Wednesday, January 11, 2012

‘गाणं व्यक्त करण्याचं प्रभावी माध्यम’

सांगली/ प्रतिनिधी
कविता गाणं हे शब्दांतून भावना व्यक्त करण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. प्रत्येक चित्रपट यशस्वी होण्यासाठी गाण्यांची नितांत गरज आहे. शब्दांत गावाकडच्या मातीचा गंध असल्यानेच आपल्या गाण्यांना रसिक प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला, असे प्रतिपादन गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी केले. जत येथील मराठी साहित्य सेवा मंचच्या वतीने येळवी येथे आयोजित १७व्या साहित्य संमेलनात बाबासाहेब सौदागर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सहकारी बँकेचे माजी संचालक विलासराव जगताप होते. आजच्या घडीला मागणीनुसार गाण्याचा पुरवठा करावा लागतो. पण तरीसुद्धा मातीशी इमान राखण्याचा प्रयत्न करतो, असे सांगून गीतकाराने साध्या, सोप्या रसिकांच्या ओठावर सहज रुळावीत अशी गाणी दिली, तरच रसिक त्या गाण्याला डोक्यावर घेतात. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या खूप चांगल्या दर्जाचे चित्रपट येत आहेत. त्याप्रमाणेच संगीताचे सुद्धा स्वतंत्र स्थान निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांनी करीअर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही बाबासाहेब सौदागर यांनी केले.
विलासराव जगताप यांनी समाजातील अंधश्रद्धा, भ्रष्टाचार निर्मूलन दुष्काळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर साहित्यिकांनी आपल्या लेखणीने परखडपणे प्रहार करावेत, असे आवाहन केले. तत्पूर्वी येळवी गावातून ग्रामस्थ श्रीसमर्थ शिवप्रभू हायस्कूल श्री संत ज्ञानेश्वर आश्रमशाळा विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी काढली.
या कार्यक्रमात पत्रकार लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांच्याहसत जगावे डॉ. सरिता पट्टणशेट्टी यांच्यारंगपंचमीया काव्यसंग्रहाचे बाबासाहेब सौदागर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले यांच्या अध्यक्षतेखालीमराठी साहित्य, दुष्काळ त्यावरील उपाययोजनाया विषयावर परिसंवाद पार पडला. दुष्काळावर युवा साहित्यिकांनी भरभरून लिहिले असले तरी तो कायमचा हटविण्याबाबत त्यावर ठोस उपाययोजना करण्याबाबत राज्यकर्ते संवेदनशील नाहीत. लोकप्रतिनिधी अभ्यासक दुष्काळावर बोलून टाळय़ा मिळवितात, पारितोषिके मिळवितात. पण करीत काहीच नाहीत, असा सूर या परिसंवादात निघाला. यात नातेपुते येथील प्रा. सुनीता सूर्यवंशी, मिरज येथील डॉ. राजेंद्र जेऊर इचलकरंजी येथील डॉ. श्रीकांत कोकरे आदींनी भाग घेतला होता.
दुपारच्या सत्रात बारामती येथील प्रा. रवींद्र कोकरे यांनी सांगितलेल्याकरंजीया हास्यकथेमुळे साहित्य संमेलन स्थळ हास्यसागरात बुडून गेले. गडहिंग्लज येथील विलास माळी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. त्यात पुणे येथील मिलिंद शेंडे, मंगळवेढा येथील शिवाजी सातपुते प्रा. दत्ता सरगर, पंढरपूर येथील लक्ष्मण खेडेकर, मिरज येथील इंद्रजित घुले, संतोष जगताप, शशिकांत मानगोटे, श्रीशैल कुलकर्णी, महादेव सवाईराज प्रकाश कुलकर्णी, रावसाहेब यादव, लवकुमार मुळे रशीद मुलाणी आदी कवींनी सहभाग घेतला होता. या साहित्य संमेलनास चंद्रशेखर गोब्बी, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश जमदाडे, प्रभाकर जाधव, सरपंच मारुती जमदाडे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी कुमार इंगळे, मोहन माने- पाटील, राजू कोळी, प्रदीप डफळे, महादेव बन्नी, भरत वडगावे प्रा. भाऊसाहेब शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले होते. loksatta, 11/1/2012

No comments:

Post a Comment