भारतीय खगोलशास्त्रज्ञांविना अवकाश जगताचा इतिहास अपूर्ण आहे.भारतीय खगोलशास्त्राचा उदभव प्राचीन काळचा आहे. सहाव्या
शतकापर्यंत भारतीय खगोल विज्ञान जगात अव्वल स्थानावर होते. स्वातंत्र्यानंतर 1962 मध्ये '' इंडियन नॅशनल कमेटी
फॉर स्पेस रिसर्च '' ची स्थापना झाली. या 50 वर्षात
भारताने अवकाश क्षेत्रातल्या प्रमुख सहा देशांच्या पंक्तीत आपले स्थान निर्माण केले
आहे. इतकेच नव्हे तर एका सरकारी अभ्यासानुसार अमेरिकन अंतराळ
संस्था(नासा) मध्ये 36 टक्के वैज्ञानिक
भारतीय आहेत.
प्राचीन काळापासून भारतीय खगोल शास्त्राज्ञांनी उल्लेखनीय आणि भरीव कामगिरी केली
आहे. खगोल विज्ञानावर आधारित पहिला लिखित ग्रंथ '' वेदांग ज्योति'' होय. हा ग्रंथ मौर्य काळात लगधने लिहिला होता.यात खगोलीय मुळाचे आकलन आणि कॅलेंडरची निर्मिती आहे.
आर्यभट्टांनी
सहाव्या शतकात ' आर्यभट्ट सिद्धांत' मध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरताना स्वत:
भोवती फिरते आणि सूर्याच्या किरणांमुळे चंद्र प्रकाशमान दिसतो, हा सिद्धांत
मांडला होता. आर्यभट्ट हे भारताचे महान खगोलविद होते.
खगोलीय गणिती होते. खगोलशास्त्राचा प्रणेता होते..त्यांचा जन्म इ.स. 476 मध्ये पाटीलपुत्र
येथे झाला.
ब्रम्हगुप्त यांच्या 'ब्रम्हगुप्त सिद्धांत' या ग्रंथाचा सातव्या शतकात अरबी भाषेत
अनुवाद झाला. दिनक्रमातील पुढच्या दिवसाची सुरुवात मध्यरात्रीनंतर
होते, या आर्यभट्टांच्या सिद्धांतावर ब्रम्हगुत यांनी शिक्कामोर्तब
केले. वराहमिहिर चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या दरबारातील नवरत्नांपैकी
एक होते. त्यांनी 'पंचसिद्धांत' मध्ये युनान,इटली, रोमन आदी खगोलीय विज्ञानाच्या सिद्धांताचा अंतर्भाव
केला होता. भास्कर पहिला यांनी 'महाभास्कर ', 'लघुभास्कर'
आणि 'आर्यभट्टीय भाष्य' आदी ग्रंथ लिहिले.त्यांनी ग्रहांचे
लंबवत अंतर, ग्रह आणि तार्यांचे संबंध
सूर्य व ग्रहणांवर अचूक मापन केले आहे. लाला या खगोलीय अभ्यासकाने आर्यभट्ट यांच्या
काही सिद्धांतांमध्ये सुधारणा केली. त्याने पृथ्वीची दिवस-रात्रीची योग्य गती, ग्रहण व ग्रहांचा उदय आणि अस्त यांची
अचूकता स्पष्ट केली.
श्रीपतीने
11 व्या शतकात 'सिद्धांतशेखर' हा ग्रंथ लिहिला. यात त्याने काही नवे सिद्धांत मांडले.भास्कर दुसरा याने
'सद्धांत शिरोमणी' आणि 'कर्ण कुतूहल' नावाचे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले.
त्यांनी यंत्रांवर आधारित संशोधनांना उज्जैन इथल्या वेधशाळेत अंजाम दिला.
