घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यास होणार्या सर्वच नुकसानीला भरपाईदाखल २५ लाखांचा विमा पेट्रोलियम कंपन्यांनी काढलेला असतो. मात्र, याची माहिती गॅस पुरवठा करणार्या एजन्सीजच काय पण ग्राहकांना नाही, अशा संदर्भातील बातमी वाचायला मिळाली. याबाबतीत जाणकार, ग्राहक पंचायत आदींनी माहितीचा शोध घेऊन ती जनतेपर्यंत पोहचवावी. गॅस पुरवठा करणार्या कंपन्या सिलेंडरचा विमा काढत असतात. सिलेंडरशी संबंधित अपघात झाल्यास ग्राहकांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यावर विम्याची २५ लाखांची रक्कम मिळते.. मात्र, ग्राहकांना व गॅस एजंन्सीच्या कर्मचार्यांना या नियमाची माहितीच नाही. यामुळे आता या नियमांची माहिती गॅस एजन्सीच्या नोटीस बोर्डवर लावण्याची गरज आहे. दिल्लीत अशाच प्रकारच्या घटनांची वाढ झाल्याने तशी सूचना दिल्लीतील एजन्सीजच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. दरम्यान, दिल्लीतील एका एजन्सीजच्या व्यवस्थापकाने सांगितले की, गॅस सिलेंडर खरेदी करण्यासोबतच त्याचा २५ लाखांचा विमा सुरू होतो. काही वर्षांपूर्वी या विम्याची रक्कम ३ लाख रुपये होती. नंतर टप्प्याटप्प्याने यात वाढ करून ५ लाख, १0 लाख व आता २५ लाख रुपये करण्यात आली आहे. गॅस ग्राहकाकडे कोणत्याही सिलेंडशी संबंधित अपघातात कोणाचा मृत्यू झाल्यास त्यासाठी कंपनीकडून विमा कंपनीच्या अटींनुसार भरपाईपोटी विम्याची रक्कम मिळण्याचे तरतूद आहे. परंतु देशभरातील बहुतांश एजन्सीधारकांना या नियमाची माहिती नसल्याचे स्पष्ट होत आहे. याची माहिती जाणकारांनी उपलब्ध करून जनतेला द्यावी. आपल्या देशात समाज उपयोगी, लोकांच्या लाभाच्या अनेक योजना आहेत. मात्र त्याची माहिती जनतेपर्यंत पोहचत नाही. समाजसेवी संस्थांनी अशी माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी ग्रामीण भागासह कार्यशाळा घ्याव्यात. लोक त्यांना धन्यवाद देतील.
No comments:
Post a Comment