Sunday, January 8, 2012

स्वामी विवेकानंद


दोन-अडीच वर्षांपूर्वी जपानचे पंतप्रधान भारतात आले होते. संसदेला संबोधित करताना पंतप्रधान ऍबे सिंझो म्हणाले होते की, जपान भारताचा कायमचा ऋणी आहे. कारण जपानचे शिल्पकार तेनशिन ओकाकुरा यांनी स्वामी विवेकानंद यांच्यापासून प्रेरणा घेतली होती. ते पुढे असे म्हणाले की, जगाचे नेतृत्व करण्यासाठी जपान आणि भारत या दोन्ही देशांनी पुढाकार घेतला पाहिजे.‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन’ या विख्यात पुस्तकाचे लेखक आणि नामवंत इतिहासकार सॅम्युअल हंटिग्टन यांनी म्हटले आहे की, जगात तिसरे महायुद्ध झालेच तर ते एकांतिक विचारधारा मानणार्याक धर्मीयांकडून होईल. माझाच धर्म खरा या दुराग्रहामुळे होईल. यातून वाचण्याचा एकच मार्ग असेल, तो म्हणजे भारतीय मार्ग अर्थात हिंदू विचारधारा. आकाशातून पडणारे पाणी शेवटी या ना त्या मार्गाने समुद्राला मिळते. त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही ईश्वगराची उपासना केली तरी ते अंती एकाच ईश्वरराला पोचते, अशी भारतीय विचारधारा आहे. हाच हिंदू विचार अर्थात वेदांत हा भावी जगाचा मार्ग असणार आहे असे स्वामी विवेकानंद म्हणतात. हाच विचार आहे की, जो जगात शांती आणू शकतो,
भारतभूमी ही ऋषी-मुनींच्या वास्तव्याने पावन झालेली, मानव जातीला आत्मिक समाधान मिळावे, या कळकळीतूनच ही महात्मे समाजाशी समरस झालेली. . देशकालमानानुसार मानवी आचरण बदलते. पण मानवी वृत्ती मात्र कायम राहते. एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी समाजमनावर पाश्चात्य वाड.मय, धर्मविचार, पाश्चात्य आचार, विद्या म्हणजे एकंदर संपूर्ण औद्योगिकीकरणाची जबर छाप पडली होती. सर्व धर्माचे आपल्या सनातन तत्त्वांकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. या पाश्चात्य सभ्यतेच्या उसळलेल्या लाटेला थोपवून धरणे नितांत गरजेचे होते. आपल्या भारतात सांस्कृतिक प्रलय घडवून आणण्याइतकी या लाटेत ऊर्मी होती, परंतु ही लाट एका दीपस्तंभाचे पाय धुवून परत फिरली तो दीपस्तंभ म्हणजेच स्वामी विवेकानंद होय.
भारतीय महापुरुषांच्या परंपरेतील सर्वज्ञात महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद. भारताच्या आध्यात्मिक वैभवाची श्रेष्ठता अधिकारवाणीने सांगणारा हा भारतपुत्र कुणाला माहित नाही? स्वामीजींना हे विराट ज्ञान ज्यांच्याकडून प्राप्त झाले, ज्यांनी या हिर्यानला उत्तमरित्या पारखले व त्यांच्या हातून अद्वितीय असे कार्य करवून घेतले ते युगावतार म्हणजेच त्यांचे गुरू 'श्री रामकृष्ण परमहंस.' रामकृष्ण परमहंस यांनी धर्माचा नवा आशयघन अर्थ समाजापुढे उलगडला. विविध धर्म्-संप्रदायांमध्ये सुरू असलेल्या आणीबाणीच्यावेळी 'कोणत्याही धर्मात गेलात तरी, शेवटी त्याच एका ईश्वराप्रती तुम्ही पोहोचाल, तेच एकमात्र सत्य आहे.' असा धर्माचा सार्वजनिक अर्थ त्यांनी सांगितला आणि मानवतेला महत्त्व देणारी हीच भावधारा स्वामी विवेकानंद यांनी पाश्चात्य जगाच्या व्यासपीठावरून विश्वाच्या प्रवाहामध्ये नेऊन सोडली.