15
व्या शतकात सुल्तान फिरोजशाह तुगलक याच्या काळात महेंद्र सुरी
यांनी ङ्गयंत्र राजाङ्घ या नावाचे पुस्तक लिहिले.त्यांनी चित्रांच्या
माध्यमातून खगोल विज्ञानाच्या अनूेक सिद्धांतांना प्रमाणित केले. केरळचे एक खगोलविज्ञानी आणि गणित शिक्षक लाकंठन सोम्याजी यांनी 16 व्या शतकात बुध आणि शुक्राच्या मार्गक्रमणाचा आर्यभट्टांच्या मॉडेलचा पुर्नस्थापना केला. 17 व्या
शतकात अक्युत पिसरती यांनी सूर्य आणि चंद्रहणाच्या आकलनासाठी सिद्धांतामध्ये सुधारणा
केली.
अशाप्रकारे प्राचीन काळापासूनच खगोलविज्ञानात आपल्या देशाचे योगदान महत्त्वपूर्ण
राहिले आहे.भारताच्या स्वातंत्र्यानंतर या दिशेने पुन्हा
एकदा काम सुरु झाले. विक्रम साराभाई यांना भारतीय अवकाश कार्यक्रमाचा
पिता म्हटलं जातं. 1957-58 मध्ये 'जियो-फिजिक्स' म्हणून घोषित करण्यात आले होते.1957 मध्ये
'स्पुतनिक' या रशियन उपग्रहासाठी विक्रम साराभाई यांची मदत घेण्यात आली होती.
तेव्हापासून ते चर्चेत आले. 1962 मध्ये त्यांच्या
अध्यक्षतेखाली 'इंडियन नॅशनल कमेटी फॉर स्पेस रिसर्च' ची स्थापना करण्यात आली.
1969 मध्ये 'इस्त्रो'ची स्थापना झाली. त्याचे
ते पहिले अध्यक्ष झाले. होमी जहांगीर भाभा यांच्या सहकार्याने
त्यांनी तिरुअंनंतपुरमजवळ असलेल्या थुंबा या ठिकाणी रॉकेट उड्डाण केंद्र उघडले.
येथून 1963 मध्ये सोडियम गॅसवर चालणार्या रॉकेटचे उड्डाण करण्यात आले. 966 मध्ये भाभा यांचे
निधन झाले. 'एटोमिक एनर्जी कमिशन' या संस्थेच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती झाली.
1966 मध्ये त्यांच्या प्रयत्नाने आणि नासाच्या सहकार्याने 'सॅटेलाइट
इंट्रकशन टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट' ची सुरुवात झाली त्यांच्या निधनानंतर
1975 मध्ये भारताने ' आर्यभट्ट' हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला.
डॉ. सतीश धवन इस्त्रोचे प्रदीर्घ काळ अध्यक्ष राहिले.
ते एरोस्पेस इंजिनिअर होते. त्यांना'एक्सपेरिमेंटल
फ्लूड डायनेमिक्स'चे जनक मानले जाते.त्यांनी रिमोट सेसिंग सॅटॅलाईट
कम्युनिकेशन्सवर उल्लेखनीय प्रयोग केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली
ऑपरेशन सिस्टीमसारखा 'इन्सेट ' कम्युनिकेशन्स सॅटेलाईट, आय
आएएस आणि पोलर सॅटेलाईट 'पीएसएलव्ही' ची सुरुवात होऊ शकली. त्यामुळे भारत उपग्रह बनवणार्या देशांच्या श्रेणीत जाऊन
बसला.धवन यांचे नाव श्रीहरीकोटा येथील उड्डाण केंद्राला देण्यात
आले आहे.
इस्त्रोचे माजी अध्यक्ष यु. आर.राव यांचे नाव जगातल्या 10 स्पेस पर्सनेल्टीमध्ये घेतले
जाते. त्यांच्या देखरेखीखाली 1975 मध्ये
'आर्यभट्ट'हा पहिला उपग्रह बनवला गेला. याशिवाय 'अॅपल', ' रोहिणी'आदी 18 सॅटेलाईट
बनवले गेले. त्यांनी रॉकेट लाँचींंग तंत्रज्ञानात सुधारणा केली.
'इन्सेट' चे यशस्वी उड्डाण करण्याचे श्रेय राव यांना जाते.
