Monday, February 13, 2017

(बालकथा) हिरवा घोडा


      एक दिवस बादशहा अकबर आपल्या शाही बागेत घोड्यावर स्वार हो ऊन फेरफटका मारत होता. अर्थात त्याच्यासोबत बीरबल होताच. सगळीकडे हिरवंगार गवत उगवलेलं होतं. तशीच पण डेरेदार झाडं होती. असं वाटत होतंकी, बागेने हिरवा शालू नेसला आहे. बादशहाचं मन रमून गेलं. अचानक बादशहाला काही आठवलं. तो बीरबलला म्हणाला,बिरबल, मला हिरव्या रंगाचा घोडा हवाय. सात दिवसांत घोडा आणला नाहीस तर तुझं तोंडही तिकडेच काळं कर. हिरव्या घोड्याशिवाय तुझं तोंड दाखवायला येऊ नकोस.
     हिरव्या रंगाचा घोडा नसतो, हे बादशहाही माहीत होतं आणि बिरबलालाही! परंतु, असे अधून-मधून विचित्र प्रश्न विचारून बिरबलाची परीक्षा पाहात असेबिरबलाने कधीच हार मानली नव्हती. बादशहाला बिरबलाकडून पराभवाची अपेक्षा होती. पण बिरबलदेखील महावस्ताद होता. म्हणून तर त्याला हजरजबाबी आणि चतुर म्हणतात. बादशहा मनात ये ईल, तेव्हा वाट्टेल तसे प्रश्न बिरबलाला विचारी. हा प्रश्नदेखील त्यातलाच होता.
     सात दिवसांत हिरवा घोडा आणतो, असे सांगून बिरबल  घोड्याच्या शोधात निघाला. अर्थात या कालावधीत त्याने फक्त मस्तपैकी  देश फिरण्याचेच काम केले. आणि आठव्या दिवशी दरबारात हजर झाला. बादशहानं विचारलं, आणलास का हिरवा घोडा?
     बिरबल म्हणाला, हो जहांपनाहमला घोडा मिळाला. उत्तर ऐकून बादशहाला आश्चर्य वाटलं, पण चेहर्यावर तसा भाव न आणता बादशहा म्हणाला, मग, कुठाय तो घोडा?
     बिरबल नम्रपणे म्हणाला, जहांपनाह,घोडा मिळाला आहे, पण तो इथे मला आणता आला नाही. त्याच्या मालकाने दोन अटी घातल्या आहेत. त्याची पूर्तता झाली तरच घोडा दे ईन.
     अकलमंद बिरबलाकडून अटी ऐकण्याची उत्सुकता बादशहाला होती. त्याने पटकन विचारले,काय अटी आहेत?
पहिली अट अशी की, घोडा आणण्यासाठी तुम्हाला स्वत:ला जावं लागेल. आणि दुसरी... बिरबल सांगणार तोच बादशहा म्हणाला, सांग सांग लवकर सांग. पहिली अट तर एकदम सोपी आहे.
     घोडा असा खास रंगाचा आहे. त्यामुळे त्याला घेऊन येण्यासाठीचा दिवसदेखील खास असावाआठवड्यातले सातही वार सोडून कुठल्याही दिवशी येऊन घोडा घेऊन जा, असे घोड्याच्या मालकाचे म्हणणे आहे.    अकबर बादशहा बिरबलाच्या तोंडाकडेच पाहात राहिला.
     बिरबल हसून म्हणाला,जहांपनाह, खास घोडा आणायचा असेल तर मग त्याच्या अटीही मान्य करायला हव्यात.
आता बादशहा खळखळून हसला. बिरबलाच्या चतुरपणाला दाद तर दिलीच पणबिरबलाला नामोहरम करणं इतकं सोप्पं नाही, हेही त्यानं जाणलं.                                                                                        



No comments:

Post a Comment