उत्कृष्ट मालिका
प्रख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन ‘सब टीव्हीने’ मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणला आहे. जीवनात दु:ख असताना मालिकांमधूनही तेच पाहून कुढण्यापेक्षा दर्शकांनी दैनंदिन कटकटीतून मुक्त होऊन काहीकाळ आनंदाचे क्षण अनुभवावे आणि झोपताना त्यांच्या चेहर्यावर हास्याची लकेर उमटावी अशाप्रकारची ही मालिका आहे. मालिकेचे कथानक, पात्र, प्रसंग हे सामन्य माणूस, त्यांचे घर, जीवन यांना डोळ्यापुढे ठेवून रंगवले आहे. त्यामुळे ‘आर. के. लक्ष्मण की दुनिया’ ही सामान्यांची मालिका वाटते. वास्तविक रोजच्या जीवनातील समस्या कायम असताना ‘येणारा दिवस आजपेक्षा चांगला असेल’ या आशावादावर सामान्य माणूस जगतो. किंबहुना हीच त्याच्या जगण्याची प्रेरणा आहे. ही प्रेरणा देण्यात ही मालिका यशस्वी झाली आहे. याशिवाय ‘सब टिव्ही’वर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ हीसुद्धा एक उत्कृष्ट विनोदी मालिका आहे.
- मच्छिंद्र ऐनापुरे, जत. saamana 7/1/2012

No comments:
Post a Comment