यामुळे भारतात माहिती तंत्रज्ञानाची क्रांति घडली. या त्यांच्या योगदानामुळे त्यांना अमेरिकेने मानाचा 'सॅटेलाईट हॉल ऑफ फेम
' हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
कृष्णस्वामी कस्तुरीरंगन हे जवळपास नऊ वर्षे इस्त्रोचे अध्यक्ष होते.
त्यांनी न्यू जनरेशन स्पेस क्राप्ट विकसित केले. त्यांनी चंद्रयान-1 मोहिमेत उल्लेखनीय भूमिका बजावली.
जी. माधवन नायर 2003 मध्ये
इस्त्रोचे अध्यक्ष झाले. रॉकेट सिस्टीमच्या क्षेत्रात ते माहिर
होते. त्यांनी ' मल्टी स्टेज सॅटेलाईट लाँच ह्वीकल' च्या
विकासात योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात चांद्रयान-1
सह 27 मोहिमा पार पडल्या. 2009 मध्ये ते 'इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ एस्टोनॉटिक्स'चे
अध्यक्ष बनले. या संस्थेचे अध्यक्ष बनणारे ते पहिले अध्यक्ष होत.
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी 1958 मध्ये
डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) मध्ये कामाला सुरुवात केली. 1962 मध्ये ते इंडियन स्पेस
प्रोग्रॅमशी जोडले गेले. 'एसएलव्ही-3'
चे ते प्रोजेक्ट डायरेक्टर होते. या कालावधीत रोहिणी उपग्रह अवकाशात
सोडण्यात आला.यानंतर त्यांना हैद्राबाद येथील डिफेन्स रिसर्च काँप्लेक्समध्ये पाठवण्यात
आले. डॉ. कलाम यांनी पृथ्वी,नाग,त्रिशूल, अग्नी आदी मिसाईलांचे
प्रक्षेपण केले. यामुळेच त्यांना 'मिसाईल मॅन ऑफ इंडिया'असे
म्हटले जाते.
विंग कमांडर राकेश शर्मा यांचा 1984 च्या अवकाश
अभियानमध्ये त्यांचा समावेश होता. इस्त्रोने त्यांना सोवियत संघाच्या आठ दिवसाच्या अवकाश मोहिमेअंतर्गत' सॅल्युट-7
अवकाश स्थानका'वर पाठवले होते. अवकाश यात्रा करणारे ते पहिले भारतीय
आहेत. भारतीय वंशाची अमेरिकन विज्ञानी हिने 1977 मध्ये 'कोलंबिया शटल' च्या उड्डाणादरम्यान स्पेस वॉक केले होते.
दुसर्या मोहिमेत मात्र कोलंबिया यान दुर्घटनाग्रस्त झाले आणि त्यात तिचा
दुर्देवी मृत्यू झाला.सुनीत विलियम्सदेखील भारतीय वंशाची अमेरिकन
शास्त्रज्ञ आहे. अवकाश सर्वात जास्त काळ राहणारी ती पहिली महिला
आहे. ती 2007मध्ये भारतात आली होती.
महाराष्ट्राचे सुपूत्र व विख्यात खगोल
शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचेखील अवकाश संशोधनात महत्त्वपूर्ण
योगदान आहे. डॉ. फेड हॉइल व डॉ.
नारळीकर या गुरु शिष्याच्या जोडगोळीने गुरुत्वाकर्षण, सापेक्षता व विश्वरचना यांच्या संदर्भात नवा सिद्धांत
मांडला. त्याला स्थीर सिद्धांत म्हणतात.त्यांचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झाला.गणितात ते डॉक्ट्रर झाले. अवकाश क्षेत्रातील भारताची कामगिरी अतुल्य आहे. किंबुहना
भारतीय खगोल संशोधनामुळे इतर देशातल्या शास्त्रज्ञांना अवकाश संशोधनात नव्या वाटा मिळाल्या.
त्यामुळे भारतीय खगोलशास्त्रज्ञांविना अवकाश जगताचा इतिहास अपूर्ण आहे.
No comments:
Post a Comment