१)मधुमालती - या वनस्पतीला मालतीपत्र असेही म्हणतात. वनस्पती शास्त्रात हिला ‘हिपटेज बेंघालेन्सीसकुर्झ’ म्हणतात. या वनस्पतीच्या पानांचा वापर जखम, सूज, कुष्ठरोग, कफ व संधिवात यावर करतात. फुफुसाचे विकार, त्वचारोग, जाडी कमी करण्यासाठी ही वनस्पती गुणकारी आहे. स्त्रीरोगातील श्वेतपदर, गर्भाशयाचे विकारांत तसेच नेत्ररोगातही मधुमालती वनस्पतीचा खात्रीशीर उपयोग होतो.
२) माका - हिचे शास्त्रीय नाव ‘इक्लिप्टा प्रोस्ट्रेटा’ म्हणतात.यकृताची सूज, सांधेदुखी, मूत्रपिंडाचे आजार, केसांच्या आरोग्यासाठी याचे तेल उपयुक्त आहे. कावीळ, त्वचेचे जुनाट आजार, मूळव्याध, विंचुदंश, आमवात यासाठी माका गुणकारी आहे. माका एक प्रकारची उत्तम लस आहे. कोणत्याही प्रकारचा रोग होऊ न देण्याचे औषधी गुण यात आहेत. . माक्याचा रस सर्वागास चोळून जिरवल्याने शरीरातील मेदाच्या गाठी विरघण्यास मदत होते. .
३) बेलपत्र - हिचे वनस्पती शास्त्रातील नाव ‘ऐजल मार्मेलस’ असे आहे. पोटातील जंत, पोटाचे विकार यावर बेलपत्राचा उपयोग होतो. अतिसार.आतड्यांचे विकार यावर बेलफळ गुणकारी आहे. बेलाच्या पानांचा रस ४ चमचे व मध २ चमचे घेतल्याने सात दिवसांत कावीळ बरी होते. बेलाच्या पानांचा २ चमचे रस, १ कप दुधातून घेतल्याने स्वप्नदोष कमी होतो.पानांचा रस मधुमेहावरसुद्धा गुणकारी आहे.
४) दूर्वा - वनस्पती शास्त्रात हिला सायनोडॉन डॅक्टीलॉन म्हणतात. ही एक गवताच्या जातीची वनस्पती आहे. हिच्या दोन जाती आहेत, पांढरी व निळी पैकी गणेशाला पांढऱ्या दूर्वा प्रिय आहेत. या जातीला हिल हराळी असेही म्हणतात.दूर्वा बुद्धीवर्धक, शक्तीवर्धक, थंड गुणाच्या आहेत. दूर्वाच्या रसाच्या लेपनाने त्वचेचा दाह कमी होतो. दूर्वाना प्रजोत्पादक व आयुष्यवर्धक मानले जाते. म्हणून गर्भदानविधीत स्त्रीच्या नाकपुडीत दूर्वाचा रस पिळतात, त्वचारोगनाशक म्हणून, वंध्यत्व नाहीसे करण्यासाठी दूर्वाच्या रसाचा खूप उपयोग होतो. मूत्रविकारासाठी दूर्वा परमौषधी आहेत. आम्लपित्तावरही दूर्वाचा रस उपयुक्त आहे. डोळ्यांचे विकार, सर्दी-खोकला यावरही गुणकारी आहे.
५) धोतरा - याचे शास्त्रीय नाव ‘टोब्रानॅपल स्ट्रॅमोनियम’ आहे. ही क्षुद्रवर्गीय वनस्पती आहे. तिच्या काळा, पांढरा व राजधोत्रा अशा तीन जाती आहेत. या वनस्पतीपासून ‘अॅफ्रोपिन’ नावाचे औषध बनवतात. त्वचारोग, डॉल्यांचे विकार, मूळव्याध यावर गुणकारी आहे. वेदनाशामक म्हणून याचा उपयोग होतो. दमा व श्वास विकारांवर कनकासव हे धोत्र्यापासून तयार होणारे औषध प्रसिद्ध आहे. हत्तीपायरोगात धोत्र्याच्या पानांचा रस इतर औषधांसोबत लेप म्हणून वापरतात. . पण ही वनस्पती नऊ उपविषात गणली जाते. त्यामुळे हिचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
६) तुळस - तुळशीचे शास्त्रीय नाव ऑसीमम सॅन्टम आहे. तुळस गणपतीला निषिद्ध असली तरी फक्त गणेश चतुर्थीस तुळस वापरतात. हवा शुद्ध करणे हा तुळशीचा मुख्य गुणधर्म आहे. दमा, खोकला, सर्दी या विकारात ही श्रेष्ठ ठरते. अपच्न, ढेकर, पोटदुखी, कानदुखी यावरही पानांचा रस उपयुक्त आहे. कॅन्सरसारख्या विकारात तुळशीची पाने मंजिऱ्या याचा रस रोज ४ चमचे असा एक महिना घेतल्यास परिणामकारक ठरू शकतो.
७) शमी - शास्त्रीय नाव ‘प्रोस्पोपिस सिनेरिऐंजल’ आहे. शमीत सुप्त अग्निदेवता असते असे म्हणतात. त्यामुळे यज्ञाच्या ठिकाणी शमीची राख ठेवतात. दाहशामक, कुष्ठरोग, अतिसार, जुलाब यावर गुणकारी आहे. त्वचारोग, दमा, मूत्रविकार, सूज या विकारांत शमी गुणकारी ठरते.
