पूर्वी शिक्षकांनी मुलांना खेळायला चला म्हटले की, हुर्रोऽऽऽ
करत मुले वर्ग डोक्यावर घेत धावतच पटांगणावर पोहचतात. खेळ म्हणजे
त्यांचा जीव की प्राण. पण अलिकडच्या काळात शाळा असो या घर . खेळाला महत्त्वच
उरलं नाही. सदानकदा मुलांना अभ्यासाला जुंपलं असल्याचं चित्र दिसतं. त्यामुळे
अलिकडच्या काळात मैदानी खेळाच्या जागा बैठ्या खेळांनी घेतले असल्याचे दिसते.
पूर्वी खेळाच्या माध्यमातून शारीरिक विकास कसा साधेल, याचा विचार
व्हायचा.बौद्धिक विकासाबरोबरच खेळालाही महत्त्व दिले जायचे. पूर्वीच्या
खेळांमध्ये पकडापकडी, लपाछपी,विटी-दाडू, सूरपाटी, गोट्या, आंब्याची कोय किंवा चिंचोक्यांचा खेळ, आंधळी कोशिंबीर, सुरपारंब्या, डोंगराला
आग लागली पळापळा, तळ्यात-मळ्यात, आईचं पत्र हरवलं,
असे अनेक नानाविध खेळले जायचे.मनोरंजन, बौद्धिकतेबरोबर
मुलांचा शारीरिक विकास साधला जायचा. त्यामुळे मुलांचे आरोग्य चांगले राहायचे. कुठलीही शारीरिक
कामे ती विनासायास करायचे. पण काळ बदलत गेला तसे खेळ शाळांमधून आणि गल्लीतून हद्दपार हो
ऊ लागला. अलिकडच्या काळात अभ्यासाला अधिक महत्त्व दिले जाऊ लागल्याने
मुलांना शारीरिक व्याधींनी गाठले. शहरी भागात मैदानी खेळाने बैठ्या खेळांनी घेतल्याने तर त्यात
आणखीणच वाढ झाली. साहजिकच आजची मुले बौद्धिकतेत आघाडीवर असली तरी शारीरिक आरोग्याच्याबाबतीत
कमकुवतच होत चालली.
मात्र शारीरिक आरोग्य असेल तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार
पडतात. नाही तर ऐन परीक्षेच्यावेळी मुले आजारी पडतात. परीक्षेचे
टेन्शन घेतात.याच्याने विविध शारीरिक व्याधी जडतात. असं सांगितलं जातं की, बारा वर्से
वयोगटातील मुलांसाठी खेळ आवश्यक आहे.
कारण खेळ खेळल्याने त्यांच्या मेंदूतील 12 लाख अब्ज
पेशी काम करतात. आणि बुद्धीची वाढ होते. शारीरिक वाढ
होण्याबरोबरच आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी उद्भवत नाहीत.
परंतु, बदलत्या काळानुसार, जीवनशैलीनुसार
मिदानी खेळांचे प्रमाण फारच कमी होत चालले आहे. भरमसाट लोकसंख्या
वाढल्याने लोकवस्ती वाढत आहे. खेळाला मैदानी उपलब्ध होईनाशी झाली आहेत. शाळांमध्येही
पुरेशी मैदाने नाहीत. ग्रामीण भागातही हीच आवस्था निर्माण झाली आहे. थंडी-ऊन-वारा-पाऊस यांचा बाऊ करीत पालकही आता मुलांना बाहेर खेळायला सोडीनाशे झाले आहेत. नोकरदारव्रग
तर त्यांच्या खेळण्यकडे लक्षच देत नाहीत.
घरात मोबाईल, संगणक उपलब्ध करून देत त्यांना त्यातच रमवताना दिसतात. त्यामुळे
मुलेही त्यातच अधिक रममाण होत आहेत.
शहरी भागातल्या मुलांना आता काही जुन्या खेळांची माहितीदेखील
नाही.भुईमुगाच्या शेंगा कोठे लागतात, तर झाडावर
अशी शहरी मुले सांगतात, असा एक विनोद आहे,
तसा प्रकार खेळाच्याबाबतीत हो ऊ लागला आहे. जुन्या खेळाची
माहिती सांगणारेही आता कोणी दिसत नाही.
शिक्षणाच्या माध्यमातून जेवढी माहिती मिळेल तेवढेच! बौद्धिक विकास
आवश्यकच आहे पण त्याहीपेक्षा शारीरिक विकास महत्त्वाचा आहे. शाळा पातळीवरच्या
अभ्यासक्रमात या दोन्ही गोष्टींना महत्त्व देण्यात आले असले तरी पुरेशा सोयी-सुविधांअभावी या गोष्टी
साध्य होताना दिसत नाहीत. बौद्धिक विकासाला चालना देण्यार्या खेळांमध्ये सापशिडी, बुद्धिबळ, विविध प्रकारची
कोडी , विविध गेम्स आहेत.
पण मुलांचा अधिक ओढा गेम्स खेळण्यांकडे अधिक आहे. त्याच्या
अतिरेकाने मानसिक ताणतणाव निर्माण होतो,
तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अर्थात अशा
बैठ्या खेळांमधून बौद्धिक विकासाला चालना मिळत असली तरी शारीरिक विकासाचा प्रश्न उरतोच. त्याच्याने
त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. काही पालक-शिक्षक याकडे आवर्जून
लक्ष देत असले तरी ही संख्या अगदीच नगण्य आहे. मुलांच्या
आरोग्यासाठी मैदानी खेळ मुलांमधे रुजवण्याचे व त्याची आवड निर्माण करण्याचे प्रयत्न
जोरदारपणे व्हायला पाहिजे आहेत.यासाठी शासनानेही अधिक दक्ष राहून शाळांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची
गरज आहे.
No comments:
Post a Comment