1)ही भूमी एवढी विशाल आहे की,प्रत्येक
नव्या पायवाटेला येथे जागा आहे.-व्यंकटेश माडगूळकर
2)पराक्रमाचा अभिमान असावा,उन्माद
नसावा.-वि.स.खांडेकर
3)ज्यांच्या अंगी धाडस नाही ते जमिनीवरच सरपटत राहणार,
आकाशात उडू शकणार नाही.-ओशो
4)थोडेसे ज्ञान झाले यातच जे समाधान मानतात, अशांना पूर्ण सत्तेची संधी मिळत नाही.-निसर्गदत्त महाराज
5)वैफल्य वणवणू शकते,ते वाट शोधू शकत
नाही.-बाबा आमटे
6)विभूतिपूजा भारतीयांच्या रक्तामधूनच वाहते,त्यामुळे विचार करण्याचा वकूब तिच्या बुद्धीमध्ये निर्माण होऊ शकत
नाही.-प्र.के. अत्रे
7)प्रतिपक्षाला समजेल अशी भाषा वापरण्याचे सामर्थ्य नसेल,
तर शहाण्याने तिथे सत्य खपवायला कधीच जाऊ नये.-जी.ए.कुलकर्णी
8)वर्तमान क्षणाच्या अर्थगर्भतेची जाणीव म्हणजेच मुक्त
होणे.-जे.कृष्णमूर्ती
9) शंभर दिवस शेळ्यामेंढ्याप्रमाणे जगण्यापेक्षा एकच दिवस
जगा,पण सिंहासारखे.-डॉ.बाबासाहेब आंबेडकर 10)ज्या समाजाची असावी तेथे आस्था नसते आणि नसावी तेथे असते;तो समाज नामशेष होतो.-स्वा.सावरकर
11)केवळ ध्येय शुद्ध असून चालत नाही तर त्या ध्येयापर्यंत
नेणारी साधनेही शुद्ध असावी लागतात.- महात्मा गांधी
12)एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो त्यापेक्षा
अधिक उपद्रव वाईट मार्गाकडे वाळलेले मन माणसाला देते.-गौतम बुद्ध
13)सकल जीवांचे कल्याण व्हावे अशी ज्याची भावना तेच खरे
संत-महात्मा बसवेश्वर महाराज
14)संकटापेक्षा संकटाची भीतीच आपल्याला जास्त घाबरवून
सोडते.-गोंदवलेकर महाराज
15) आत विठ्ठलू,बाहेर विठ्ठलू।मीची
विठ्ठलू, मज भासतसे॥-संत ज्ञानेश्वर
16) ध्येयावर लक्ष सदोदित ठेवावे,मनाला
अन्य ओढ असू नये.-श्रीधरस्वामी
17)जिथे संशय आहे तिथे ज्ञान खोटे आहे.-सिद्धरामेश्वर महाराज
18)शुद्ध भावनेत आणि निष्ठेत खरे समाधान असते.-गोंदवलेकर
महाराज
19)अती दूर पाहणे आणि मुळीच न पाहणे, ही
ठेच लागण्याची दोन उत्तम कारणे आहेत.-विनोबा भावे
20)सुधारणेस पहिली व मुख्य अडचण म्हणजे तिच्याविषयी असलेली
उदासीनता.-न्या. म.गो.रानडे
21)स्त्रियांचे शिक्षण आणि राष्ट्रीय विकास यांचा जवळचा
संबंध आहे.-महर्षी धोंडो केशव कर्वे
22)तुलनेतून मत्सराचा जन्म होतो.-जे.कृष्णमूर्ती
23)स्वतः चे दोष दूर करण्याऐवजी दुसऱ्याचे दोष पाहात बसणे
म्हणजे पराकोटीची दुष्टता.-स्वामी विवेकानंद
25)आग्रह महत्त्वाची शक्ती आहे,ती
किरकोळ कामात वापरून टाकणे बरे नाही.-विनोबा भावे
(मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या संग्रहातून)
No comments:
Post a Comment