सध्या राज्यासह देशभरात विजेचा प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे शासनाने भारनियमनात प्रमाणापेक्षा अधिक वाढ केली आहे. भारनियमनाने आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. सध्या युद्धपातळीवर विज मिळवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. सध्या प्रसंग बाका आहे. त्यामुळे नागरिकांनीही थोडे सावध राहून वीज बचत केल्यास त्याचा फायदाच होईल. वास्तविक भारनियमन संपण्यासाठी वीज बचत करणे आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे हवा, पाणी आणि इंधन यांचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी घरामध्ये विजेचा वापर काटकसरीने करावा. ट्यूबलाइट आणि विजेच्या दिव्यांना 40 वॅटच्या वर वीज खर्च होते. त्याऐवजी घरात सीएफएल दिवे लावले तर ऊर्जेची तिप्पट बचत होते. घरातील टीव्ही, मोबाइल चार्जर यांचा उपयोग नसताना मुख्य स्वीच बंद करावा. त्यामुळे विजेची बचत होईल. ऑक्टोबर हीट असल्याने पाणी तापवण्यासाठी हिटरचा उपयोग करू नये. शक्य असेल तर सोलर हिटर बसवून घेणे फायद्याचे. खोलीतील दिवे, पंखे बंद करावेत. फ्रिज जास्त वेळ उघडे ठेवू नये.
No comments:
Post a Comment