हुंडा एक दंश आहे
आजच्या जमान्यातला कंस आहे
पोरं कमाईचे स्त्रोत आहेत,
पोरी आजदेखील बोज आहेत.
पण याला काही तर्क नाही
पोरींना आजदेखील जाळलं जातं,
त्यांच्या आकांक्षांना आजदेखील गाढलं जातं
का
नेहमी पोरींचाच बळी चढला?
का नेहमी त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला?
का! त्यांचा हक्क नाही
स्वप्नं विणण्याचा?
की, त्यांना हक्क नाही कुणी आपला निवडण्याचा?
का त्यांच्याच भोवती समाजाच्या मर्यादा आहेत?
का त्यांच्यासाठी सगळे कायदे आहेत?
का बरं, आपण हे सगळे भेदू शकलो नाही?
का बरं, आपण हे सगळे गाढू शकलो नाही?
आम्हाला माहित आहे,
ही वाईट प्रथा आहे
पण तरीही ही चालत आलेली कथा आहे
पोरींचा बळी जातच राहणार
पोरांची मागणी वाढतच राहणार
पण गड्यानों,
एक दिवस असा येईल
ना पोरी राहतील,
ना त्यांच्यासोबतीने येणारा हुंडा
बेटी म्हणजे तुपरोटी हा राहिल उद्याचा फंडा
तुम्हालाच हातात घेऊन फिरावं लागेल मग हुंडा
No comments:
Post a Comment