काइट फोटोग्राफी हा प्रकार तसा जुना
आहे. इतिहासात काही मोहिमांमध्ये या फोटोग्राफीचा वापर करण्यात
आला आहे.मात्र भारतात ही फोटोग्राफी दुर्मिळ आहे. मुंबईतल्या बोरीवलीत राहणारे दिनेश मेहता ही काइट फोटोग्राफी कित्येक वर्षांपासून
करत आले आहेत. काइट फोटोग्राफी म्हणजे पतंगाने काढलेला फोटो.
यात पतंगाला कॅमेरा लटकावतात आणि तो उडवून त्या त्या भागातले फोटो काढतात.
हे आपल्याला काहीसे विचित्र आणि जोखमीचे वाटत असले तरी दिनेश मेहता ही
फोटोग्राफी गेल्या पंधरा वर्षांपासून करत आहेत. दिनेश मेहता भारतातले
एकमेव एरियल फोटोग्राफर आहेत.

मासे पकडण्यासाठी
वापरण्यात येणार्या जाळ्याची दोरी या काइट फोटोग्राफीसाठी वापरतात. पतंग
उडवताना हातात ग्लोव्ज वापरणं आवश्यक असतं. त्याने हात सुरक्षित
राहतात. दिनेश यांनी आपला कॅमेरा ठेवण्यासाठी खास पद्धतीचा क्रॅडल
बनवला आहे. कॅमेर्यासोबत एक छोटी मोटर
लावलेली असते. इंटरवल मोडमध्ये ठेवलेल्या कॅमेर्याला हळूहळू फिरवण्याचे काम या मोटरद्वारा केले जाते. अशा प्रकारे वेगवेगळ्या अँगलमधून फोटो काढले जातात.
कार्बन फायबरपासून
बनवण्यात आलेल्या या पतंगांचे वजन साधारण 100 ते 150 ग्रॅम असते. हे पतंग
200 फूट ते 1200 फुटापर्यंत उंच उडवले जाऊ शकतात.
व तेथून फोटो काढले जातात. हवेचा वेग जर जास्त
असेल तर पतंग लहान आणि कॅमेरा मोठा वापरला जातो.त्याच्याने बॅलेन्स
सांभाळणं सोपं जातं.त्यांच्या पत्नी दीप्तीदेखील प्रत्येक प्रोजेक्टसाठी
त्यांच्यासोबत असतात. त्यादेखील काइट फोटोग्राफी बर्यापैकी करतात. दिनेश मेहता आपल्या कामासाठी गो प्रो,रिक्को,निकॉन आणि पँटॅक्ससारख्या विविध कंपन्यांचे डिजिटल
कॅमेरे समतात. मेहता यांना या मोहिमेला जाण्यापूर्वी किमान तीन दिवसांपासून ते आठवड्यापर्यंतचा
कालावधी तयारी करण्यासाठी लागतो.
No comments:
Post a Comment