Monday, July 9, 2018

कुठल्याही परिस्थितीत संकल्प पूर्ण करा


     चांगले काम सुरू करायला काही खास दिवस असावा, असा काही नियम नाही. तुम्ही आठवड्याच्या,महिन्याच्या किंवा वर्षाच्या सुरुवातीला कोणताही खास संकल्प करू शकता. तुमच्या जन्मदिवशीदेखील एकादा संकल्प सोडू शकता.जर तुम्हाला स्वत:ला आनंदी ठेवायचे असेल किंवा पाहायचे असेल आणि स्वत: केलेले संकल्प दरवर्षी पूर्ण होताना पाहायचे असतील तर तुम्हाला थोडे समजूतदारपणे वागावे लागेल.

मी आणखी वाचन करेन
कार्य योजना-तुम्ही अगदी मनापासून मोबाईल किंवा लॅपटॉपवर एकादा लेख वाचत आहात आणि मध्येच कोणती तरी शेतीसंबंधी लिंक पाहायला मिळाली तर तुम्ही लगेच त्याच्यावर क्लिक करता. तुम्ही दुसरा पॅराग्राफ वाचणार असता,पण येतं भलतच! मग तुम्ही बागेत कोणते कीटकनाशक वापरायचे, असल्या कोणत्या तरी लेखावर जाऊन पोहचता. अशा प्रकारच्या हायपरलिंक-रिडिंग मुळे तुम्ही थहून जाता. यामुळे तुम्हाला विसराळूपणाची सवय लागायला लागते. मग तुम्ही बधीर होऊन जाता. तुमच्या लहानपणातल्या शाळेतल्यासारखं एक पुस्तक घ्या. दररोज काही पाने वाचण्यासाठी वेळ काढा. झोपण्यापूर्वी किंवा बाहेर पडण्यापूर्वी कधीही वाचू शकता.
परिणाम काय: वाचन ही खूप जुनी पद्धत आहे.यामुळे तुमच्या मेंदूला खाद्य मिळते आणि तणाव कमी होतो. बालविकाससंबंधी झालेल्या एका संशोधनानुसार वाचन लहानपणापासून सुरू केल्यास पुढे बुद्धीमत्तेवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. मस्तिष्क विज्ञानाच्या एका संशोधनानुसार म्हातारपणीदेखील अशा प्रकारच्या सवयीमुळे मेंदू प्रफुल्लित राहतो. स्मरणशक्ती कमी होण्याची प्रक्रिया यामुळे सावकाशीने होते.
मी माझ्यासाठी वेळ काढेन
कार्ययोजना- ज्यावेळेला स्वत:साठी दहा-पंधरा मिनिटे काढावीत, असे ठरते, तेव्हा आपल्याला ते फार सोपे वाटते. पण प्रत्यक्षात आपण या रोजच्या धावपळीत असे काही अडकून पडलेलो असतो की, आपल्यासाठी वेळ काढावा,म्हटले तरी काढू शकत नाही. मुंबईच्या सायकोथेरेपिस्ट शालिनी अनंत एके ठिकाणी म्हणतात की, सकाळी सर्वात अगोदर आपण आपल्या स्वत:कडे लक्ष द्यायला पाहिजे. आपल्याला ज्या गोष्टी करण्यात आनंद वाटतो, त्या गोष्टी केल्या पाहिजेत. या गोष्टीला आपल्या रोजच्या जीवनात सामावून घ्या आणि ती पूर्ण करा.
परिणाम काय- आपल्या जीवनात असा पर्याय कमीच मिळतो, जो आपण स्वत: नियंत्रित करू शकतो. वेळेवर कामावर जाण्यासाठी आपण एक प्रकारचे यंत्र झालेलो आहोत. त्यामुळे सकाळी उठल्यापासून आपण आयुष्य कोणीतरी चालवत आहे आणि आपण कठपुतळी आहोत, असेच वाटते. स्वत:च्या मर्जीने काही करूच शकत नाही. अनंत म्हणतात की, तुम्हाला जे आवडते, जसे की, संगीत ऐकणे किंवा बाहेर फिरायला जाणे...असे केल्याने तुमच्या दिवसाची सुरुवात योग्य प्रकारे होते आणि तुम्ही स्वत: त्यावर व्यवस्थितरित्या नियंत्रण ठेवू शकता. अशा परिस्थितीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे तुम्हाला थकवा येईल, अशा कुठल्याही गोष्टीपासून राहायला शिका. अशा माणसांपासूनही लांब राहा, जे तुमची मन शांती भंग करू शकतात.
मी तंदुरुस्त जीवनशैलीचा स्वीकार करणार
