Saturday, January 7, 2012

शेजारील देशांचे राष्ट्रीय खेळ

नुकताच आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ दिवस पार पडला. हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय खेळ कुठल्याही देशाचा सांस्कृतिक गौरव असतो. मात्र अनेक देशांमध्ये दुसरे खेळसुद्धा लोकप्रिय असतात. जसे आपल्या देशात क्रिकेट. असो. पण यानिमित्ताने आपल्या शेजारी असणार्‍या देशांचे राष्ट्रीय खेळ कोण-कोणते आहेत, हे जाणून घेऊया. आपला कट्टर वैरी पाकिस्तान या देशातसुद्धा हॉकीच राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता पावलेला आहे. तिथे हॉकी खूपच लोकप्रिय आहे.
नेपाळचा राष्ट्रीय खेळ बॉउलिंग तर श्रीलंकेचा व्हॉलिबॉल आहे. फ्री स्टाईल कुस्ती इराणमध्ये , तीरंदाजी भूतानमध्ये आणि म्यानमारमध्ये कब्बडी हे खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता पावलेले आहेत्.आपल्या शेजारच्या म्यानमार देशात पंधराव्या दशकापासून खेळला जात असलेला आणि लोकप्रिय असलेला चिनलोन हा खेळ राष्ट्रीय खेळ आहे. विशेष म्हणजे या खेळात प्रतिस्पर्धी नसतो. त्यामुळे हा खेळ विरोधकांशिवाय खेळला जातो. नृत्य आणि खेळ असा अनोखा संगम या खेळ प्रकारात आहे.                                                          

No comments:

Post a Comment