Sunday, January 29, 2012

चित्रपटातील गांधी

राष्ट्रपिता महात्मा गांधी चित्रपट निर्मात्यांच्या पहिल्या पसंदीचे राष्ट्रीय नेते आहेत. काही नामांकित तर काही नवोदित कलाकारांनी या रुपेरी पडद्यावर महात्मा गांधीजींची भूमिका साकारली आहे. काही अशाच 'रिअल लाईफ' गांधींविषयी...
बेन किंग्सले- गांधी
बेन किंग्सले यांचे मूळ नाव कृष्णा पंडित भटजी. त्यांचा जन्म इंग्लंदमध्ये झाला. त्यांची आई ऍनालान्सा मेरी ही ब्रिटिश अभिनेत्री होती. ती मूळची भारतीय. बेन किंग्सले यांना खरी ओळख  गांधी चित्रपटामुळे मिळाली. वास्तविक त्यांना ही भूमिका पसंद नव्हती. परंतु, निर्माता- दिग्दर्शक रिचर्ड एटनबरो यांना गांधीजींच्या भूमिकेसाठी योग्य असा भारतीय चेहरा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी बेन किंग्सले यांची निवड केली आणि आग्रह धरला. अत्यंत सफाईदारपणे किंग्सले पडद्यावर गांधी म्हणून वावरले आणि इतिहास निर्माण झाला.
दर्शन झरीवाला- गांधी माय फादर : २००७
दर्शन झरीवाला गुजराती आहेत. त्यांच्या मातोश्री लिला गुजराती अभिनेत्री होती. दर्शन यांनी 'क्योंकी सांस भी कभी बहु थी' या मालिकेत तुलसचीचे सासरे म्हणूनही काम केले आहे. याशिवाय काही चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. पण त्यांना गांधी- माय फादर मुळेच खरी ओळ्ख मिळाली.
अन्नू कपूर -सरदार : १९९३
अन्नू कपूर टीवी आणि सिनेसृष्टीतील एक चर्चीतले नाव. 'तेजाब' चित्रपटात आणि टीवी वाहिनीवरील 'अंताक्षरी' कार्यक्रमामुळे तो आपल्या सार्‍यांचा परिचयाचा आहे. मात्र १९९३ मध्ये आलेल्या 'सरदार' चित्रपटामुळे त्याची अभिनय क्षमता किती परिपक्व आहे, याचा प्रेक्षकांना अंदाज आला. यात महात्मा गांधीच्या भूमिकेला त्याने चांगला न्याय दिला.
नसरुद्दीन शहा- हे रामः २०००
नसरुद्दीन शहा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बाराबांकी इथला. रिचर्ड एडनबरो यांच्या 'गांधी' मध्ये त्यांना गांधीजींची भूमिका सकारायला मिळाली होती. पण ही भूमिका बेन किंग्सले यांच्याकडे गेली. गांधी साकारायला मिळाला नाही, याची त्यांना मोठी खम्त वाटत होती. परंतु, शेवटी त्यांची ही इच्छा कमल हसनने पूर्ण केली. 'हे राम' या आपल्या चित्रपटात कमलने त्यांना गांधीजींची भूमिका दिली.

1 comment:

  1. आजवर गांधीजींवर अनेक चित्रपट होऊन गेले आहेत; चला तर मग आपण या बद्दल जाणून घेऊयात
    चित्रपट आणि अभिनेता
    1. चित्रपट- गांधी -अभिनेता - बेन किंग्सले (१९८२)
    2. चित्रपट- वल्लभभाई पटेल बायोपिक- अभिनेता - अन्नू कपूर (१९९३)
    3. चित्रपट- रजित कपूर -अभिनेता - द मेकिंग ऑफ द महात्मा (१९९६)
    4. चित्रपट- मोहन गोखले- अभिनेता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९९८)
    5. चित्रपट- नसीरुद्दीन शाह- अभिनेता- राम (२०००)
    6. चित्रपट- दिलीप प्रभावळकर -अभिनेता- लगे रहो मुन्ना भाई (२००६)
    7. चित्रपट- दर्शन जरीवाला -अभिनेता- गांधी, माय फादर (२००७)
    8. चित्रपट- गांधी गोडसे एक युद्ध. अभिनेता- दिपक अंतानी (२०२३)
    9. अभिनेता- सुरेंद्र राजन यांनी अनेक चित्रपटांमध्ये गांधीजींची भूमिका साकारली आहे.

    ReplyDelete