'आत्मनो मोक्षार्थ जगद्धितायच' आपल्या या मानसिकतेबरोबरच स्वामीजींनी जनहित साधले. ते स्वतः ठणकावून सांगायचे की, धर्माच्या गोष्टी इथे सांगायच्या असतील, तर आपल्या या देशातील लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल. पददलितांच्या हिताशी अगदी घट्ट जोडून घ्यावे लागेल. आपल्या भारतभूमीत प्रथम आध्यात्मिक विचारांचा पूर वाहिला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. . त्यांच्या विचार विश्वाचा परीघच फार मोठा होता. स्वामीजींनी १९०० च्या आधी अमेरिकेत ' रिलीजन ऑफ लव्ह' या विषयावर व्याख्याने दिली. त्यामध्ये म्हणाले होते, ' बौद्धीक विकासासाठी आपल्याला ग्रंथांचे पुष्कळ साहाय्य होऊ शकते: पण अध्यात्मिक उन्नतीसाठी मात्र ग्रंथांची प्रायः काहीच मदत होत नाही. आपल्या आत्मजागृतीसाठी बाहेरून येणारी शक्ती ही आपल्या गुरूंकडून आली पाहिजे. जी व्यक्ती ही शक्ती देते , त्या व्यक्तीमध्ये ही शक्ती संचारित करण्याचे सामर्थ्य असले पाहिजे आणि क्षेत्रसुद्धा नांगरून तयार पाहिजे आणि ज्यावेळी या दोन्ही गोष्टी पूर्ण होतात, त्यावेळी धर्माचे रोप मोठ्या आश्चर्यकारक रीतीने फोफावू लागते. धर्मोपदेशक हा जसा अलौकिक असला पाहिजे, तसाच उपदेश ऐकणाराही अलौकिक पाहिजे.' भारताबरोबरच परदेशातील जनतेला आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवून त्यांना राजयोग, कर्मयोग, कठोपनिशद, भक्तीयोग समजावून सांगण्याचे बळ त्यांच्यात होते. म्हणूनच त्यांना मानवजातीचे आध्यात्मिक मार्गदर्शनाबरोबरच त्यांनी मानवतेच्या विकासासाठी अन्य क्षेत्रातही तितकेच मोलाचे मार्गदर्शन केले. देश, धर्म, वंश, जात या सार्याब कृतीम भिंतींना पाडून एकत्र येण्यातच कल्याण आहे, हा त्यांनी आजच्या नवयुगाला दिलेला अभिनव संदेश आहे.
'श्रीरामकृष्ण - विवेकानंद' या गुरू- शिष्यांची पहिली भेट झाली, ती १८८१ मध्ये. स्कंद जयंतीच्या उत्सवात झाली. पुढे इथूनच स्वामीजींच्या जीवनाला नवे वळण मिळाले. या गुरु-शिष्यांचे नाते मोठे अलौकिक , असामंजस्य असे होते. याबरोबरच स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे 'शिकागो धर्मपरिषद.' रेव्हरंड जॉन हेन्री बॅरीज यांनी या सर्वधर्म परिषदेविषयी आपल्या एका ग्रंथात लिहिले आहे, ' जगातल्या दुसर्याग कोणत्याही सभेची जगभर कधी इतक्या उत्कंठतेने वाट पाहिली गेली नाही. तीस महिन्यांपर्यंत जगातील सर्व लोहमार्ग आणि सागरीमार्ग अजाणता सर्वधर्म परिषदेचे कार्य करीत होते.' ११ सप्टेंबर १८९३ च्या प्रभाती आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकगोमध्ये सर्वधर्म परिषदेचे उदघाटन झले. ईश्वरवाद ( ब्राम्हसमाज) , यहुदी, इस्लाम, हिंदू, बौद्ध, ताओ, कन्फ्युशिअस, शिंटो, पार्शी , कॅथॉलिक, ग्रीकचर्च, आणि प्रोटेस्टंट असे सर्व धर्माचे अनुयायी परिषदेचे प्रतिनिधीत्व करीत होते. हजारो लोकांमध्ये स्वामी विवेकानंद उठून दिसत होते, ते त्यांच्या भारदस्त लाल पोषाख, पिंगट चेहरा आणि त्यावर चढवलेले पिवळे पागोटे यामुळे हजारो लोकांमध्ये स्वामी उठून . श्रोता समुदायावर स्वामीजींच्या पहिल्या शब्दांचा जो विद्युल्लतेसारखा प्रभाव पडला, तो सर्वश्रुत आहे. 'अमेरिकन भगिनी आणि बंधुनों' असे जेव्हा त्यांनी सभेला सम्बोधित केले , तेव्हा कान बधीर करणारा टाळ्यांचा कडकडाट सतत दोन मिनिटे सुरू होता. त्यांच्या विचारांमुळे व व्यक्तिमत्वामुळेही ते परिषदेत फार लोकप्रिय बनले. विख्यात अमेरिकन विदुषी मेरी लुई बर्क म्हणतात, ' विवेकानंद हे एक संन्यासी असून हार्वर्ड विद्यापीठातील प्रा. राईट यांच्या उद्धॄतीनुसार ते जगातील सर्वात अधिक शिक्षित व्यक्तींपैकी एक होत.' याही उपर त्यांच्या अलोट लोकप्रियतेचे आणखीही एक कारण होते, ते म्हणजे तेव्हा यापूर्वी कधीही अमेरिकन लोकांनी आध्यात्मिक सत्ये संपूर्णपणे जीवनात मूर्त झालेली बघितली नव्हती. तिथे सर्वधर्मपरिषदेत मानवाला महान आध्यत्मिक व्यक्तीबद्दल वाटणारे आकर्षण सहज स्फूर्तपणे अजाणताच प्रगट झाले होते. हजारो लोक या आश्चर्यकारक मनुष्याला पंधरा मिनिटे ऐकण्यासाठी म्हणून तासनतास बसून राहत. अमेरिकेच्या निरनिराळ्या शहरांमधून एकेकावेळी बारा-बारा, चौदा-चौदा व्याख्याने देऊन स्वामींनी जो झंझावती दौरा केला, त्यामुळे त्यांना तुफानी हिंदू असे नाव मिळाले होते. स्वामीजींच्या व्याख्यानांनी प्रत्येकालाच एकीकडे हलवून सोडले असले तरी दुसरीकडे अधिक सखोल स्तरावर जीवनभर राहणार्या आकांक्षांना व विचारांनाही गतिमान केले होते. त्यांच्या ह्या जागतिक भ्रमणातून त्यांनी प्रत्येक ठिकाणी अशी काही ज्ञानाची बिजे पेरली की, आजही स्वामीजी त्या प्रत्येक ठिकाणी त्यातून उगवलेल्या ज्ञानामृताच्या रुपाने जिवंत आहेत. १८९७ मध्ये 'रामकृष्ण मिशनची' स्थापना करून स्वामी विवेकानंद एक 'योद्धा संन्यासी' बनून स्वतः लढाईत उतरले आणि खर्या१ अर्थाने त्यांनी वैराग्य, अध्यात्म, चारित्र्य या सर्व शब्दांच्या व्याख्या स्पष्ट केल्या. स्वामीजींचा एक एक विचार म्हणजे संपूर्ण भारतवर्षाला मिळालेला एक एक अमूल मंत्र आहे. १२ जानेवारी १८६३ ते ४ जुलै १९०२ या अवघ्या ३९ वर्षे पाच महिने आणि २४ दिवसांत त्यांच्या शरीरात वास्तव्यास असलेल्या दिव्य आत्म्याने महामायेचे भयंकर युद्ध जिंकले.
खरेच! स्वामी विवेकानंद म्हणजे एक मौलिक विचार, एका महासागराप्रमाणे अथांग, गाढ पांडित्य आहे.
परतत्वे सदालीनो रामकृष्ण समाज्ञया
यो धर्मस्थापनरतो विरेशं तं नमाम्यहम ||

No comments:

Post a Comment