उत्साही माणूस कुठल्याही गोष्टीचा कंटाळा करत नाही. तो सतत कामात असतो. त्यामुळे अशी माणसे कधीही निवृत्त होत नाहीत. सरकारी नोकर किंवा खासगी कंपन्यातले कामगार ठरलेल्या निवृत्तीच्या वयात रिटायर्ड होऊन घरात बसतात. पण ज्याच्यात उत्साह कायम असतो, त्याला कोणीही निवृत्त करू शकत नाही. फक्त पैसे कमावण्यासाठी ऑफिसमध्ये नोकरी करणारे लोक रिटायर होत असतात. पण ज्यांच्याकडे अनेक उत्साहवर्धक कामे असतात, असे लोक कधीही निवृत्त होत नाहीत. कोणत्याही संस्था वयाच्या कारणामुळे कोणाला निवृत्त करत नसतात. तर तुम्ही आयुष्याच्या सायंकाळी आपल्या इच्छेप्रमाणे जीवन जगावे, आवडीचा छंद जोपासत जगावे हा त्यामागील सेवानिवृत्तीचा हेतू असतो. परंतु, जर एखाद्याकडे एकही छंदच नसेल, तर त्यामघ्ये त्या संस्था काहीही करू शकत नाहीत. माणसाने कोणत्याना कोणत्या छंदात अडकलेले असावे. सुंदर जीवनात शिकण्यासारखे प्रचंड आहे, आयुष्याच्या शेवटपर्यंत शिकत राहिले पाहिजे. सतत शिकण्याची धडपड करणारा उत्साही असतो, तो कधीच निवृत्त होत नाही.
No comments:
Post a Comment