आघाडा - आघाडय़ाचे शास्त्रीय नाव ‘अक्र्याराधस अस्पेरा’ आहे. हिचा उपयोग बायका, ऋषीपंचमीचे दिवशी स्नानाचे वेळी तोंड धुण्यासाठी करतात. कारण मुखरोग, दंतरोगात हे श्रेष्ठ औषध आहे. कफविकार, सूज, भगंदर-मूळव्याध, मूतखडा, कुष्ठरोग, अतिसार यावर उपयुक्त आहे. शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यासाठी मेदविकार, मलेरिया अशा अनेक आजारात आघाडा उपयोगी ठरतो.
९) डोरली - शास्त्रीय नाव ‘सोलॅनम इंडिकम’ आहे. डोरलीची मुळे गुणकारी असतात. त्वचारोग, पोटाचे विकार, वातनाशक, मूत्ररोगातसुद्धा वापरतात.
२) माका - हिचे शास्त्रीय नाव ‘इक्लिप्टा प्रोस्ट्रेटा’ म्हणतात.यकृताची सूज, सांधेदुखी, मूत्रपिंडाचे आजार, केसांच्या आरोग्यासाठी याचे तेल उपयुक्त आहे. कावीळ, त्वचेचे जुनाट आजार, मूळव्याध, विंचुदंश, आमवात यासाठी माका गुणकारी आहे. माका एक प्रकारची उत्तम लस आहे. कोणत्याही प्रकारचा रोग होऊ न देण्याचे औषधी गुण यात आहेत. . माक्याचा रस सर्वागास चोळून जिरवल्याने शरीरातील मेदाच्या गाठी विरघण्यास मदत होते. .
३) बेलपत्र - हिचे वनस्पती शास्त्रातील नाव ‘ऐजल मार्मेलस’ असे आहे. पोटातील जंत, पोटाचे विकार यावर बेलपत्राचा
४) दूर्वा - वनस्पती शास्त्रात हिला सायनोडॉन डॅक्टीलॉन म्हणतात. ही एक गवताच्या जातीची वनस्पती आहे. हिच्या दोन जाती आहेत, पांढरी व निळी पैकी गणेशाला पांढऱ्या दूर्वा प्रिय आहेत. या जातीला हिल हराळी असेही म्हणतात.दूर्वा बुद्धीवर्धक, शक्तीवर्धक, थंड गुणाच्या आहेत. दूर्वाच्या रसाच्या लेपनाने त्वचेचा दाह कमी होतो. दूर्वाना प्रजोत्पादक व आयुष्यवर्धक मानले जाते. म्हणून गर्भदानविधीत स्त्रीच्या नाकपुडीत दूर्वाचा रस पिळतात, त्वचारोगनाशक म्हणून, वंध्यत्व नाहीसे करण्यासाठी दूर्वाच्या रसाचा खूप उपयोग होतो. मूत्रविकारासाठी दूर्वा परमौषधी आहेत. आम्लपित्तावरही दूर्वाचा रस उपयुक्त आहे. डोळ्यांचे विकार, सर्दी-खोकला यावरही गुणकारी आहे.
५) धोतरा - याचे शास्त्रीय नाव ‘टोब्रानॅपल स्ट्रॅमोनियम’ आहे. ही क्षुद्रवर्गीय वनस्पती आहे. तिच्या काळा, पांढरा व राजधोत्रा अशा तीन जाती आहेत. या वनस्पतीपासून ‘अॅफ्रोपिन’ नावाचे औषध बनवतात. त्वचारोग, डॉल्यांचे विकार, मूळव्याध यावर गुणकारी आहे. वेदनाशामक म्हणून याचा उपयोग होतो. दमा व श्वास विकारांवर कनकासव हे धोत्र्यापासून तयार होणारे औषध प्रसिद्ध आहे. हत्तीपायरोगात धोत्र्याच्या पानांचा रस इतर औषधांसोबत लेप म्हणून वापरतात. . पण ही वनस्पती नऊ उपविषात गणली जाते. त्यामुळे हिचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
६) तुळस - तुळशीचे शास्त्रीय नाव ऑसीमम सॅन्टम आहे. तुळस गणपतीला निषिद्ध असली तरी फक्त गणेश चतुर्थीस
७) शमी - शास्त्रीय नाव ‘प्रोस्पोपिस सिनेरिऐंजल’ आहे. शमीत सुप्त अग्निदेवता असते असे म्हणतात. त्यामुळे यज्ञाच्या
आघाडा - आघाडय़ाचे शास्त्रीय नाव ‘अक्र्याराधस अस्पेरा’ आहे. हिचा उपयोग बायका, ऋषीपंचमीचे दिवशी स्नानाचे वेळी तोंड धुण्यासाठी करतात. कारण मुखरोग, दंतरोगात हे श्रेष्ठ औषध आहे. कफविकार, सूज, भगंदर-मूळव्याध, मूतखडा, कुष्ठरोग, अतिसार यावर उपयुक्त आहे. शरीरातील विषारी द्रव्ये काढून
९) डोरली - शास्त्रीय नाव ‘सोलॅनम इंडिकम’ आहे. डोरलीची मुळे गुणकारी असतात. त्वचारोग, पोटाचे विकार, वातनाशक, मूत्ररोगातसुद्धा वापरतात.
No comments:
Post a Comment