाचा भाग गौण बनला आहे. युवकांना प्रेरणादायी चित्रपटांविषयी आसक्ती वाटू लागली आहे. प्रेक्षकांमधील या आवडींमध्ये झालेला बदल हा भारतीय खेळांमध्ये सातत्याने होत असलेली प्रगतीच म्हणावी लागेल. ऐंशीच्या दशकात अश्विनी आणि हिप हिप हुर्रे सारखे खेळाशी निगडीत असलेले चित्रपट आले होते. पण प्रेक्षकांनी त्यांना नाकारले. पण बॉक्सर आणि जो जिता वही सिकंदर सारख्या चित्रपटांना दुसर्या कारणांनीही अधिक पसंद केले गेले.खेळांवर हॉलीवूडमध्ये अगोदरपासूनच चित्रपट तयार होत होते.
     2000 नंतर खेळांवर काही चित्रपट बनले, त्यातल्या अनेक चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला. आता वेळ सुरमाचा आहे. यानंतर आणखीही मोठ्या प्रमाणात बायोपिक पडद्यावर येणार आहेत. बलबीरसिंह, सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, गोपीचंद, पीटी उषा, ध्यानचंद, खाशाबा काधव, कपिलदेव, मिताली राज आणि पॅराएथलीट मुरलीकांत यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येऊ घातले आहेत. बॉलीवूडलाही धन्यवाद द्यायला हवेत, त्यांनी खेळाडूंवर बायोपिक काढत आहेत.

No comments:

Post a Comment