Thursday, February 9, 2017

गरीब पंतप्रधान


     भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री म्हणजे साधेपणामहानता  आणि त्याग यांचे मूर्तिमंत उदाहरण.  त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रेरणादायी आहेत. ते देशाचे पंतप्रधान असतानाचाच हा प्रसंग.  एकदा ते कापड गिरणी पाहायला गेले होते.  त्यांच्याबरोबर गिरणी मालकपंतप्रधान कार्यालयातले उच्चपदस्थ अधिकारी व अन्य महत्त्वाचे लोक उपस्थित होते. गिरणी पाहून झाल्यावर  शास्त्री गिरणीच्या गोदामात गेले. तिथे  त्यांनी काही साड्या दाखवायला सांगितल्या. गिरणी मालकाने एकापेक्षा एक अशा सुंदर साड्यांचा नजराणाच त्यांच्यापुढे पेश केला.   शास्त्री साड्या पाहून म्हणाले,'साड्या तर फारच सुंदर आहेतयांच्या किंमती काय आहेत?'
         ' 
ही साडी ८०० रूपयांची आहे आणि हिची किंमत एक हजार रुपये आहे,' गिरणी मालक सांगत होता. 'या तर फारच महाग आहेतमला कमी किमतीच्यास्वस्तातल्या  साड्या दाखवा', शास्त्री म्हणाले. हा प्रसंग १९६५ मधला आहे. त्यावेळची साडीची किंमत एक हजार रुपये म्हणजे आजच्या घडीला त्याची किंमत काय होईलयाचा आपल्याला अंदाज आलाच असेल.  
        'बरंही पहा. ही साडी पाचशे रुपयांची आहे आणि ही चारशेची,' गिरणी मालक दुसर्‍या दालनातल्या साड्या दाखवत म्हणाला.  'शेठमला इतक्या महागड्या साड्या नको आहेत. मी गरीब आहे. गरिबाला परवडतील अशा साड्या दाखवा'  शास्त्री म्हणाले. काय साहेबचेष्टा करता माझी! आपण तर देशाचे पंतप्रधान. तुम्हाला गरीब कोण म्हणेलआणि आम्ही काही तुमच्याकडून पैसे घेणार नाही आहोत. त्या आम्ही भेट देणार आहोत.'  गिरणी मालक

    ' नाही शेठमी आपली भेट घेऊ शकत नाही', शास्त्रीजी म्हणाले. यावर तो गिरणी मालक अधिकार वाणीने  म्हणाला, 'आम्ही आमच्या पंतप्रधानांना भेट देतोय आणि तो आमचा अधिकार आहे.'
       ' 
होमी पंतप्रधान आहे,' शास्त्रीजी शांतपणे म्हणाले.पण  याचा अर्थ असा नव्हे की मी भेटवस्तू स्वीकारल्याच पाहिजेत. आणि माझे म्हणाल तर ,ज्या वस्तू मी खरेदी करू शकत नाही त्या वस्तू मी भेट म्हणून स्वीकारून मी माझ्या पत्नीला देऊ शकत नाही. कारण ती एका गरीब माणसाची अर्धांगिनी आहे.  शेठ  मी पंतप्रधान असलो तरी मी गरीबच आहे. पंतप्रधानपद काय आज आहेउद्या नाही.  तुम्ही मला स्वस्तातल्याच  साड्या दाखवा. मी माझ्या ऐपतीप्रमाणेच खरेदी करीन.'
     
गिरणी मालकाच्या सगळ्या विनवण्या व्यर्थ गेल्या. देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला परवडतीलअशाच साड्या खरेदी केल्या. शास्त्री इतके महान होते की  त्यांना मोहसुद्धा स्पर्श करू शकला नाही.

No comments:

Post a Comment