दोन्ही डगरीवर पाय ठेवून राहणार्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था आता ना घर का ना घाट का, अशी झाली आहे. राष्ट्रवादीला आता कोणी जवळ करणार नाही,
अशी परिस्थिती असली तरी, शरद पवार यांनी काँग्रेससोबत
आघाडी करू, हे आपले पालपूद लावलेच आहे. पण आता जवळपास दोन अडीच वर्षे तरी संधी नाही. तोपर्यंत
कमळ अजून काय काय चमत्कार करेल आणि घड्याळाची टीकटीक कायमची बंद करेल, सांगता येत नाही. त्यामुळे शरद पवार स्वाभिमानासाठी काँग्रेसमधून बाहेर
पडले.पण आज त्यांनी स्वाभिमान गहाण ठेवायला निघाले असले तरी,
त्यांना विचारायला कुणी तयार नाही. 20-25 वर्षातच
त्यांना विजनवासात जावे लागणार की, काय अशी शंका येऊ लागली आहे.
राष्ट्रवादीची
स्थापना काँग्रेसमध्ये ताठ मानेने राहता येत नाही म्हणून स्वाभिमानाच्या तत्वावर करण्यात
आली. सोनिया गांधी या विदेशी आहेत, हा मुद्दा पवारांनी केला. कारण सोनियांनी मनमोहनसिंग
यांना पंतप्रधान पदासाठी निवडले. त्या आधी नरसिंहराव यांच्यामुळे
पवारांना या पदाने हुलकावणी दिली. म्हणून 12 डिसेंबर हा स्वाभिमानदिन म्हणून घड्याळकरांनी साजरा करणे सुरू केले.
काँग्रेसमध्ये राहून नव्हे तर सोबत राहून आपण केंद्रात सर्वोच्च पदाला
गवसणी घालू शकतो, असे पवारांनाच वाटले. केंद्रात आणि राज्यातही ते सत्तेत काँग्रेससोबत सहभागी झाले. पाटी पलटताना दिसताच त्यांनी काँग्रेसची साथ सोडली. कारण
शिवसेना- भाजपा ही युती तुटली होती. पवारांच्या
पक्षाला आता तीन स्पर्धक होते. निवडणुकीनंतर जो सत्तेच्या जवळ;
त्याला आपण जवळ करायचा, ही चाल असू शकते.
काँग्रेस गलितगात्र झाली. भाजपाला केंद्रात कुणाचीच
गरज राहिली नाही. असती तरीही पवारांच्या पक्षाची ती पत नव्हती
आणि आता बिनशर्त पाठिंबा देऊनही ’जातीयवादी’ पक्षासोबत जाऊन पुरोगामीत्वाचा स्वाभिमान राखता येत नव्हता. युती तुटेल आणि सरकार पडेल, अशा ’मियाँ मरेंगे और बैल बटेंगे’ या आशेवर राहण्याचे काय
फळ मिळाले ते दिसते आहे.
आता शिवसेना- भाजपाचा
हा बनाव आहे की एकत्र राहणे ही दोघांचीही अगतिकता, जनतेचा कौल
काय म्हणायचे ते काळच सिद्ध करणार आहे. मात्र ते एकत्र आहेत.
मुंबईतदेखील शिवसेनेला कडवेपण बाजूला सारत पुन्हा एकत्र यावेच लागणार
आहे. दुय्यमत्त्व त्यांच्या नीती आणि कर्तृत्वामुळे जनतेने त्यांना
दिले आहे. यात राष्ट्रवादीला दुसर्या स्थानी राहण्याचे धोरणही
नीट राखता आलेले नाही. पवारांचा हा केवळ निवडणुकीतील पराभव नाही
तर राजकीय खेळ्यांमध्येही ते पराभूतच झालेले आहेत. विश्वासघात हा त्यांच्या राजकारणाचा पाया राहिला असताना इतरांकडून विश्वासार्हतेची अपेक्षा करणे गैरच आहे. आता पुन्हा काँग्रेसला
सोबत घेऊनच लढू, हे त्यांचे म्हणने हास्यास्पदच आहे. तुमचे अस्तित्वच उरलेले नाही. होते ते पश्चिम महाराष्ट्रातील साडेचार जिल्ह्यांपुरतेच होते. तिथेही
आता ते संपलेले आहे. मराठाही तितुका त्यांनी घालवला आहे.
त्यांना आता पुन्हा शुन्यातून सुरूवात करावी लागेल आणि आता ती वेळ आणि
क्षमताही राहिली नाही.
No comments:
Post a Comment