Tuesday, January 10, 2012

तरुणांनी 'द वर्ल्ड इज लिमिट' चे ध्येय बाळगावे

आज जगभरात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजवण्या आणि वाढविण्याबाबत प्रयत्न केले जात असताना आपल्या भारतीय समाजात मात्र याबाबत कमालीची उदासिनता आढळून येत आहे. आजचा बुद्धीवादी युवकसुद्धा विज्ञान संशोधनाकडे न वळता आयाआयटीमधून शिक्षण घेऊन गलेलठ्ठ पगार आणि सर्व सुखासिन सोयी-सुविधा पुरविणार्या् कंपन्यांची चाकरी करण्यात धन्यता मानताना दिसत आहे.
विज्ञानाचा आवाका प्रचंड आहे. त्यात संशोधन कराल तितके कमी आहे. किंबहुना त्यातून आणखी संशोधनाचे पदर उलगडत जातात. अणूंचा जसा विस्फोट होतो, एकातून दोन, चार,सोळा... असे अणू निर्माण होतात, तसे या विज्ञानाचे आहे. विज्ञान गाव, राज्य आणि देश इतकी मर्यादा मानत नाही. त्यामुळे भारतीय तरुणांनी 'द वर्ल्ड इज लिमिट' म्हणून चालले पाहिजे. यासाठी समाजातल्या सर्वच थरांमध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजवण्याची गरज आहे. हा दृष्टिकोन रुजवणार्याि एक नव्हे तर अनेक पिढय़ा तयार व्हायला हव्यात किंवा प्रत्येक पिढीसमोर असा एक तरी आदर्श निर्माण व्हायला हवा, जेणेकरून नवी पिढी विज्ञानाच्या वाटेवर आपला मार्ग शोधू शकेल. पण आपल्या देशाचे दुर्दैव असे की, गेल्या 60 वर्षांमध्ये हा वैज्ञानिक दृष्टिकोन खरोखरीच रुजला आहे का, हे तपासण्याची आता वेळ आली आहे. अलिकडच्या काही वर्षात आयआयटीमधून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा कल विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखांमध्ये मूलभूत पातळीवर काम करण्याऐवजी गलेलठ्ठ पगार आणि सुखासिन जीवन यातच समाधान मानताना दिसत आहे. यामुळे चंगळवादी प्रवृत्ती फोफावून बुद्धीचा र्हा स होत चालला आहे. या बुद्धीला गंज चढत चालला आहे. त्याचा वापर म्हणाव्या त्या दिशेने होत असतानाचे दिसत नाही. त्यामुळे भारतीय बौद्धिकता वाया जात आहे की काय अशी भीती ज्ञानवंतांना वाटू लागली आहे. कंपन्या संशोधनात गुंतवणूक करण्यापेक्षा खिसा भरण्याचे धोरण अवंलबत असल्याचे दिसत आहेत. सरकारही म्हणावे असे प्रयत्न करताना दिसत नाही.
अशा या सगळ्यांच्या मानसिकतेमुळे देशाची मोठी बौद्धिक संपदा वाया जात आहे. त्यामुळे आयआयटीत शिक्षण घेणार्या. मुलांनी आतापासून प्रगल्भ विचार करण्याची आवश्यकता आहे. हे संपूर्ण जग बदलवण्याची, मानव जातीला, पर्यावरणाला फायदा होईल असे संशोधन करण्याची काळाची गरज आहे. ही गरज ओळखून तरुनांनी पैसा, चैन यामागे न लागता अखिल मानव जातीचा विचार, देशाचा विचार करण्याची आवश्यकता ग्रहीत धरली पाहिजे. जेवढा उच्च विचार केला जाईल तेवढी आव्हानेही उच्च राहतील. त्यामुळे आपल्या कर्तृत्वाला ‘द वर्ल्ड इज लिमिट’ समजून काम करण्याची गरज आहे.
कॉर्पोरेट कंपन्या भरपूर पगार देतात, त्यामुळे भौतिक सुखेही मिळतात; पण एवढ्यावर सगळे संपत नाही. भागत नाही. जगातल्या सगळ्याच बुद्धीवंतांनी असाच विचार केला असता तर आजही जगात वैज्ञानिक प्रगती साधली आहे, ती शक्य झाली नसती. बुद्धीवंतांनी आपला आवाका धुंडाळायला हवा. अन्यथा कंपन्यांच्या अमिषाला भुललेल्या प्रतिभवंतांचे जीवन मग अतिशय सामान्य पातळीवरचे व रटाळवाणेच म्हणायला हवे. आपल्या देशात विज्ञान-संशोधनासाठी सरकारकडून पुरेसे प्रयत्न केले जात नाहीत अथवा नोकरशाहीच्या लालफितीच्या कारभारामुळे देशात विज्ञानाला पोषक असे वातावरण निर्माण झालेले नाही, असा जो तक्रारींचा सूर केला जात आहे, तो पूर्णता चुकीचा आहे. सरकार काही प्रमाणात चुकत आहे, म्हणावे असे लक्ष देत नाही, यात काही प्रमाणात तथ्य आहे, मात्र करत नाही, या समस्या, अडचणी आहेत म्हणून आपला देश नोबेल पुरस्कार पातळीवरचे संशोधक, शास्त्रज्ञ निर्माण करू शकत नाही, असा जो आरोप केला जात आहे, तो चुकीचा आहे. सगळ्या मागासलेपणाचे , अपयशाचे खापर सरकारवर सोडून चालणार नाही. आज विज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या शेजारील चीन या राष्ट्राने जी प्रगती साधली आहे, तिथंपर्यंत पोहोचायला आपल्या बराच दम खावा लागणार आहे. आज चीन भारताच्या किती तरी मैल पुढे आहे. त्याचे कारण भारतातील मुले मूलभूत विज्ञानात संशोधन करण्यासाठी विशेष कष्ट घेत नाहीत.
सध्या चीन महासत्ता म्हणून जी वेगवान भरारी घेत आहे, त्याला केवळ त्यांनी भांडवली बाजारपेठेची सूत्रे स्वीकारल्यामुळे शक्य झाले आहे, असे वाटत असेल तर ते पूर्णतः चुकीचे आहे, असे म्हणावे लागेल. या देशाने मूलभूत विज्ञानात बरीच झेप घेतली आहे. त्यांची अवकाश भरारी तर थक्क करणारी आहे. यासाठी त्यांची दूरदृष्टी आणि तेथील खासगी उद्योजकांनी विज्ञान-तंत्रज्ञान संशोधनात केलेली मोठी गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी तिथे विविध प्रकारच्या प्रयोगशाळा उभ्या करून देशाच्या प्रगतीत अत्यंत महत्त्वाची भूमिका वटवली आहे. आपल्याकडे सगळे सरकारनेच केले पाहिजे, ही मानसिकता तयार झाली आहे. सरकारने मदत केली पाहिजे अन्यथा तसेच स्वस्थ बसून राहू, मदत मिळेपर्यंत आपण काहीच हालचाल करणार नाही ही मानसिकता आपल्याकडे खोलवर रुजली आहे. आजच्या तरुणांनी ही मानसिकता दूर करून मोठ्या जोमाने कामाला लागले पाहिजे. माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम आझाद यांनी भारत महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे, ते असे निव्वळ चाकरी करून धुळीस मिळवले जाऊ नये, अशी तमाम भारतीयांची अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment