आजकाल प्रत्येक
व्यक्ती इंटरनेटवर काही ना काही शेअर करतो असतो.मग ते फेसबूक असो,ट्विटर असो,इंस्टाग्राम,स्नॅपचॅट किंवा व्हाट्सअॅप,सगळीकडे अगदी जोमाने कित्येक गोष्टी शेअर केल्या जात
आहेत.कित्येकदा शेअरिंग करण्याच्या भानगडीत आपण काही अशा गोष्टी
इंटरनेटवर शेअर करत असतो
की, भविष्यात त्या आपल्याला नुकसानकारक किंवा धोकादायक ठरू शकतात.
जर आपणही सोशल मिडियावर काही गोष्टी मागचा पुढचा कोणताही विचार न करता
शेअर करत असाल तर काही गोष्टींची काळजी घ्या. खाली दिलेल्या नऊ
गोष्टींबाबत अधिक खबरदारी घ्या.आपले नुकसान होण्यापासून वाचवा.
1.फोन क्रमांक
आपल्या प्रोफाईलमध्ये
आपला फोन क्रमांक टाकण्याची आयडिया सहा वर्षांपूर्वी चांगली वाटत होती, ज्यावेळेला फेसबूकने सांगितले होते
की, ही सिक्योरिटीच्या सुधारणेसाठी आवश्यक आहे. इंटरनेटवर उपस्थित असलेली काही वाईट विचारांची माणसं आपल्या फोन क्रमांकाच्या
मदतीने आपल्याला त्रास देऊ शकतात. शिवाय आपल्याबाबतची महत्त्वपूर्ण
माहिती गोळा करू शकतात. विशेषत: स्त्रिया,तरुण मुलींनी याची अधिक काळजी घ्यायला हवी.
2.खराब छायाचित्रे
आपण कित्येकदा
मजेमजेत असे काही फोटो सोशल मिडियावर शेअर करतो की, तेच फोटो पुढे भविष्यात आपल्याला गोत्यात आणू शकतात. जर आपल्या आई-वडिलांना आवडत नसेल तर तसे फोटो सोशल मिडियावर
टाकू नका. कदाचित असंही होऊ शकतं की, आपला
भावी जोडीदार आपल्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा खराब
फोटोंमुळे त्याची आपल्याविषयीची धारणा बदलू शकते.
3.जन्म तिथी
जर आपण आपली जन्मतारीख
सोशल मिडियावर टाकली असेल तर ती त्यावरून तात्काळ हटवा. तुमच्या नाव आणि पत्त्यासोबत जन्मतारीख
मिळाल्यावर हॅकर आपल्या अकाऊंटला नुकसान पोहचवू शकतो. मित्रांना
आपली जन्मतारीख सांगायला आवडत असेल पण अकाऊंटच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने ते धोकादायक
ठरू शकते.
4.रिलेशनशिपची
छायाचित्रे
सोशल मिडियावर
आपल्या नातेवाईकांच्या संबंधातली छायाचित्रे टाकण्यापूर्वी पूर्णपणे विचार करण्याची
आवश्यकता आहे. जर आपण आपल्या
जुन्या मित्राचे छायाचित्र टाकत असाल तर त्याने भविष्यात बनणार्या नातेसंबंधांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. काही
लोक आपल्या भावी जोडीदाराची सोशल मिडियावरील अकाऊंट फारच काळजीने पाहतात. जर तुम्ही जुन्या रिलेशनिपसंबंधित असलेली छायाचित्रे टाकली असतील तर ती डिलीट
करून टाका. फेसबूकचा प्रोफेशनल पद्धतीने वापर करायला शिका.
5. सुट्टीची
छायाचित्रे
आपण सहलीला गेलेली
छायाचित्रे फेसबूकवर टाकली असतील तर तुम्ही सुट्टीला गेल्याचे सहज लक्षात येते, चोरांना हा संदेश मिळू शकतो आणि
ते आपल्या घरात चोरी करू शकतात. फेसबूकवर कधीही एअरपोर्ट किंवा
हॉलीडेची छायाचित्रे टाकण्यापासून सावध राहा. तुम्ही सुट्टीवरून
आल्यावरच या संबंधातले फोटो शेअर करा.काहीजण मिनिटा मिनिटाचे
फोटो किंवा व्हिडिओ सोशल मिडियाशी शेअर करतात, त्यांनी ही आपली
सवय बदलायला हवी.
6. योग्य कंटेंट
शेअरिंग
काही काही वेळेला
आपल्याला आवडणारे व्हिडिओ आपण पूर्ण न पाहताच शेअर कतो. अशा वेळेला आपल्याकडून चूक होऊ
शकते. ज्या ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ शेअर करता , त्या त्या वेळेला अगोदर तो तुम्ही नीट पूर्ण पहा.नंतरच
शेअर करा. असं व्हायला नको की, व्हिडिओत
एकादी चुकीची गोष्ट असेल आणि ती तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचेल.फेसबूक आणि ट्विटर आदींवर उपयोगी कंटेंटच शेअर करा. अनावश्यक
कंटेंट शेअर केल्याने कुणाला त्याचा फायदा होत नाही. कंटेंटच्या
निवडीत सावधानता बाळगा.
7.लोकेशन
फेसबूकवर आपले
लोकेशन टॅग करण्याची आता फॅशनच आली आहे.पण हे धोकादायक ठरू शकते. कुठलीही वाईट व्यक्ती
नुकसान पोहचवू शकते. तुम्ही बाहेर असाल किंवा तुम्ही मुलाला शाळेला
सोडलेला असाल,
अशा पोस्ट्स करण्याच्या टाळा. तुमचे लोकेशन कधीही
फेसबूकवर शेअर करू नका.
8. मालक किंवा
अधिकारी
काही लोकांना सवय
असते की, कुठल्याही गोष्टीत आपल्या मालकाला
किंवा अधिकार्याला ओढण्याची! आपल्याला
असे वाटते की, यामुळे आपला बॉस खूश होईल. पण तुम्हाला कुठलीही पोस्ट टाकण्यापूर्वी याचा विचार करायला हवा की,
आपला बॉस आपली पोस्ट वाचू शकतो. आणि त्याला ते
आवडेल की नाही याचा विचार करा. सोशल मिडियावर आपल्या बॉसला ओडू
नका.
9.चुकीची भाषा
एकाद्यावेळेला
रागाच्या भरात तुम्ही एखाद्याला काही चुकीचे बोलला असाल आणि ती पोस्ट सोशल मिडियावर
टाकली असेल तर ती पोस्ट कधीही उकरून काढून तुमच्यावर आरोप होऊ शकतो. आपण मागे कधी काही चुकीची पोस्ट
टाकली असेल तर ती पाहण्यासाअठी आपल्या अकाऊंटवर सतत नजर ठेवत चला. कुणी त्याचा गैरवापर तर केला नाही
ना, याचा शोध घ्या. सोशल मिडियावर कुणाला
वाईट-साईट बोलू नका किंवा तशा पोस्टस टाकू नका.
No comments:
Post a Comment