Tuesday, February 14, 2017

शैक्षणिक अ‍ॅप बनवणारे इमरान खान


     इमरान खान यांचा जन्म राजस्थानमधल्या अलवर जिल्ह्यातील खरेदा गावात झाला. शाळेत असताना त्यांना शास्त्रज्ञ व्हावंसं वाटायचं.ते शास्त्रज्ञ काही बनले नाहीत,पण शिक्षक मात्र झाले. दोन वर्षांचा अध्यापकाचा कोर्स केल्यानंतर त्यांना 1999 मध्ये सरकारी शाळेत नोकरी मिळाली. भावाची पुस्तके आणि इंटरनेटच्या सहाय्याने वेबसाइट कशी बनवायची, याची माहिती घेऊन त्यांनी 2009 मध्ये जीकेटॉक डॉट कॉम नावाची वेबसाइट बनवली. त्यांच्या या निर्मितीमुळे अलवर जिल्ह्याचे कलेक्टर आशुतोष पेडणेकर यांनी त्यांची शाबासकीची पाठ थोपटली.त्यांनी इमरान खान यांना विद्यार्थ्यांच्यासाठी शिक्षणोपयोगी अ‍ॅप  बनवण्याचा सल्ला दिला. त्यांना अ‍ॅपच्या कोडिंगच्याबाबतीत काही माहिती नव्हती. त्यांचे बारावीपर्यंत सायन्समधून शिक्षण झाले होते. गणित आणि सायन्स क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. कॉम्प्युटर चालवायला त्यांना फार आवडायचे. त्यांचा इंजिनिअर झालेला भाऊ जेव्हा केव्हा कॉम्प्युटर घरात सोडून जायचा,तेव्हा ते त्यावर काम करायचे. त्यांनी पहिल्यांदा शैक्षणिक विषयावर अ‍ॅप बनविण्याचा निर्णय घेतला,ज्याने मुलांना त्याचा फायदा होईल.त्याचा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी फायदा होईल. नववी इयत्तेच्या मुलांसाठी त्यांनी पहिला अ‍ॅप  बनवला. यानंतर त्यांनी एकापेक्षा एक अशा अनेक अ‍ॅपची निर्मिती केलीअ‍ॅप  बनवताना ग्रामीण आणि शहरी दोन्ही घटकांचा विचार करून त्यांनी अ‍ॅप  बनवले आहेत. आतापर्यंत त्यांनी 65 शैक्षणिक अ‍ॅप  तयार केले आहेत तर शंभरहून अधिक वेबसाइट बनवल्या आहेत. अ‍ॅप  बनवण्यासाठी ते कॉम्प्युटरसंबंधित पुस्तके वाचली   आहेत. गुगलचाही त्यांना चांगला फायदा झाला.

     आतापर्यंत बनवलेल्या अ‍ॅपमध्ये शाळा,कॉलेज आणि स्पर्धा परीक्षा यांच्याशिवाय आरोग्य आणि पर्यटनसंबंधित विषयांचा समावेश आहे.लाखो लोकांनी अ‍ॅप  डाऊनलोड करून त्याचा उपयोग करीत आहेत.त्यांनी बनवलेले बहुतांश अ‍ॅप  हे हिंदी,गणित आणि सायन्सशी संबंधित आहेत.शहरातले किंवा गावातले लोक आपल्या मुलांना विशेषत: इंग्रजी शिकवायचा अधिक प्रयत्न करतात,मात्र आपल्या मातृभाषेत शिकताना मुले अधिक गोष्टी आत्मसात करू शकतात,हा त्यांचा अनुभव आहे.त्यांनी प्रायमरी,सिनियर आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यार्या विद्यार्थ्यांना समोर ठेऊन अ‍ॅप  बनवले आहेत.त्यांचे अ‍ॅप स्पर्धा परीक्षा, बँकिंग, सिविल सर्विसेज,दहावी परीक्षांसाठी आहेत. याशिवाय त्यांनी सामान्य ज्ञानावर आधारितही अ‍ॅप  बनवले आहेत.राजस्थानमध्ये पर्यटनासाठी येणार्या लोकांसाठीही अ‍ॅप बनवले आहेत.सामान्य लोकांना मेडिकल सुविधा देणारे मेडिकल अ‍ॅप देखील आहेतअ‍ॅप  बनवण्याची प्रेरणा त्यांना अशा विद्यार्थ्यांकडून मिळाली,ज्यांना गणित,सायन्स विषय अवघड जात होते. स्मार्टफोनच्या साहाय्याने ते हे विषय सहजगत्या शिकू शिकतात. गेल्या चार वर्षात त्यांनी 65 अ‍ॅप  बनवले आहेत. इंग्रजी भाषेत अगोदरच पुष्कळ अ‍ॅप  उपलब्ध आहेत,मात्र हिंदी भाषेत मुलांसाठीची त्यांची संख्या फारच कमी होती. त्यांनी बनवलेल्या अ‍ॅपचा चांगला फायदा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना होत आहे. लंदनमधील प्रसिद्ध वेम्बली स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात त्यांच्या  नावाचा  उल्लेख केला तेव्हा,आपल्या या कामाचं सार्थक झालं, असे ते म्हणतात. नरेंद्र मोदी म्हणाले होते की, माझा भारत अलवरच्या इमरान खानमध्ये आहे. त्यांच्यासाठी हा क्षण मोठा महत्त्वपूर्ण आहे.त्यांनी बनवलेल्या शैक्षणिक अ‍ॅप  आणि वेबसाइटमुळे अशी आणि इतकी प्रसिद्धी मिळेल, असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते, असे इमरान खान म्हणतात.



No comments:

Post a Comment