डॉ. शिवशंकर प्रसाद गरीब आणि गरजवंतांवर
फक्त दहा रुपयांच्या मोबदल्यात उपचार करतात. हे उपचार ते आज करत
नाहीत तर गेल्या तीस वर्षांपासून करतात. बिहारमधील नालंदा जिल्ह्यात
त्यांचे सुहागी नावाचे क्लिनिक आहे. 1986 मध्ये एमबीबीएसचे शिक्षण
पूर्ण झाल्यावर त्यांनी सुहागी क्लिनिक नावाने हॉस्पीटल सुरू केले.ते आजही गरिबांसाठी 24 तास खुले आहे. गरिबांना अगदी स्वस्तात उपचार करण्यामागेदेखील एक कारण आहे. यामागे त्यांचे व्यक्तिगत दु:ख दडले आहे. डॉ.प्रसाद फक्त एक वर्षांचे असताना त्यांच्या आईचा उपचारांअभावी
मृत्यू झाला.त्यांच्या आईला टिटनेस(धनुर्वात)
झाला होता.हा आजार क्लोस्ट्रीयम टीटनी बॅक्टेरियाच्या
कारणामुळे होतो. पैशांच्या कमतरतेमुळे त्यांच्या आईवर उपचार होऊ
शकले नाहीत.आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.वडिलांकडून ही गोष्ट कळली तेव्हाच,त्यांनी लहानपणी आपण
डॉक्टर व्हायचे, अशी मनाशी खूणगाठ बांधली होती. शिवाय त्याचवेळी त्यांनी निर्धार केला होता की, आपण डॉक्टर
झाल्यावर गरिबांना पैशांअभावी मरू देणार नाही. आजदेखील ते तो
निर्धार कायम ठेवत गरिबांवर उपचार करत आहेत. त्यांना दिवस-रात्र रुग्णांवर उपचार करताना मोठा आनंद मिळतो.

सुहागी क्लिनिकमध्ये
त्यांच्याशिवाय आणखीही पाच अन्य डॉक्टर आहेत. या डॉक्टरांकडूनही फी स्वरुपात मामुलीचीच रक्कम घेतली जाते.
यात बैद्यनाथ प्रसाद नावाचे डॉक्टर अस्थीरोग तज्ज्ञ आहेत.त्यांचे स्वत:चे पाटण्यात नर्सिंग आहे. पण आठवड्यातून दोन वेळा त्यांच्या सुहागी हॉस्पीटलमध्ये गरिबांवर उपचार करण्यासाठी
येत असतात. याशिवाय डॉ. अजय कुमार आणि आणखी
तीन डॉक्टर गरिबांसाठी उपचार करण्यासाठी येत असतात. डॉ.
शिवशंकर प्रसाद जिथे डॉक्टरसुद्धा जात नाहीत, अशा
दुर्गम परिसरातील गावांमध्ये जाऊन प्रत्येक महिन्याला मेडिकल कँंपदेखील लावतात.या कँपमध्ये रुग्णांचे ब्लडप्रेशर,शुगर,दातांची तपासणी आणि आणखी काही तपासण्या केल्या जातात. सँपल म्हणून मिळालेली गोळ्या-औषधे याठिकाणी मोफत वाटली
जातात.डॉ.शिवशंकर प्रसाद म्हणतात की,
आपल्या देशात गरिबी प्रचंड आहे. आपण एकटे सगळ्यांवर
उपचार करू शकत नाही,मात्र माझा प्रयत्न असतो की, नालंदातील गरिब उपचारासाठी भटकू नयेत.जितके शक्य आहे,तितकी मदत करण्याचा माझा प्रयत्न असतो.
No comments:
Post a Comment