Thursday, February 9, 2017

संत कवी रोहिदास


संत कवी रोहिदास हे चर्मकार समाजात जन्मले. बालपणापासून हरिभजनात दंग राहणारे रोहिदास हे मोठेपणीही ‘हरी हरी’ करू लागल्यावर व्यवसायाकडे लक्ष लागेना.  मेलेल्या गुरांची कातडी कमावणे हा रघुबाबांचा पिढीजात धंदा होतोपरंतु रोहिदास वडिलांनी सतत सांगूनही त्यात लक्ष घालीना. अखेर आईने म्हटले, ‘लग्न करून दिलंतर देवाचं वेड कमी होईल…’

      रोहिदास वयात आले. लोना नामक मुलीशी त्यांचा विवाह लावून देण्यात आला. तरीही त्यांचे मन संसारात रमेना. आईवडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. त्यांनी घरामागील जागेत संसार मांडला. तिथे भजन-पूजन सुरू ठेवले. साधुसंतभाविक भक्त येऊ लागले. ते त्यांना खाण्यापिण्यासाठी काही देतत्यात त्या दोघांना तेवढ्यावरच पोटपूजन करावे लागत असे.
एक कथा अशी सांगितली जाते –
संत रोहिदासांची बिकट सांसारिक परिस्थिती पाहून त्याची देवाला दया आली. तेव्हा देव भटक्या साधूचे रूप घेऊन गेला. त्याच्या झोपडीत जाऊन भेटला.
देवाचा प्रसाद घे!’ असे म्हणाला आणि एक पिशवी देऊन निघून गेला. पिशवीत पाहिले तर तिच्यात होत्या सोन्याच्या मोहरा!
रोहिदासांनी त्या मोहरा खर्च करून एक मंदीर बांधलेते काशीत! पुजारी ठेवले ब्राह्मण! एका चर्मकाराने ब्राह्मणाला चाकरीस ठेवले या गोष्टीचा राग आला. ब्राह्मणाने त्याविरुद्ध बादशहाकडे तक्रार केली. रोहिदासांना दरबारात हजर करण्यात आले. रोहिदासांची अमृतवाणी आणि डोळ्यांतील तेजस्वी पाणी पाहून बादशहा त्यांचा शिष्य झाला!
दुसरी कथा अशी आहे :
रोहिदासांची शिष्या होती संत मीराबाई. तिने रोहिदासांकडून उपदेश घेतला. ते काशीहून चितोडला आले. कुंभश्याम मंदिरात राहू लागले. राजकन्या मीराबाईने एका चर्मकाराला गुरू केले आणि मंदिरात राहायला दिले म्हणून लोक रोहिदासांचा तिरस्कार करू लागले. एकदा लोकांनी त्यांना विचारले,

‘‘तुझ्या गळ्यात जानवं आहे का?’’
‘‘नाही.’’ रोहिदासांनी नम्रपणे म्हटले.
‘‘मग तुला काय अधिकार देवपूजेचा?’’
तेव्हा त्यांनी काय केलेआपल्या अंगावरील कपडा बाजूस केला आणि आपल्याजवळील ‘आरी’ या चामडे कापायच्या हत्याराने जानव्याच्या जागी चामडी चिरलीतर चामडीखाली जानवे सुवर्णासारखे चमकले! ते पाहून दांभिकांचा दंभ जळून खाक झाला.
चमत्काराला चमत्कार करणारे विद्वान त्या निरीक्षर संताला शरण गेले.
रोहिदासांना साक्षर व्हायला मिळणे शक्यच नव्हते. कुठल्या शाळेत प्रवेशच नव्हता. संतसाधू भेटत. त्यांच्या संगतीत ज्ञान मिळत असे तेवढेच शिक्षण. काव्यस्फूर्ती होऊ लागली. कविता लिहून घेणार शिष्य लाभले. त्यांच्या भक्तिगीतात व्याकूळता आहे. ईश्‍वर अजून आपला उद्धार करीत नाही ही व्यथा आहे.
संत रोहिदासांना महाराष्ट्रात ‘रोहिदास’ म्हणतात, पण देशातील अनेक प्रांतात त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. ज्या उत्तर प्रदेशातील काशी जवळील मांडूर गावी त्यांचा जन्म झाला, तिथे त्यांना ‘रविदास’ नावाने ओळखले जाते. संत रोहिदास भारतातील एकमेव असे संत आहेत की, त्यांना १६ नावांनी ओळखले जाते. त्यांची स्मारके, पुतळे, त्यांच्या नावाच्या धर्मशाळा देशभर आहेत.
त्यांना पूर्ण देश ओळखतो. ख-या अर्थाने ते एकमेव राष्ट्रीय संत आहेत! १४ व्या शतकापासून आजपर्यंत सर्व समाजाला त्यांची दखल घ्यावी लागली. यातच त्यांचे वेगळेपण व त्यांचे सामर्थ्य अधोरेखित होते. शिखांच्या ‘गुरू ग्रंथसाहिब’मध्ये संत रोहिदासांची ४० पदे आहेत. हे हिंदू संत असतानाही शिखांच्या धर्मग्रंथात त्यांच्या रचनांना मानाचे स्थान मिळाले, याचाच अर्थ त्यांच्या दोह्यांमधला, पदांमधला भावार्थ हा हिंदू धर्मापुरता संकुचित नव्हता.
संतकवी रोहिदास किंवा रैदास यांचा जन्म झाला १४१४ सालात आणि त्यांनी देह ठेवला १५४० मध्ये असे अभ्यासक सांगतात. त्यांचे अनुयायी उत्तर प्रदेशगुजरातमहाराष्ट्रराजस्थानपंजाब या राज्यांत सर्वाधिक आहेत. गुजराती चर्मकार ‘रविदासी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. रोहिदासांच्या निर्वाणस्थानाबद्दल एकमत नाही. चितोडच्या कुंभश्याम मंदिरातच ते निजधामाला गेलेअसे संशोधक म्हणताततर काही म्हणतात,त्यांनी काशीतच देह ठेवला.त्यांनी जीवनाची क्षणभंगुरता सांगितली आहे. जीवब्रह्माचे ऐक्यअवघे चराचर भगवंताने व्यापलेले असून निर्गुणभक्तीचे सुबोध स्पष्टीकरण केले आहे. दासगणू म्हणतात, ‘जन्म झालासे चर्मकारवंशी। ज्ञान पाहता लाजवी वसिष्ठांसी॥’
धन्य ते रोहिदास! 


No comments:

Post a Comment