Saturday, January 7, 2012

फर्स्ट एड किट

राजू बाहेर खेळता खेळता पडला. त्याच्या पायात काच घुसली. दुखू लागल्याने तो आरडाओरडा करत रडू लागला. त्याच्या आईनं- विनितानं मेडीकल किट्मध्ये थर्मामीटर आणि दोन- चार साधारण औषधांव्यतिरिक्त काहीच ठेवलं नव्हतं. त्यामुळे तिला राजूवर वेळेत उपचार करता आले नाहीत.
 अनीताच्या अंगावर गरम गरम दूध सांडलं. पाय गुडग्यापासून खाली भाजून निघाला. तिने 'फर्स्ट एड किट' मध्ये प्राथमिक उपचाराच्या सार्‍या चिजा व्यवस्थित ठेवल्या होत्या. पन तिला शोधाशोध करूनही ते किट ऐनवेळेला सापडलं नाही.
फर्स्ट एड किट प्रत्येक घरात असणं आवश्यक बनलं आहे. गरजेला त्याचा उपयोग झाला पाहिजे, यासाठी ते व्यवस्थित आणि आठवणीत राही ल अशा ठिकाणी ठेवायला हवं. डॉक्टरकडे जाण्यापूर्वी पप्राथमिक उपचार मिळायला हवेत.          प्रथमोपचाराबद्दल पूर्ण माहिती असणे हे     सर्वसामान्य नागरिकाचे कर्तव्य आहे. रस्त्यात किंवा आपल्या आसपास एखाद्या व्यक्तीला चक्कर आली किंवा काही जखम झाली तर तत्परतेने त्याला मदत करणे हे सच्च्या माणुसकीचे लक्षण आहे. प्रथमोपचाराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नेहमीच्या जीवनात अपघातग्रस्त माणसांना किंवा अचानकपणे आजारपण उद्भवलेल्या माणसांना प्रथमोपचाराची नितांत गरज असते.

प्रथमोपचाराचे उद्दिष्ट.
  • आयुष्य वाचवणे.
  • तातडीची मदत मिळणे.
  • अपघातग्रस्त/आजारी माणसाच्या आरोग्यात होणारी गुंतागुंत कमी करणे.
प्रथमोपचार देणा-यांनी करावयाचे काम.
  • वेळच्यावेळी गरजू माणसापर्यंत पोचणे.
  • अशा वेळी स्वत: शांत राहून, घाबरून न जाता मदत करणे.
  • पुढ्यात असलेल्या समस्येची पूर्ण माहिती असणे.
  • प्रथमोपचाराची साधने कशी वापरावीत ह्याची माहिती असणे.

    फर्स्ट एड किट

    • निरनिराळ्या आकाराच्या कमीत कमी दोन्-तीन बँडेज पट्ट्या आणि मेडिकल टेप-  कापल्यावर अथवा खरचटल्यावर वापरण्यासाठी उपयोग
    • गॉज स्क्वायर्स आणि कापसाचा छोटा रोल- जखमा झाकण्यासाठी , जेणे करून इंफेक्शन होणार नाही. 
    • लॅटेक्स अथवा प्लॅस्टिकचे ग्लव्ज- जखम स्वच्छ करताना व बँडेज करताना उपयोगी पडतात.
    • त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारी बँडेजेस्- जखम झाकण्यासाठी  
    • सेव्हलॉन , सेटॉलची बाटली अथवा अन्य एंटिबॅक्टीरियल सोप- जखम स्वच्छ करून तात्काळ लावण्यासाठी
    • छोटी विजेरी (टॉर्च) , कात्री, चिमटा - बँडेज , गॉज. टेप इत्यादी कापण्यासाठी, अंधारात विजेरीचा उपयोग
    • कैची
    • रबराचे हातमोजे (२ जोड्या)
    • छोटा चिमटा
    • सुई
    • स्वच्छ व सुके कापडाचे तुकडे
    • अँटीसेप्टिक (डेटॉल किंवा सॅव्हलॉन) - जखम स्वच्छ करून तात्काळ लावण्यासाठी
    • थर्मामीटर
    • पेट्रोलियम जेली
    • निरनिराळ्या आकाराच्या सेफ्टी पिना
    • साबण
    डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेता येणारी औषधे:
    ऍस्पिरीन किंवा तत्सम वेदनाशामक गोळ्यामधमाश्यांच्या दंशावरील अँटीहिस्टामाईन मलम
    जुलाब थांबविण्यासाठी गोळ्यालॅक्झेटीव्ह
    अँटासिड (पोटदुखीसाठी) 
     प्रथमोपचाराची पेटी नेहमी सर्वांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी ठेवावी. पेटीतील औषधे त्यांची मुदत संपताच त्वरीत बदलावीत.

No comments:

Post a Comment