Sunday, February 12, 2017

वेळ मॅनेज करायला शिका


     फेब्रुवारी महिना म्हटलं की, विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचा ज्वर चढलेला असतो. चिटपाखरूही नसलेल्या रस्त्यांवरून झाडांची पानं, धूळ वाहून नेणारी हवा आणि थंडी-ऊन्हाचं संमिश्र वातावरण ... एक प्रकारचं विचित्र  वातावरण आसमंतात  पसरलेलं असतं. असं वाटतं की, अख्खा दिवस अंथरुणात लो़ळत पडावं. अभ्यास करायच्या नावानं तर जाम आळस चढायला लागतो. शिवाय मनात भितीही सतवायला लागतेआता कसं होणार? हा प्रश्न सतत मनाभोवती पिंगा घालत असतो. पण हेदेखील खरं की, हीच वेळ आहे ती चांगल्या प्रकारे रिविजन करण्याची! आपण वर्षभरात चांगला अभ्यास केला असेल तर परीक्षेची भिती बाळगण्याचे काहीच कारण नाही. पूर्ण तयारीनिशी कुठल्याही आव्हानांचा सामना केला जाऊ शकतो.

     काही मुलांच्याबाबतीत कित्येकदा तरी परीक्षेची तयारी करताना म पुढचं पाठ मागचं सपाटफ असाच प्रकार घडतो. याला कारण आहे ते रिविजनचा अभाव! याकडे कानाडोळा करून चालणार नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की, आपण  ज्या कठीण विषयाला चार-चार तास अधिक देतो, तिथे आपला आवडता विषय जो आहे, ज्याच्यावर तुमची चांगली पकड आहे, त्यालाही किमान दोन तास द्यायलाच हवेत. त्या विषयाचे रिविजन व्हायलाच हवे.यामुळे सगळ्याच विषयांवर तुमची पकड चांगली राहील.
     यश मिळवायचं तर त्यासाठी वेलेचे नियोजन असणं महत्त्वाचं आहे. चोवीस तासांचं टाईम टेबल बनवून वेळ न दवडता अभ्यास करण्याचा प्रयत्न करायला हवा. केवळ परीक्षेच्यावेळीच नव्हे तर संपूर्ण वर्षभर या टाईमटेबलनुसार  चालत राहा. यामुळे तुम्हाला खेळायला आणि टीवी पाहायलादेखील पुरेसा वेळ मिळेल. आणि अभ्यासालादेखील! इतकंच नव्हे तर बाहेर सहलीसाठीदेखील वेळ काढू शकता. हां, पण परीक्षेच्यावेळी मात्र वेगळं टाईमटेबल बनवा आणि  पेपरनुसार परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. जर तुम्ही वेळ  ममॅनेजफ करायला शिकला तर तुम्ही नक्कीच यशाची बाजी मारलीत म्हणून समजा!
                                                                                                      



No comments:

Post a Comment