( मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या 'हसत जगावे' या पुस्तकाचे प्रकाशन करताना चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर. सोबत विलासराव जगताप, चंद्रशेखर गोब्बी, प्रभाकर जाधव दिसत आहेत.)
जत,( वार्ताहर): जतचे पत्रकार आणि लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या 'हसत जगावे' या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध चित्रपट गीतकार आणि कवी बाबासाहेब सौदागर यांच्याहस्ते करण्यात आले. मराठी साहित्य सेवा मंचतर्फे जत तालुक्यातील येळवी येथे आयोजित करण्यात आलेल्या १७ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष श्री. सौदागर होते. त्यांच्याहस्ते प्रकाशन झाले.
मच्छिंद्र ऐनापुरे यांनी 'दै. पुढारी' च्या रविवारच्या बहार पुरवणीत २०१० आणि २०११ मध्ये 'हसत जगावे' या सदरासाठी लेखन केले होते. या सदराचे संकलन या पुस्तकरुपाने प्रकाशित करण्यात आले आहे. श्री. ऐनापुरे हे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने विविध विषयांवर लेखन करीत असून ग्रामीण भागात एक ताकदीचा लेखक म्हणून उदयास येत आहेत, असे गौरवोदगार श्री. सौदागर यांनी काढले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक साहित्य सेवा मंचचे अध्यक्ष माणिक कोडग यांनी केले. आभार डॉ. श्रीकांत कोकरे यांनी मानले. यावेळी कथाकथन संमेलनाचे अध्यक्ष कथाकार रवींद्र कोकरे ( बारामती), कवी संमेलनाचे अध्यक्ष विलास माळी ( गडहिंग्लज), परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. कृष्णा इंगोले, राज्य सहकारी बँकेचे संचालक विलासराव जगताप, प्रभाकर जाधव, चंद्रशेखर गोब्बी, डॉ. सरिता पट्टणशेट्टी, लवकुमार मुळे, मंचचे उपाध्यक्ष कुमार इंगळे, मोहन माने-पाटील, रशीद मुलाणी, राजू कोळी, मारुती मदने, प्रा. चंद्रसेन माने-पाटील आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment