बिनी मुंगी तोंडात पेढयाचा तुकडा धरून सावकाश येत होती.
वाटेत तिला किटी माशी भेटली. पेढा पाहून किटीच्या तोंडाला पाणी सुटलं. ती बिनीजवळ
जात म्हणाली,
‘ए बिनी, पेढा घेऊन कुठे चाललीस गं?’ बिनी पेढा तोंडातून काढून बाजूला ठेवत म्हणाली, ‘किटी, आज रात्री माझ्या घरी नव्या वर्षाच्या
स्वागताची पार्टी आहे. त्याची मी तयारी करतेय. तूही ये, पार्टी
करायला’.
किटी
दीर्घ उसासा घेत म्हणाली,
‘ मी आले असते गं, पण काय करू! माझ्या
सोन्याला काय झालंय कोण जाणे! कालपासून तो तापानं फणफणलाय. मला त्याला दाखवायला
डॉक्टरांकडे न्यायचं आहे. पण तुझा पेढा मात्र दिसायला फार छान आहे. त्यामुळे ..’
बिनीला
किटीचा आशाळभूत चेहरा पाहून दया आली. ती लगेच म्हणाली,‘तसं
काही नाही, किटी. तू आतादेखील पेढा खाऊ शकतेस.’ पेढय़ाचा
एक तुकडा तोंडात धरून किटी माशी उडाली.
बिनी उरलेला पेढा तोंडात धरून निघाली तोच टिलू फूलपाखरू उडत उडत तिच्यासमोर दत्त म्हणून हजर झालं. पेढा पाहताच टिलू मोठय़ाने म्हणाल, ‘बिनी, पेढा मला फार आवडतो. मला थोडा दे ना!’
बिनी उरलेला पेढा तोंडात धरून निघाली तोच टिलू फूलपाखरू उडत उडत तिच्यासमोर दत्त म्हणून हजर झालं. पेढा पाहताच टिलू मोठय़ाने म्हणाल, ‘बिनी, पेढा मला फार आवडतो. मला थोडा दे ना!’
बिनी
काही बोलू शकली नाही. टिलू फुलपाखरू पेढय़ाचा तुकडा तोंडात टाकत म्हणालं, ‘पण
पेढा घेऊन चाललीस कुठं?’बिनी काहीशा हिरमुसल्या आवाजात
म्हणाली, ‘टिलू, आज रात्री मी
माझ्या घरी पार्टी ठेवली आहे. त्यासाठीच घेऊन चालले आहे.’टिलू काही बोलला नाही. तो
गपगुमानं उडून गेला. बिनी आपल्या घरी पोहोचली. पण तिथे मुंग्यांची काही बाळं खेळत
होती. तिला पाहताच सगळे तिच्याकडे धावले. दीदी, काहीतरी
खायला दे ना, खूप भूक लागलीय.
बिनीने
विचार केला,
एवढय़ाशा पेढय़ात पार्टी ती काय करणार? तिने
उरलेला पेढा मुलांमध्ये वाटून टाकला. ते खाऊन-पिऊन आनंदाने निघून गेले.बिनी घरात
आली. तिने अगोदरच रंगीबेरंगी कागदांनी, मेणबत्त्यांनी घर
छानसे सजवले होते. ती खिडकीपाशी जाऊन बसली. हळूहळू तिची दोस्त मंडळी येऊ लागली. पण
त्यांना खायला द्यायला तिच्याकडे काहीच नव्हते. बरोबर बारा वाजता ‘हॅपी न्यू
इअर’ची धून वाजू लागली, तसा सगळ्यांनी जल्लोष करायला
सुरुवात केली. सगळे नाचू लागले. तेवढय़ात दारावर टकटक झाली. दारात किटी माशी उभी
होती. तिच्या हातात भला मोठा केक होता. तिच्यापाठोपाठ टिलू चॉकलेटचा डबा घेऊन हजर
होते.
माशी
म्हणाली,
‘आम्ही तुझी पार्टी टाय टाय फिस्स करू देणार नव्हतो. तू आमची
सगळ्यांत बेस्ट फ्रेंड आहेस. कधी कुठल्याही वस्तूला नाही म्हणत नाहीस’.टिलू हसायला
लागला, बिनी, तुला काय वाटलं,
आम्ही तुझ्या मित्रांना काही न खाऊ घालता असंच जाऊ देऊ? यानंतर मग सगळ्या मित्रांनी खूप दंगा-मस्ती केली. केक कापला आणि केक,
चॉकलेट्सवर सगळ्यांनी यथेच्छ ताव मारला आणि एकमेकांना न्यू
इअरच्या शुभेच्छा देत आपापल्या घरी निघून गेले.
No comments:
Post a Comment