कार्ययोजना- इच्छाशक्तीने तुम्ही तुमचे आचरण बदलू शकत नाही. आपला परिसर निर्णय क्षमता प्रभावित करत असतो. त्यामुळे परिसरात थोडा बदल करा. तुम्हाला जे करायचे आहे आणि जे करायचे आहे, या दोन्ही गोष्टी एकत्र आणा. उदाहरणार्थ-तुम्हाला तुमच्या आवडीचा टीव्ही शो पाहतानाच ट्रेडमिलवर वॉक करता येईल. जर तुम्हाला बाहेर फिरायला जायचं असेल तर तुमच्यासोबत तुमची जीवनसाथी किंवा मुले घेऊन जा. तुम्हाला पाणी प्यायचे आहे, तेव्हा थोडे थोडे प्या.पण हे पिताना पाणी जवळपास ठेवू नका. जाग्यावरून उठून जावे लागेल, अशा पद्धतीने ठेवा. त्यामुळे तुम्हाला कामात थोडा ब्रेक मिळेल. पाय मोकळे करायला मिळतील. धुम्रपान सोडायचे असेल तर अशा मित्रांचीच मदत घ्या, ज्यांनाही असेच करायचे आहे.
परिणाम काय- गुरुग्राममध्ये कार्यरत असलेल्या लाइफ स्किल्स एक्सपर्ट अपर्णा सेम्युअल बालासुंदरम म्हणतात की, कोणतेही अवघड काम तेव्हा सोपे होऊन जाते, जेव्हा तुम्ही त्यात असे काही मिसळा , जे तुमच्या आवडीचे आहे. जर तुम्ही वेळेवर झोपू शकत नसाल तर तुमचे बेडटाइम शेड्युल बनवा आणि त्याचे पालन करा.
मी कोणत्याही गोष्टीवर अधिक लक्ष देईन
कार्ययोजना- शारीरिक, भावनिक किंवा मानसिकदृष्ट्या तुमचे लक्ष भटकवणार्या गोष्टींपासून दूर राहा. तुम्ही तुमच्या मेंदूला असे काही प्रशिक्षण द्या की, ज्यामुळे कारच्या इंजिनचा आवाज, मोबाईलच्या रिंगचा आवाज किंवा डोक्यात येणारे विचार यामुळे तुमचे लक्ष भटकणार नाही. ज्या ज्या वेळेला तुमचे लक्ष भटकेल, त्या त्या वेळेला तुम्हाला भटकवणारी वस्तू घेऊन बाहेर सोडून या. पुन्हा वर्तमानात या. स्मार्टफोन डिस्ट्रेक्शनपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तुम्ही अॅप ब्लॉकरची मदत घेऊ शकता.
परिणाम काय- जर लक्षकेंद्रित झाले तर तुम्ही जे काही अनुभवाल, त्यात तुम्ही आणखी रममाण होऊन जाल. तुम्हाला माहित असेल की, काही डोकी सामान्य  गोष्टीसुद्धा विसरू शकतात.जर तुम्ही सावध राहिलात तर त्यामुळे तुमच्या मेंदूतल्या लक्षच्या मांसपेशीदेखील मजबूत बनतात. संशोधन सांगते की, जर तुम्ही तुमच्या आजूबाजूचे आवाज बंद करू शकलात तर तुमची कार्यक्षमता वाढते. यामुळे संबंधही चांगले राहतात. कारण त्यामुळे त्यांच्यावर अधिक लक्ष देऊ शकता.
मी आनंद स्वीकारीन
कार्ययोजना- आत्म-संवेदना अनुभवायला सुरुवात करा.भावनांचा आदर करा. नाती मजबूत बनवा, जी तुमच्या मनाला आनंद देतात. त्यांनाही कळू द्या की, त्यांनी तुमच्या जीवनावर परिणाम केला आहे. जवळपास 75 वर्षांपर्यंत वयस्क विकासावर झालेल्या एका अभ्यासानुसार आनंदाच्या काही महत्त्वाच्या पैलूंची माहिती मिळते. तुमच्याजवळ जे आहे,त्यात समाधान माना. जवळची नाती-गोती दृढ करा. स्वत:ची काळजी घ्या. अनंत म्हणतात की, आरशात पहा आणि म्हणा-माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तू जसा आहेस, तसाच मला आवडतोस.
परिणाम-सायन्सडायरेक्टच्या एका अभ्यासानुसार आत्मसंवेदना यासाठी गरजेचे आहे,कारण यात दु:ख आणि वैफल्य काळात स्वत: विषयी दयाळू राहण्यासाठी मदत मिळेल. अनंत म्हणतात की, यामुळे तंदुरुस्ती आणि आनंद मिळतो, स्वत:वर प्रेम करायला लागता.

No comments:

Post a Comment