Sunday, February 12, 2017

प्रेमात पडले तरी ….


     भारतीय संस्कृतीत जसे सणांना महत्त्व असते तसेच पाश्‍चिमात्य भावविश्‍वास एक दिवस नात्यांसाठी निश्‍चित केला जातो. त्यानुसार फ्रें डशीप-डे, मदर्स-डे , फादर्स-डे यासारख्या दिवसांसोबतच दरवर्षी १४ फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन-डे' नावाने प्रेम दिवस साजरा केला जातो.गेल्या दोन दशकांपासून भारतात हा दिवस प्रकर्षाने जाणवतो. जोडीदारासोबत हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी विविध फंडे शोधले जातात. परंतु, तरुण-तरुणीच्या प्रेमापुरता मर्यादित असलेल्या या दिवशी 'प्रेमभंग' होण्याचे प्रकार वाढीस लागले. यातून मनोविकार आणि गुन्हे घडताना दिसतात. त्यामुळे 'प्रेमात पडले तरी डोळे उघडे आणि मन विचारी ठेवा.


  हल्ली व्हॅलेंटाईन-डे साजरा करणे प्रतिष्ठेचे समजले जाते. यादिवशी सुरू झालेले प्रेम किती दिवस टिकेल याची काहीच खात्री नाही. कारण एखाद्या मुलाला 'गर्लफ्रेंड' नाही आणि मुलीला 'बॉयफ्रेंड नाही' या विचारानेच अनेक जण गर्लफ्रें ड-बॉयफ्रेंडच्या शोधात एकमेकांवर प्रेम करत असतात. तर अधिकांश तरुण-तरुणी कुमारावस्थेत असल्याने केवळ आकर्षणाने जवळ आले असतात. 
     तरुण-तरुणीमध्ये हार्मोन्स बदलामुळे एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होते. त्याला 'प्रेम' असे म्हणता येणार नाही. याच प्रक्रियेत एका मुलीला अनेक मुले तर एका मुलाला अनेक मुलीदेखील आवडू शकतात. यालाच 'ट्रायल अँण्ड एरर'(चुका आणि शिका) असेही म्हणता येईल. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र अशा अवस्थेतच अनेक चुका तरुण-तरुणीकडून होताना दिसून येतात, आणि या सर्व प्रकारांना पालकांनाच समोर जावे लागते. त्यामुळे प्रत्येक मुलांच्या आई-वडिलांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. 
     आपली मुलं दररोज काय करतात याविषयी आई-वडिलांना माहिती असणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचादेखील वापर आपली मुले कसा करत आहेत याविषयी देखील माहिती पालकांनी ठेवणे गरजेचे असून वेळ पडली तर त्यांच्या सोशल मीडियावरील मॅसेजदेखील पालकांनी तपासणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर प्रत्येक आई-वडिलांना सोशल मीडियाचे अद्यावत ज्ञान असणेदेखील गरजेचे आहे. मात्र, यासाठी पालक आणि मुलांमध्ये दैनंदिन संवाद असणे गरजेचे आहे. तरच मुलांना जीवन कसे जगावे याविषयी माहिती मिळेल. 
     सध्याच्या परिस्थितीत 'नि:स्वार्थ प्रेम' ही संकल्पनाच ही लोप पावल्याचे दिसून येते. त्वरित मिळणारे समाधान यामागे सध्याची पिढी धावताना दिसून येते. कुमारावस्थेत 'नि:स्वार्थ प्रेम' ही संकल्पनाच नसते. व्यक्तिमत्वात प्रगल्भता येते त्याचवेळेस नि:स्वार्थ प्रेम अनेक जोडीदारांचे एकमेकांवर असल्याचे दिसून येते. जोडीदारापैकी एक सदस्य नि:स्वार्थ प्रेम करत असतो. त्यामध्ये मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
     व्यक्तिमत्वात प्रगल्भता येण्याआधी 'प्रेम' या संकल्पनेच्या आधारे सुरूझालेल्या संबंधाचे रुपांतर पुढे शारीरिक संबंधात होत असते. लग्नाआधी ७0 टक्के तरुण-तरुणी शरीर संबंध ठेवतात, असे संशोधानातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रेम करताना अथवा आपला जोडीदार निवडताना बुद्धीचा वापर करून तसेच सभोवतालच्या परिस्थितीचा सारासार विचार करूनच समोरच्या व्यक्तीची निवड करावी. अन्यथा यामधूनच देहविक्री, गँगरेप, बलात्कार अशा गुन्ह्य़ांची निर्मिती झाल्याचे दिसून येते. 

प्रेमसंबंधातून एखाद्याचा खुन करणे अथवा स्वत:च आत्महत्या करणे याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. या सर्व घटना के वळ एकमेकांशी संवाद तुटल्यानेच घडतात. प्रेमसंबंधात नकार पचवायचीदेखील तयारी समोरच्याची असणे गरजेचे आहे.'मला आवडलेली वस्तु मला मिळाली नाही तर ती कोणालाही मिळणार नाही' असा विचार मनात येणे म्हणजे हे मानसिक विकृतीचे लक्षण आहे. त्यावर समुपदेशन होणे गरजेचे आहे. प्रेमसंबंधातून निराश झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या भावना इतरांशी व्यक्त क रणे गरजेचे असून त्यामुळेच अशा चुकीच्या घटना टाळता येतील. 

No comments:

Post a Comment