Sunday, January 29, 2012

माझी कविता

सुख
गेले चार दिवस
शेजारच्या स्मशानात
प्रेतांच्या आगीचा डोंब उठला
नव्हता
आणि म्हणूनच त्याच्या
पोटात दुखायला लागलं होतं
माणुसकीच्या पतनास
कारणीभूत ठरणार्‍या
कुणाचं वाईट घडलंच नाही तर
त्याच्या सुखाला ओहोटी
लागणार्‍या...
अशा रोगट सुखांनी
ग्रासलेला
तो एक क्षुद्र वखारवाला
पोट धरून बसला होता

दोन माणसं
चाळीतल्या
दोन घरांची
दोन माणसं
पाहात असतात एकमेकांना
कधी... कधी...
सकाळ... संध्याकाळ...
चढताना ... उतरताना...
चाळीच्या पायर्‍या...!
दोघंही आहेत साठी सरलेली
सावकाश चढतात
रोलिंगवर हाताचा भार ठेऊन
एकाला पाहून
दुसर्‍याला येतो धीर...!

No comments:

Post a Comment